“का लिहायचं?”....🤔
लोक विचारतात... ✍️
"का लिहायचं?"
"का बोलायचं?"
"काय होणार आहे या पोस्टने?"
"काय बदल होतो रे असं बोलून, लिहून?"
हो, प्रश्न योग्यच आहेत...पण उत्तरही तितकंच धगधगतं आहे मित्रांनो..
लिहिणं म्हणजे विरोधाचं शस्त्र, विचारांचं शस्त्र, आणि परिवर्तनाची ठिणगी...
लिहिणं म्हणजे रडणाऱ्या समाजाला सांत्वन देणं, आणि झोपलेल्या विवेकाला जागं करणं....
आवाज नसलेल्यां वेदनेचं..शंखनाद आम्ही करतो..!
रस्ता नेहमी असतोच..पण वळणावर खड्डा असतो, अंधार असतो.
आणि त्या अंधारात कुणीतरी उभं असतं... विचारांच्या प्रकाशाचं..कंदिल हातात घेऊन...
कधी थकलेलं, कधी झिजलेलं, पण डोळ्यांत ज्वाला पेटवलेलं...
त्याचं काम एकच..!
“पुढे जाणाऱ्यांना सांगणं की इथं खड्डा आहे, थांब, नीट पाह आणि पुढं जा बरं...!”
आम्ही तीच माणसं आहोत..
कंदिल घेऊन उभी राहिलेली...
आम्ही सांगतो, दाखवतो, विचारतो...
आम्ही लिहितो... कारण कुणीतरी वाचतं, विचार करतं, आणि पुढे चालतं...
"काय उपयोग होतो या लेखांचा?"🤔
तर सांगतो..
एक शब्दही जर कुणाच्या अंतःकरणात ठिणगी पेटवतो,एक विचार जरी कुणाला चुकीकडून योग्य दिशेला वळवतो, तर त्या शब्दांचा प्रत्येक श्वास मूल्यवान ठरतो.
लिहिणं म्हणजे जगाला बदलणं नव्हे,.,,तर जगण्याची दृष्टि बदलणं..लिहिणं म्हणजे उठून उभं राहणं,..ज्यावेळी बाकीचे सर्व गप्प असतात...
भवतालच्या अन्याय, दु:ख, वेदना, खोटेपणा आणि नकारात्मकतेच्या गर्दीत, आम्ही लिहितो...
कारण... कुणीतरी तरी सत्य ऐकावं..!
कुणीतरी तरी विचार करावा...कुणीतरी तरी जागं व्हावं..!
आम्ही कोण आहोत लिहिणारे नेमके?😱
ना आम्ही राजे, ना आम्ही क्रांतीकारी, ना आम्ही प्रसिद्ध लेखक, ना आम्ही साहित्याचे मक्तेदार.. ना आम्ही पुढारी...ना आम्ही नेमलेलं नेमस्त..
आम्ही फक्त कंदिलधारी प्रवासी..
ज्यांच्याकडे विचाराचं ज्ञान-प्रकाश आहे..
ज्यांना वाटतं,
“अंधाराशी झगडणं हेच प्रकाशाचं धर्म आहे.”
शब्द म्हणजे बीज..
आज टाकलं, उद्या उगवतं, आणि कधी तरी झाड बनून सावली देतं.
म्हणूनच.. ✍️
लिहित राहा, बोलत राहा, विचारत राहा,
कारण समाज बदलतो तेव्हा,.
तो आधी विचारांनी हलतो, विवेक जागृत झाला तरच..मग कृतीने उभा राहतो..
- शब्दांकन.. ✍️
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#का_लिहायचं #WriteToAwaken #MarathiMotivation #MarathiThoughts #SocialAwareness #Prerna #VicharManthan #MarathiWriter #Prabodhan #VivekWadi #CandleOfChange #KandilDhari #MarathiInspiration #SamajJagruti #ThoughtRevolution #ZindagiFoundation #SpiritOfZindagi #DrAPJAbdulKalamFoundation #MarathiPost #MarathiQuotes #MotivationalMarathi #LihitRaha #VicharatRaha #BolatRaha #MarathiYouth #AandharavarPrakash #MarathiBlogger #MarathiSahitya #MarathiWritersCommunity
#का_लिहायचं ✍️ #MarathiMotivation 💫 #MarathiThoughts 💭
#Prerna 🔥 #VicharManthan 🧠 #KandilDhari 🕯️
#SocialAwareness 🌏 #MarathiInspiration 🌿
#SpiritOfZindagi 💫 #LihitRaha 📖
Post a Comment