दिवाळीच्या सत्र सुट्ट्या नुकत्याच परवा संपल्या.. कालपासून संध्याकाळच्या वेळी दहावीच्या बॅचेस पुन्हा सुरू झाल्या..
आजची बॅच नेहमीप्रमाणे 7 वाजता संपवून खाली उतरत होतो… पण अचानक छातीत कळा उठल्या, श्वास घुसमटू लागला, आणि डोळ्यासमोर अंधारी दाटून आली...
क्षणभर वाटलं.. “हा शेवटचा श्वास तर नाही ना?”😱
छाती चोळत खाली आलो… थोडं पाणी प्यायलो, खोकरलो, पण त्रास काही कमी झाला नाही. घरचे सगळे घाबरलेले..
बायकोचा आग्रह “आता लगेच हॉस्पिटलला जाऊयात..!”
मेव्हणा हारूण धावतच बाहेर पडला, ऑटो आणला. बाहेर पाऊस मुसळधार कोसळत होता..हारूणने तत्काळ परतानी हॉस्पिटल येथे कार्यरत आमचे स्नेहीं मित्र डॉ. फेरोज शेख यांना फोन केला.
आम्ही परतानी हॉस्पिटल गाठेपर्यंत डॉक्टर जेवायला गेले होते... पण तेथील कर्मचारी..अर्ध्याहून अधिक माझेच माजी विद्यार्थी..!
तिथं प्रज्ञा वाघमारे भेटली ...आमच्या शैक्षणिक परिवारातील गुणी विद्यार्थिनी.. तीनें रक्तदाब तपासल्यानंतर लगेच ECG काढून डॉक्टरांकडे धावली.
थोड्याच वेळात डॉ. कौस्तुभ परतानी आले. तपासणी केली आणि म्हणाले,..
“लक्षणे गंभीर आहेत, 2D-Echo करा.”
रिपोर्ट आल्यानंतर सल्ला दिला “Angiography करून घ्या.”
मी मात्र अस्वस्थ होतो मनात एकच विचार..
"अजून बरीच कामं बाकी आहेत… हे असं थांबून चालेल का?"
डॉक्टरांनी प्राथमिक उपचार दिले. इंजेक्शन झालं, थोडा वेळ विसावलो, आणि थोडं बरं वाटू लागलं..
तेव्हा जाणवलं आज हृदयविकाराचा सौम्य झटका होता..
वेळ आली होती, पण टळली..!🫣
मी नशिबवान आहे.. प्रत्यक्ष -अप्रत्यक्ष मित्रांचे सहकार्य, कुटुंबाची साथ, आणि हजारो विद्यार्थ्यांचे आशीर्वाद सोबत होते..
मनात पुटपुटत होतो.. “शैक्षणिक आणि सामाजिक कार्य क्षेत्रात अजून खूप मोठं काम बाकी आहे..ते इतक्या लवकर कसं आटोपणार..? "
तेवढ्यात पुन्हा प्रज्ञा आली आणि म्हणाली,
“सर, आपलं बिल मी भरते.”
मी थोडा दचकून म्हणालो, “ नाही ताई… ते मी देतो.”
ती म्हणाली..
“सर, आपणच मला आयुष्यात सक्षम व्हायला शिकवलं…!
"माझं दहावीचं शिक्षण तुम्हीचं पूर्ण केलं… आज मी इथं आहे, ते तुमच्यामुळेच..!”
त्या क्षणी माझ्या डोळ्यात अश्रू येतं होते.. ते मी आवरत होतो.. 😢
माझ्या परिश्रमाचं, शिक्षणसेवेचं हेच खरं बक्षीस होतं.. विद्यार्थिनीने शिक्षकाचं ऋण मान्य करणं..!
प्रज्ञा वाघमारे ही गरीब घरातील मुलगी... वडील ऑटोचालक, आई शेतमजूर. पण शिक्षणाची जिद्द अफाट.!
दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश, पण मेडिकल प्रवेश न मिळाल्याने निराश न होता तिनं GNM (नर्सिंग) निवडलं..
आता ती इथेच, समर्पणाने रुग्णसेवेत समर्पित आहे..तिची बहीण प्रतीक्षाही तिच्या पावलावर पाऊल ठेवून GNM करत आहे..
दोघींनाही पाहून वाटलं “मेहनतीचा आणि शिक्षणाचा प्रकाश खरोखर अंधार दूर करतो.”
आज माझं हृदय वेदनेने नव्हे, तर कृतज्ञतेने धडधडत होतं…
गेल्या 25 वर्षांच्या सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रवासात असंख्य अशा प्रज्ञा, प्रतीक्षा निर्माण झाल्या.. ज्यांनी माझ्या शिक्षणसेवेचं खरं मोल ठरवलं.
मित्रांनो, जीवन क्षणभंगुर आहे, पण सेवा आणि शिक्षणाचं कार्य अमर आहे...आजचा अनुभव सांगून गेला..
"नियती आपल्याला वेळोवेळी थांबवते, आपलं कार्य अजून अपूर्ण आहे हे सांगण्यासाठी...!"
आता पुन्हा नव्या उमेदीनं, नव्या ध्यासानं..
“मन, लेखणी आणि कार्य” या त्रिसूत्रीने समाजप्रबोधनाचा दीप अधिक तेजोमय करायचा आहे.!
“जीवनाच्या प्रत्येक झटक्यानं आपण हादरू नये.. कारण प्रत्येक वेदनेत एक नवीन जागृती दडलेली असते.” ह्याचा आज अनुभूती आली मित्रांनो..
धन्यवाद आपणा सर्वांच्या सदिच्छा आणि आशीर्वादाने आजची वेळ टळली मित्रांनो..
-आपलाच एक वैचारिक मित्र.. ✍️
साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment