🎓 आज 28 नोव्हेंबर : महात्मा फुले यांचा स्मृतीदिन.. ✍️
सामाजिक परिवर्तनाचे प्रणेते विचारवंत, लेखक ,शाहिर , शिक्षणतज्ञ, कुशल शेतकरी,स्त्री शिक्षणाचे आद्य, समतावादी, इतिहास संशोधक, भारत भुषण, समता शिरोमणी महात्मा ज्योतीराव फुले यांना विनम्र आभिवादन.🙏🏻🌹
🌿 महात्मा फुले : सामाजिक प्रकाश आणि समतेचा दीप..
समाज अंधारात अडकलेला होता जात, अंधश्रद्धा, रूढी, धर्माच्या नावावर होणारा अन्याय आणि विषमता हे त्या काळातील सत्य होते. पण या अंधारात एक दीप प्रज्वलित झाला. त्या दीपाचं नाव महात्मा ज्योतिराव फुले.
जेव्हा संपूर्ण समाज मौनात होता, तेव्हा ज्योतिबा फुले उठले निर्भयपणे, निर्भिडतेने.
त्यांनी कोणत्याही व्यक्ती, संस्था किंवा परंपरेची भीडभाड न बाळगता समाजातील खोट्या कल्पना, अन्यायकारक नियम आणि माणसांना गुलाम बनवणाऱ्या विचारांना आव्हान दिलं.
त्यांच्यासाठी धर्म म्हणजे अंधानुकरण नव्हतं, तर धर्म म्हणजे मानवता होती.त्यांच्या मनात एकच प्रश्न धगधगत होता..
❝ जर धर्मामुळे माणूस रडत असेल, तर तो धर्म नाही, तो अत्याचार आहे.❞
महात्मा फुलेंनी ओळखलं की समाजात परिवर्तन करायचं असेल तर शिक्षण हाच एकमेव मार्ग आहे..
भारतातील पहिली मुलींची शाळा, विधवांसाठी आश्रम आणि सत्यशोधक समाजाची स्थापना हीं फक्त कृती नव्हती तर ती क्रांती होती.
आज स्त्री शिक्षण स्वाभाविक वाटतं, पण त्या काळात ते अपराध मानलं जात होतं.
पण महात्मा फुले म्हणाले..
❝ स्त्री शिक्षित झाली तर एक व्यक्ती नव्हे, संपूर्ण पिढी उभी राहते. ❞
त्यांनी स्पष्ट सांगितलं की समाजाला मागे खेचणाऱ्या जातिभेद, अंधश्रद्धा, रूढी आणि परंपरांच्या नावाखाली होणारा अत्याचार यांना नष्ट केल्याशिवाय समाज मुक्त होऊ शकत नाही.
त्यांचा ग्रंथ ‘गुलामगिरी’ हे विचारांचं शस्त्र होतं अन्यायाविरुद्धचं तडफदार उत्तर.
महात्मा फुले म्हणजे दीप, तर सावित्रीबाई फुले म्हणजे ज्वाला..
दोघांनी मिळून स्त्री स्वातंत्र्य, शिक्षण, स्वाभिमान आणि मानवतेची बीजे पेरली.
ते आज जिवंत नाहीत पण त्यांनी पेरलेली बीजे आज विचारांच्या रूपात फुलत आहेत.
आजही समाजात अंधश्रद्धा आहे,जातिभेद आहे,पूर्वग्रह आहेत,अन्याय आहे..
म्हणूनच आज भारताला पुन्हा एकदा महात्मा फुल्यांच्या विचारांची गरज आहे.
त्यांनी दिलेला संदेश अजूनही आपल्या अंतर्मनाला जागं करतो..
❝ ज्या समाजात मानवमनुष्य मानवाला तुच्छ मानतो, तो समाज कधीही महान होऊ शकत नाही. ❞
महात्मा फुले हे केवळ व्यक्तिमत्त्व नव्हते तर ते होते क्रांतीचे जनक, समानतेचे शिल्पकार आणि न्यायाचे प्रवर्तक.
त्यांची वाटचाल आपल्याला शिकवते, प्रश्न विचारायला, विचार करायला, सत्याचं रक्षण करायला आणि समाजासाठी उभं राहायला, मित्रांनों..
आज आपण त्यांचं स्मरण करतो, पण त्यांचा खरा सन्मान तेव्हा होईल..
जेव्हा समाजातील प्रत्येक माणूस जात, धर्म, लिंग न पाहता माणूस म्हणून जगेल.
महात्मा फुले अमर आहेत कारण त्यांची विचारधारा अजूनही चालत आहे, बदल घडवत आहे आणि भविष्य उजळवत आहे.
धन्यवाद मित्रांनो.. ✍️
-त्यांचा एक वैचारिक अनुयायी..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
#MahātmaPhule #ज्योतिरावफुले #महात्माफुले #SatyashodhakSamaj #SavitribaiPhule #स्त्रीशिक्षण #Gulamgiri #Samata #Equality #SocialReform #SamajSudharak #IndianReformers #EducationForAll #WomenEmpowerment #SocialJustice #AntiCaste #Vicharvanta #BahujanIcons #DalitHistory #IndianHistory #RevolutionaryThinker #MassLeader #ShikshanKranti #ShahuPhuleAmbedkar #BahujanMovement #Inspiration #Motivation #Legacy #HistoryMatters #IndianPride #SocialAwareness #HumanityFirst #StopCasteism #RiseAboveReligion #Truth #Justice #humanrights #jaibhim #EqualityForAll #JagatGuruPhule #समाजक्रांती #BahujanShaurya #ज्ञानक्रांती #शिक्षणक्रांती #विचारक्रांती #PhuleThoughts #PhuleJayanti #Mahapurush #तत्त्वज्ञान #समता #SamajikKrantikarक #IndianIcons #PhuleSmrutidin #28November
Post a Comment