“ नेता मोठा नाही; मोठं ते राष्ट्र. आणि राष्ट्र तेच, जेव्हा जनता सन्मानाने जगते.”- फिडेल कॅस्ट्रो.. ✍️
🔰 आज दिनांक : 25 नोव्हेंबर...
कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो यांच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने...✍️
अन्यायाच्या अंधारात पेटलेला एका क्रांतीदीपाची प्रेरणादायी गोष्ट..
“ क्रांती कधीच थांबत नाही; ती प्रत्येक अन्यायाने नव्याने जन्म घेते फिडेलचा अनंत प्रकाश...”
जगाच्या नकाशावर एक छोटसं बेट…क्यूबा..!
भौगोलिकदृष्ट्या नगण्य, पण विचारांनी महासत्ता असलेलं..या छोट्याशा भूमीवरून उभा राहिला..
एक मनुष्य… पण मनाने पर्वत, विचाराने महासागर.. तो म्हणजे..
कॉम्रेड फिडेल कॅस्ट्रो... ✍️
( कार्यकाळ : 1926 - 2016, मार्क्सवादी विचारांचा, क्यूबा क्रांतीचा जनक)
तो फक्त नेता नव्हता; तर तो विचारांचा दीपस्तंभ होता, जो साम्राज्यवादाच्या वादळातही विझला नाही,आणि गरिबांच्या हृदयात आशेची ज्योत बनून अखेरपर्यंत पेटत राहिला.
🔥 क्रांती म्हणजे केवळ सत्तांतर नव्हे; ती मनांची मुक्तता आहे..
फिडेल कॅस्ट्रोने.. क्यूबामध्ये केलेली क्रांती केवळ हुकूमशहा बतिस्ताला हटवणे नव्हते...
ती होती..!
शोषितांच्या पाठीवर दाबलेलं ओझं उपसून टाकण्याची प्रक्रिया, जमिनीचं न्याय्य पुनर्वाटप,आरोग्य आणि शिक्षणाचा जनतेच्या हक्कांमध्ये समावेश,आणि “राष्ट्र म्हणजे जनता” हा तत्त्वज्ञानाचा पुनर्जन्म.
त्यांनी दाखवून दिलं..
“ मुक्त राष्ट्र तेच, ज्याच्या प्रत्येक मुलाला शिक्षण, प्रत्येक कुटुंबाला आरोग्य, आणि प्रत्येक नागरिकाला सन्मान मिळतो.”
आजही भारतापासून ते जगाच्या कोणत्याही देशापर्यंत आपण ज्या समस्या पाहतो...शिक्षणाचं व्यापारीकरण, आरोग्याची महागाई, असमानता, बेरोजगारी..त्यात फिडेलच्या विचारांनी दिलेली मार्गदर्शकता किती मौल्यवान आहे हे स्पष्ट दिसतं.
🔥 परकीय सामर्थ्याशी उभं राहण्याचं धाडस..
एक लहान देश…समोर अमेरिकासारखी महासत्ता…आणि तरीही फिडेल यांनी जागतिक साम्राज्यवादाला स्पष्ट संदेश दिला..
“ Nous no kneel. We resist. ” (आम्ही गुडघे टेकत नाही; आम्ही प्रतिकार करतो.)
आजच्या काळात हा संदेश किती लागू पडतो..!
मोठ्या अर्थसत्ता, जागतिक कंपन्या, भांडवलशाहीचा व्यूह यांच्यापुढे अनेक राष्ट्रांची स्वायत्तता धोक्यात येतेय...अशा वेळी फिडेलची उभी आकृती आपल्याला सांगते..
“ राष्ट्राचं स्वातंत्र्य हे त्याच्या आर्थिक स्वावलंबनात असतं. ”
🔥 शिक्षण आणि आरोग्य..राज्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी..
फिडेलने क्यूबातील साक्षरता 99% केली, आरोग्यसेवा पूर्णपणे मोफत केली,आणि साध्या शेतकऱ्याचंही जीवन सन्मानानं जगण्यासारखं केलं.
आजच्या भारतात..खाजगी शिक्षण संस्थांची मनमानी फी, महागडी रुग्णालयं, आर्थिक विषमता, आणि वाढत चाललेले मानसिक ताण आणि सामाजिक संघर्ष..
येथे फिडेलचा विचार अतिशय प्रखरपणे अधोरेखित होतो,मित्रांनो..
“ जगातली खरी शक्ती शस्त्रांत नाही; तर ती शिक्षित आणि निरोगी नागरिकांत असते.”
हे तत्त्व आज इतकंच नव्हे तर अधिकच महत्वाचं आहे.
🔥 फिडेलची प्रेरणा आजही का जिवंत आहे..?
🔰 कारण जगात अन्याय आजही जिवंत आहे.
आर्थिक शोषण, जातीभेद,वर्णभेद, राजकीय भ्रष्टाचार हे थांबलेलं नाही.
जोपर्यंत अन्याय आहे, तोपर्यंत फिडेलची लढाई आपली लढाई आहे.
🔰 कारण समतेची भूक आजही भागलेली नाही..
स्त्री-पुरुष समानता, आर्थिक समानता, सामाजिक न्याय ही अजूनही अर्धवट स्वप्नं आहेत. फिडेल हे स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा देतात.
🔰 कारण आजच्या तरुणाला दिशादर्शक नायकांची गरज आहे.
आजचा तरुण तणावात आहे, करिअरचा ताण, सामाजिक दबाव, मानसिक अस्वस्थता...
फिडेल सांगतात.. “आत्मविश्वास म्हणजे क्रांतीचं पहिलं शस्त्र.”
🔰कारण फिडेलने शिकवलं..भीतीपेक्षा धैर्य मोठं आहे..
ज्याला 600 वेळा मारण्याचे प्रयत्न झाले, पण तरीही जो जिवंत राहिला तो माणूस नशिबाने नव्हे, तर विचारांच्या ताकदीने जिवंत होता.
🔥 फिडेल कॅस्ट्रो.. आजही दिशा-दर्शकचं का..?
आज जगात लोकशाहीचं विकेंद्रीकरण, आरोग्याची समानता, शिक्षणाचं सर्वसामान्यांकरिता मोफत होणं, शोषणाविरुद्धचा लढा,स्वाभिमान, आणि आर्थिक न्याय...ही फक्त आंदोलनांची भाषा नाही;हा फिडेल कॅस्ट्रोचा वारसा आहे.
फिडेल आपल्याला सांगतात..
“ क्रांती कधीच संपत नाही; प्रत्येक अन्यायाने ती नव्याने जन्म घेते.”
फिडेल कॅस्ट्रो आज नाहीत; परंतु त्यांच्या क्रांतीची आज गरज आहे,त्यांची शिकवण आजचा मार्ग आहे, आणि त्यांचं धैर्य आजचा दीप आहे, मित्रांनो असं मला वाटतं..
जगभरातील विचारवंत, विद्यार्थी, कार्यकर्ते आणि सामान्यजन आजही त्यांच्या दिशेने पाहतात..
कारण फिडेल कॅस्ट्रोची कथा ही केवळ इतिहास नाही;ती तर मानवतेच्या संघर्षाची अखंड प्रार्थना आहे..
आज त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन आणि क्रांतिकारी लाल सलाम.. 🙏
त्याचा एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#FidelCastro #ComradeFidel #CubanRevolution #RevolutionarySpirit #MarxistThought #VoiceOfRevolution #AntiImperialism #RevolutionNeverEnds #SpiritOfResistance #PeoplePower #NationIsPeople #EducationForAll #RightToHealth #SocialJustice #EqualityForAll #EconomicJustice #HumanDignity #AntiExploitation #PublicWelfare #EconomicFreedom #SovereigntyMatters #NeverKneel #WeResist #StandAgainstInjustice #CourageOverFear #RiseAgainstPower #YouthInspiration #RevolutionaryYouth #ThinkBeyondFear #bethechange #PowerOfIdeas #VicharPrabodhan #SamajPrabodhan #KrantiDeep #PreranaLekhan #LalSalaam #SamajikJagruti #Vivekvaad #ThoughtfulWriting #RevolutionaryWords #ProfRafiqShaikh #StudentMittra #SpiritOfZindagiFoundation #InspireEducateEmpower #AbdulKalamFoundation #NurturingPotential #EducationalReform #socialawareness
Post a Comment