शेती, सहकार, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रात त्यांनी केलेल्या लोककल्याणकारी योजनांनी महाराष्ट्राला केवळ विकासाची गती दिली नाही; तर सामान्य माणसाच्या आयुष्याला स्वाभिमान, संधी आणि स्थैर्य दिले. त्यांच्या धोरणांत मातीचा सुगंध होता, आणि निर्णयांत भविष्याचा नकाशा.
यशवंतराव चव्हाण हे शक्ति-केंद्र नव्हते, ते दिशा-केंद्र होते..
जनतेला विचार देणारे, नेतृत्वाला चरित्र देणारे आणि विकासाला मानवी मूल्यांची चौकट देणारे.
आजच्या अस्थिर, तुटक आणि स्पर्धात्मक समाजव्यवस्थेत त्यांची विचारसंपदा अधिक आवश्यक भासते..कारण विकास ही केवळ अर्थव्यवस्थेची वाढ नसते; ती समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय, संधी आणि सुरक्षितता देण्याची सामूहिक जबाबदारी असते.
यशवंतराव चव्हाण नेहमी सांगत.. ✍️
“समाजाची उन्नती तुटकतेतून होत नाही; एकतेतून होते.” धर्म, जात, भाषा, प्रदेश यांतून विभागणी नव्हे, तर समानतेचा भाव वाढवणे हेच खरे राष्ट्रनिर्माण.
शाश्वत विकासाची भक्कम पायाभरणी करणाऱ्या या उत्तुंग नेतृत्वाला पुण्यस्मरण दिनानिमित्त कृतज्ञ अभिवादन...💐💐🙏
त्यांचा एक वैचारिक चाहता.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,🙏
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन.. ✍️
Post a Comment