महाराष्ट्राचा खरा ‘हास्यसम्राट’ आज काळाच्या पडद्याआड गेला…😢
वऱ्हाडी बोलीला जागतिक ओळख मिळवून देणारे, आपल्या सहजसोपी शैलीने हसवत-हसवत विचारांची बीजे मनात पेरणारे, सुप्रसिद्ध वऱ्हाडी कवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे निधन ही केवळ एका लेखक आणि विनोदकाराची हानी नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वातील एक प्रखर प्रकाश विझल्यासारखी वेदना आहे.
ज्यांनी अख्या महाराष्ट्राला खळखळून हसवलं, ज्यांच्या लेखणीतून विनोद नव्हे तर तत्त्वज्ञान वाहत आलं…जिथे व्यंगातून प्रहार होता, पण टोमणा नव्हता;जिथे हसू होतं, पण त्यासोबत जागृतीही; जिथे शब्दांत मस्ती होती, पण विचारांमध्ये बंड होतं.
त्यांच्या कविता, विनोद, त्यांची शैली, त्यांची वऱ्हाडी बोली ही केवळ कलेची अभिव्यक्ती नव्हती तर ती समाजाचा आरसा होती.
त्यांच्या विनोदात शोषितांचं दुःख, विद्रोह्यांचा आवाज, आणि सामान्य माणसाचं सत्य होतं.
आज आपण एका कलाकाराला नव्हे, तर एका काळाला अलविदा म्हणतोय.
💐 अलविदा मिर्झा साहेब…😢
आपण गेलात, पण आपल्या शब्दांची हसू-विचारांची परंपरा सदैव जिवंत राहील.
भावपूर्ण श्रद्धांजली. 🕯️💔
-आपला एक चाहता.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,परभणी.
Post a Comment