संविधान म्हणजे संपूर्ण प्रभुत्व, संपन्न समाजवादी, पंथनिरपेक्ष, लोकतंत्रात्मक गणराज्य, न्याय, स्वतंत्रंता, समता, बंधुता !
भारतीय संविधान दिन निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..🌹
स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या चार आधारस्तंभांवर उभ्या असलेल्या भारतीय संविधानाला आज सलाम आणि संविधान दिनाच्या सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा..! 💐🇮🇳
भारतीय संविधानाची प्रास्ताविकता ही फक्त काही शब्दांची जोड नाही;तर ती भारतीय राष्ट्राच्या आत्म्याची पहिली शपथ आहे. हीच ती दिव्य घोषणा आहे जी सांगते...
भारत फक्त भूगोल नाही, तर विचारांची, मूल्यांची आणि मानवी स्वाभिमानाची साक्ष आहे..!
प्रास्ताविकेत अंकित झालेले समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता हे शब्द कागदावर लिहिलेले नसून, ते भारताच्या भविष्यातील सर्वोच्च आशा, स्वप्न आणि दिशा आहेत.
समता आपल्याला आठवण करून देते, कोणाच्याही जन्माने त्याचं स्थान ठरत नाही; मनुष्यत्वच हीच त्याची खरी ओळख आहे.
स्वातंत्र्य आपल्याला विचार करण्याची शक्ती आणि प्रश्न विचारण्याचं साहस देतं.
न्याय सामाजिक अन्यायासमोर तलवार आहे आणि दुर्बलांसाठी ढाल आहे.
बंधुता शिकवते भिंती नव्हे, तर पूल बांधले पाहिजेत.
ही मूल्यं भारताला केवळ विकसित राष्ट्र बनवणार नाहीत; तर विवेकी, संवेदनशील, न्यायपूर्ण आणि मानवी राष्ट्र निर्माण करतील.
आज संविधान दिन हा उत्सव नाही, तर तो स्मरण, कृतज्ञता आणि वचनाचा दिवस आहे.
कारण संविधानाने आपल्याला हक्क दिले, पण त्याच वेळी जबाबदाऱ्या देखील दिल्या..विचार करायला, जागे राहायला, प्रश्न विचारायला आणि अन्यायाविरुद्ध उभे राहायला.
चला, आजचा दिवस केवळ शुभेच्छेत न थांबता, कृतीची सुरुवात ठरो...
प्रास्ताविकेतील शब्द पुस्तकात नव्हे, तर आपल्या वागण्यात आणि राष्ट्रविचारात दिसले पाहिजेत.
कारण संविधानाने दिलेली हीच विचारांची ज्योत..
उज्वल, समता-आधारित आणि न्यायपूर्ण भारताची खरी मशाल आहे, असं मला वाटतं मित्रांनो..🇮🇳
जय भिम,जय संविधान, जय भारत..! 🇮🇳
- एक संविधान प्रेमी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment