“आजचं सत्य एकच — विद्यार्थी मरत नाहीत; त्यांना आपण मारतो…! अपेक्षांनी, भीतीने आणि दडपशाहीने.”
📌 “ महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचा सर्वाधिक वाढता आलेख.. आपण कुठे चुकतोय..?”
महाराष्ट्रास शिक्षणाचा किल्ला म्हटले जाते; पण त्या किल्ल्याच्या भिंतीतून विद्यार्थ्यांचे जीव गळून पडत असतील, तर समाजाने लाजेने नि वेदनेने थरथरायला हवे...!😢
आजच्या दैनिक लोकमत मधील बातमी NCERB च्या अहवालावरून सांगते की,
दहावी–बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ही आकडेवारी केवळ अंक नाहीत… तर ती आपल्या शिक्षणव्यवस्थेतील खोलवर घर केलेल्या अन्यायाची रक्ताक्षरे आहेत.
🎓 समस्येचा मूळ प्रवाह : दबाव, अपमान आणि व्यवस्था..
आजचा विद्यार्थी पालक, शिक्षक, शाळा आणि समाज यांच्यामधल्या ‘अपेक्षांच्या चक्रीवादळा’त अडकला आहे.
मित्रांसमोर अपमान, शिक्षणाचे व्यापारीकरण, ‘डोनेशन’, ‘ट्युशन फी’, ‘इंग्लिश मीडियम’ची सक्ती, गुण आणि मेरिटच्या उंबरठ्यावर उभे केलेले बालमन, शाळांकडून आणि शिक्षकांकडून होणारा मानसिक त्रास, तुलना, टॉपर संस्कृती, आणि ‘तू कमी पडतोस’ ही सततची बोचरी टोचणी...
ही केवळ कारणांची यादी नाही; तर विद्यार्थ्यांच्या मनावर दररोज कोरली जाणारी वेदना आहे.🫣
📌 महाराष्ट्र देशात पहिला — हा ‘पहिला क्रमांक’ शरमेचा आहे..😱
राष्ट्र्रीय क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार, 2023 मध्ये देशभरातील 13,072 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली, यातील सर्वाधिक महाराष्ट्रातील...
ही संख्या म्हणजे आपली नैतिक पराभवाची शिक्का मोर्तब केलेली घोषणा आहे.
समाज म्हणून आपण स्वत:ला विचारलं पाहिजे.. ✍️
विद्यार्थ्यांच्या खांद्यावर ठेवलेलं हे ओझं नक्की कोणाचं आहे?
गुण न मिळाल्याने मरणारा विद्यार्थी निकृष्ट नाही…
निकृष्ट तर ती व्यवस्था आहे जी ‘गुणां’च्या नावाखाली ‘जीव’ गिळते.
🎓शिक्षण नव्हे; परीक्षा-केंद्रित दडपणाचा उद्योग..
आजच्या शिक्षणव्यवस्थेत “अभ्यास” हरवला आहे आणि “गुणांची शर्यत” सुरू आहे..
शाळा प्रतिष्ठेच्या नावाखाली करतात ते तुलना, रँकिंग, पालक -मेळाव्यातील मधले अपमानास्पद संवाद...कच्च्या मनाला ते पेट्रोल सारखे असतात.
इंग्लिश मीडियम म्हणजेच यश, आणि मराठी-माध्यम म्हणजे मागास..हा धोकादायक अपप्रचार विद्यार्थ्यांचे आत्मविश्वास चिरडतो..
इंग्लिश माध्यम हे शिक्षणाचे नाही, तर बाजाराचे उत्पादन आहे.
शिक्षण स्वस्त, सहज उपलब्ध आणि मानवी असले पाहिजे..हे सरकारचे नैतिक कर्तव्य आहे.
🎓पालक आणि समाज : अपेक्षांच्या नावाखाली गळा आवळतोय
विद्यार्थ्यांपेक्षा पालकांची भीती जास्त...
“नापास झाला तर लोक काय म्हणतील?”
“त्या मुलाने 95% आणले, तू का नाही?”
अशा बोलण्याने अपयशाची भीती ‘नॉर्मल’ न राहता ‘अस्तित्वाचा प्रश्न’ बनते.
बालमनाला प्रेम, समज आणि आधार हवा असतो...दडपण नव्हे.
🎓शिक्षकांच्या हातात भविष्य असतं...पण काही ठिकाणी त्यांच्याच हातात जखम होते..
शिक्षकांवर दोषारोप करणे उद्देश नाही..
पण अपमान, ओरड, हिणवणे, इतरांशी तुलना करणे, ‘तू काही करु शकत नाही’ असे म्हणणे, हे सर्व मानसिक अत्याचारच आहेत..
समुपदेशन, भावनिक साक्षरता, आणि विद्यार्थ्यासोबत जिव्हाळ्याचा संवाद...ही शिक्षकांची मूलभूत जबाबदारी आहे.
🎓 आत्महत्या ही घटना नाही तर ती समाजाच्या अपयशाची जाहीर कबुली आहे..
विद्यार्थ्यांची आत्महत्या म्हणजे...
व्यवस्थेचा पराभव, पालकांच्या अपेक्षांचे ओझे, शाळांच्या स्पर्धात्मक अहंकाराचे बळी आणि सरकारी दुर्लक्षाचे परिणाम आहेत..
प्रत्येक बळीचा जीव हा ‘अभ्यासामुळे झालेला ताण’ नसून, ‘ताण निर्माण करणाऱ्या व्यवस्थेचे अपयश’ आहे.
🎓 आता उपाय हवा – ओरड नव्हे, उपदेश नव्हे, धोरणे आणि संवेदनशीलता…
✔️ शाळांमध्ये मॅन्डेटरी समुपदेशन केंद्र..
प्रत्येक शाळेत प्रमाणित समुपदेशक असणे बंधनकारक करावे.
विद्यार्थ्यांना भीती, ताण, न्यूनगंड, एकटेपणा याबाबत बोलता येईल असा सुरक्षित कोपरा उपलब्ध व्हावा.
✔️ फी-कंट्रोल आणि शाळांवरील व्यापारीकरणाला कठोर आळा..
शिक्षण सेवा नाही, तर व्यवसाय बनला आहे...फी मर्यादा, पारदर्शक खर्च, "अनिवार्य डोनेशन" वर पूर्ण बंदी..हे तातडीने करण्याची वेळ आली आहे.
✔️ पालकांना भावनिक शिक्षण आणि जागरूकता..
पालक हे मुलाचे पहिले शिक्षक पण भावनिक शहाणपण अनेकदा त्यांच्या हातात नसते...अपेक्षांचे ओझे कसे द्यायचे? अपयशात हात कसा धरायचा?
हे शिकवण्यासाठी पालक प्रशिक्षण कार्यशाळा अनिवार्य कराव्यात.
✔️ शिक्षकांना मानसिक आरोग्याचे वैज्ञानिक प्रशिक्षण..
शिक्षक फक्त विषय शिकवत नाही; ते जगण्याचे धडे देतात.
म्हणून मानसिक ताण ओळखणे, विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल समजणे, भावनिक संवाद कौशल्य..हे प्रशिक्षण बंधनकारक असावे.
✔️ 10 वी–12 वीला जीवन-मरणाची परीक्षा न बनवणे..
परीक्षेत अपयश म्हणजे आयुष्य संपले असा भ्रम मोडणे गरजेचे आहे...रिझल्ट्सपेक्षा कौशल्य, चारित्र्य, प्रवास, प्रगती..ही मोजमापाची मानके बनवायला हवित, असं मला वाटतं..
✔️ विद्यार्थी-केंद्रित आणि कौशल्याधारित अभ्यासक्रम..
शिकण्यापेक्षा रटाळ पाठांतरावर जोर देणारी पद्धती बदलणे आवश्यक आहे.
कला, क्रीडा, कौशल्य, तंत्रज्ञान, उद्योजकता सर्व क्षेत्रांना समान सन्मान मिळाला पाहिजे.
✔️ अनावश्यक तुलना आणि रँकिंग संस्कृतीवर बंदी..
‘टॉपर’ हा शब्द गौरवाचा नाही तर तो मानसिक दबावाचा स्रोत झाला आहे.
विद्यार्थ्यांना एकमेकांविरुद्ध उभे करणारी ही व्यवस्था संपायला हवी.
✔️ सोशल मीडिया दबाव आणि सायबर-बुलींगसाठी संरक्षण..
विद्यार्थ्यांवरील ऑनलाइन अपमान, तुलना, शो-ऑफ, आणि बुलींगमुळे ताण प्रचंड वाढतो..
शाळांनी डिजिटल सुरक्षिततेवर विशेष प्रशिक्षण देणे आवश्यक.
✔️ शाळांमध्ये भावनिक साक्षरता (Emotional Literacy) विषय
विद्यार्थ्यांना भावना समजणे, ताण हाताळणे, संवाद करणे, मदत मागणे—हे शाळातच शिकवायला हवे..
मैथ्सपेक्षा महत्त्वाचे कधी कधी हे असते.
✔️ करिअर मार्गदर्शन प्रणाली मजबूत करणे..
अनेक विद्यार्थी ‘मी कोण?’ ‘कुठे योग्य?’ याचा शोध न लागल्याने गोंधळात पडतात..
प्रत्येक शाळेत करिअर समुपदेशक असणे अत्यावश्यक.
✔️ छळ, अपमान आणि शिक्षकांकडून होणाऱ्या मानसिक अत्याचारावर कठोर कारवाई..
शाळांतील अपमान, वर्गात हिणवणे, शिक्षा देण्याच्या नावाखाली मानसिक त्रास...यावर नियम आणि शिक्षा कठोर असाव्यात.
शिक्षण म्हणजे संवेदनशीलता, दडपशाही नव्हे.
✔️ विद्यार्थी-शाळा-पालक संवादांची सुरक्षित त्रिसंस्था..
प्रत्येक समस्येचे समाधान संवादातूनच सुरू होते. नियमित, प्रामाणिक आणि तटस्थ संवाद प्रणाली आवश्यक.
✔️ बालमैत्रीपूर्ण, ताणमुक्त कॅम्पस संस्कृती
शाळेला ‘दबावाचे ठिकाण’ नव्हे; तर ‘आनंदाने शिकण्याचे ठिकाण’ बनवणे आवश्यक..
ओपन-डोअर पॉलिसी, विद्यार्थी समित्या, तक्रार निवारण व्यवस्था मजबूत करणे गरजेचे.
✔️ शासनाने मानसिक आरोग्यावर विशेष बजेट..
मानसिक आरोग्याचे बजेट अत्यल्प आहे..आत्महत्यांचे प्रमाण कमी करायचे असेल तर मानसिक आरोग्य हे ‘साइड इश्यू’ नसून ‘मुख्य प्राधान्य’ बनले पाहिजे.
✔️ विद्यार्थ्यांसाठी 24×7 हेल्पलाइन आणि तातडीची मानसोपचार सेवा
संकटाची क्षणाक्षण महत्त्वाची..
हेल्पलाइन, ऑन-कॉल समुपदेशक, तातडीचे हस्तक्षेप केंद्र..ही राज्यभर तातडीने विस्तारली पाहिजेत.
“विद्यार्थी वाचले, तरच भविष्य वाचेल.”
विद्यार्थी आत्महत्या थांबवणे म्हणजे फक्त जीव वाचवणे नाही तर
ते संपूर्ण समाज वाचवण्याचे काम आहे.
ही समस्या कोणाची नाही; ती आपणा सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे..
आता शब्द नव्हे; धोरणे, कृती आणि मानवी संवेदनशीलता आवश्यक आहे...
विद्यार्थी हा राष्ट्राचा संभाव्य प्रकाश आहे; त्याच्या मनातील छोट्याशा जखमेने संपूर्ण भवितव्य अंधारात जाते...
🌱 शेवटचा प्रश्न — आपण पुढचा मुलगा वाचवणार का..?
शाळांच्या भांडवलशाहीला थारा देणार आहोत?
की मुलांच्या मनात भीती नव्हे तर विश्वास पेरणार आहोत..?
विद्यार्थी आत्महत्यांचा प्रश्न हा समाजाच्या अंतरात्म्याला हादरे देणारा प्रश्न आहे..
तो फक्त मानसशास्त्राचा नाही… तर तो मूल्यांचा आहे..
तो व्यवस्थेचा आहे आणि बदलाची सुरुवातही आपल्यापासूनच.
“विद्यार्थ्यांचे जीव केवळ त्यांची जबाबदारी नाहीत ते आपल्या संपूर्ण समाजाच्या विवेकाची परीक्षा आहेत.”
जेव्हा एक मुलगा मरण निवडतो, तेव्हा त्याने नाही
आपण हरतो...आपण दिलेली भीती हरते, दिलेलं ओझं हरतं, आणि आपली संवेदनाहीन व्यवस्था हरते.
आत्महत्यांच्या आकड्यांवर अश्रू ढाळणे पुरेसे नाही;आकडे थांबवणारी कृती करणे हीच खरी शोकांजली आहे.
आजचा प्रश्न साधा आहे..?
आपण मुलांना दडपण देणार का, की दिशा देणार? भीती वाढवणार का, की आधार देणार?
कारण उद्याचे भविष्य परीक्षेत नाही,तर ते आज जिवंत राहिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या धडधडीत आहे.
🔰 माहिती स्रोत : NCRB 2019 ते 2023 या काळात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये 72% वाढ नोंदली गेली आहे. 2019 च्या तुलनेत, 2020 मध्ये आत्महत्यांचे प्रकरण 100 वरून 2,100 ने वाढले, आणि 2023 मध्ये आणखी 848 ने वाढ झाली...
(नोंद : ही वाढ केवळ आकडे नसून शिक्षणव्यवस्थेतील वाढत्या ताणाची गंभीर चेतावणी आहे.)
माहिती संकलन आणि संपादन.. ✍️
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक शिक्षणप्रेमी, साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#StudentSuicideCrisis #StopStudentSuicide #EducationReform #MentalHealthMatters #SaveStudentsSaveFuture #MaharashtraEducation #ExamPressure #NoMorePressure #EducationalSystemFailure #CounsellingInSchools #RightToEducation #EducationForAll #AntiBullying #EmotionalLiteracy #ParentingMatters #TeacherTraining #StudentsFirst #SkillBasedEducation #StopComparison #EndRankingCulture #StudentRights #YouthMentalHealth #NCRBData #EducationCrisis #SocialAwareness #WakeUpSociety #ReformEducationNow #LetChildrenLive #NoMoreFear #EducationJustice #emotionalhealth #StudentSupport #BreakTheSilence #StopAcademicTorture #EducationNotBusiness #SaveOurChildren #BuildStrongMinds #NationFirstStudentsFirst #MentalHealthAwareness #SpeakUpForStudents #EndAcademicPressure #TransformEducation
Post a Comment