“ जिद्द ही नशिबाची जननी आहे; आणि मेहनत त्याचा खरा शिल्पकार..”✍️
आयुष्याला पाहण्याचा दृष्टिकोनच आपल्या प्रवासाची दिशा बदलतो. सकारात्मकता ही केवळ भावना नसते तर ती जीवनाला वळण देणारी अदृश्य सुकाणू असते.
“मेहनत” हाच मानवाचा खरा अलंकार आहे..
मानवाच्या चारित्र्याला आकार देणारा, त्याच्या आयुष्याचे मातीपासून शिल्प बनवणारा कुंभार म्हणजे मेहनत.
आपण एक सत्य मान्य करायलाच हवे.. ✍️
“मेहनतीला कधीच हुशारीची गरज नसते; मेहनत स्वतःचं सर्वात मोठा बुद्धिवाद असतो.”
परंतु आज आपल्या समाजाची शोकांतिका अशी की सक्षम हात, कणखर पाय, जागा असलेला विवेकी मेंदू आणि कोटी क्षमतांनी भरलेले हृदय असताना देखील आपण परिस्थितीशी हरतो…
जणू “मेहनत” हा शब्द आपल्या शब्दकोशातूनच पुसला गेला आहे?
आपण नशिबाच्या गोंजारण्यात हरवून बसलो आहोत?
जोतीषाच्या भाकितांनी आपली इच्छा ठरते, आणि नशिबाच्या नावाखाली आपण स्वतःच स्वतःला माफ करून टाकतो.
🌟 नशिबाची खरी व्याख्या... ✍️
एक माणूस दिवस-रात्र कष्ट करतो…अडचणींचा सामना करतो, झोप व सुख त्यागतो, वेदना सहन करतो…आणि जेव्हा अखेरतो यशस्वी होतो..
तेव्हा लोक म्हणतात..
“खूप नशिबवान आहे हा..!”
पण त्या “नशिबा”च्या मागे त्याने विणलेली हजारो संघर्षांची दोरी कोणी पाहत नाही...लोक “नशिब” म्हणतात, पण सत्यात ते मेहनतचं वाखाणत असतात.
🌑 आम्ही बनवलेली नशिबाची खोटी व्याख्या..
मेहनतीपासून पळ काढणे..
अन्यायकारक स्वप्नांनी कल्पनेच्या महालात राहणे आणि अपयश पदरी आलं की स्वतःच स्वतःला सांगणे..
“ माझ्या नशिबातच नव्हतं...!”🫣
ही आहे आपण घडवलेली नशिबाची व्याख्या...नशीब म्हणजे खरे तर मेहनतीपासून केलेली स्वतःची सुटका..!
🌱 निर्मात्याने आपल्याला कमी काय दिलंय…?
आपल्याला डोकं दिलं विचारांचे पीक पिकवण्यासाठी;
पण आपण त्याचा उपयोग फक्त केसांचा भांग पाडण्यासाठी करतो.
आपल्याला वाणी दिली विचारांना सौंदर्य देण्यासाठी;
पण आपण तिला शिव्यांच्या कटुतेत खर्च करतो.
आपल्याला हात दिले सृजनासाठी;
पण आपण त्यांच्यात दारूचे प्याले आणि धुराचे व्यसन धरतो.
आपल्याला पाय दिले यशाच्या दिशेने धावण्यासाठी;
पण ते चालायलाही विसरले आहेत.
आपल्याला हृदय दिलं करुणेचे पाणी वाहू देण्यासाठी;
पण आपण त्यात अहंकाराची वणवा पेटवून ठेवली आहे.
आपल्याला डोळे दिले स्वप्नांच्या क्षितिजाकडे पाहण्यासाठी;
पण आपण त्यांचा वापर इतरांच्या यशाचा हेवा पाहण्यासाठी करतो.
आपल्याला कान दिलेत ज्ञानाचे वचन ऐकण्यासाठी;
पण आपण त्यांना अफवा आणि वादाच्या कोलाहलात अडकवतो.
आपल्याला मेंदू दिला योग्य निर्णय घेण्यासाठी;
पण आपण त्याला शंका आणि भीतींच्या तुरुंगात बंद करून ठेवतो.
आपल्याला वेळ दिली जीवन घडवण्यासाठी;
पण आपण ती मोबाईलच्या पडद्यावरच विखुरून टाकतो.
आपल्याला स्वप्नशक्ती दिली उंच भरारी घेण्यासाठी;
पण आपण तिला आळशीपणाच्या बेडीत कैद करून ठेवतो.
आपल्याला जबाबदारी दिली स्वतःचे भविष्य घडवण्यासाठी;
पण आपण ती नशिबाच्या पायावर ढकलून देतो.
आपल्याला बुद्धी दिली योग्य–अयोग्य ओळखण्यासाठी;
पण आपण तिला बहाण्यांच्या धुक्यात हरवून बसलो आहोत.
आपल्याला हसणं दिलं आनंद पसरवण्यासाठी;
पण आपण ते कटुता, तक्रारी आणि चिडचिडीत दडपून ठेवतो.
आपल्याला विचारशक्ती दिली समस्यांना उत्तरं शोधण्यासाठी;
पण आपण तिला समस्या वाढवण्यासाठी वापरतो.
आपल्याला मन दिलं उमेद पेरण्यासाठी;
पण आपण त्यात निराशेची काटेरी झुडपं वाढवतो.
आपल्याला स्वातंत्र्य दिलं उंच भरारी घेण्यासाठी;
पण आपण सवयींच्या कैदेत स्वतःलाच बंदिस्त करून ठेवतो.
आपल्याला स्वप्नांचा सूर्य दिला डोळ्यांत झळकण्यासाठी;
पण आपण आळशीपणाच्या ढगांनी तोच सूर्य झाकून टाकतो.
आपल्याला ज्ञानाची भूक दिली वाढण्यासाठी;
पण आपण तिला मनोरंजनाच्या कचऱ्यात पुरून टाकतो.
आपल्याला विवेक दिला निर्णयांना उजेड देण्यासाठी;
पण आपण त्याला भावनांच्या अंधारात हरवून टाकतो.
निर्मात्याने आपल्याला सर्व काही दिलंय..फक्त आपणच स्वतःला हरवून बसलो आहोत.
🎓जिद्द + मेहनत = चमत्कार.. ✍️
जिद्द आणि मेहनत एकत्र आल्या की जगातील अशक्य वाटणाऱ्या गोष्टींची दारे उघडतात.
आपण एखादी छोटी इच्छा पूर्ण न झाल्यावर नाराज होतो…
पण ज्यांचा जन्मच शारीरिक अपंगत्वाने झाला..ते ना रडतात, ना हारतात…ते परिस्थितीशी लढतात, पडले तरी उठतात, आणि जीवनाला स्वतःच्या ताकदीने आकार देतात.
त्यांचे शरीर अपूर्ण असले तरी त्यांची जिद्द पूर्ण असते...आणि आपण… सक्षम असूनही अपयशाचे कारण “नशीब” शोधत बसतो.
“ मेहनतीला हुशारीची गरज नसते; पण मेहनत केल्याशिवाय नशीबही उघडत नाही. ”
नशिब बदलायचं असेल तर विचाराला प्रकाश द्या, कृतीला आग द्या,आणि मेहनतीला प्रार्थना माना, मित्रांनो..
तेव्हाच यशाची उंची तुमच्या पावलांच्या आवाजावर खुली होईल.
जीवनाचा प्रवाह बदलणारी शक्ति नशिबात नसते; ती आपल्या मनात, आपल्या विचारात आणि आपल्या कृतीत दडलेली असते..
जेव्हा माणूस स्वतःकडून पळ काढणं थांबवतो, तेव्हा नशिब नावाचं गूढही त्याच्यासमोर नतमस्तक होतं.
मेहनत हा केवळ हातांचा घाम नसतो; ती आत्म्याची शुद्धी, विचारांची साधना आणि स्वप्नांना आकार देणारी जीवनशक्ती असते.
जग बदलणारे लोक “नशिबवान” नसतात ते जिद्दीवान असतात.
म्हणूनच, स्वतःला हरवून बसलेल्या मनाला पुन्हा एकदा जागं करा, आतल्या क्षमतेचा दिवा पेटवा, आणि आयुष्याला आपल्या मेहनतीच्या करंगळीने उचलून धरा.
त्या क्षणापासून फक्त यशाची दारं नव्हे समग्र जग तुमच्या पावलांच्या आवाजाला प्रतिसाद देईल, मित्रांनो..
धन्यवाद मित्रांनो..!
लेख आवडला असेल, तर आपल्या प्रियजनांसोबत नक्कीच शेअर करा.🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
सकारात्मक विचार शेअर करणे हीच मानसिक आणि सामाजिक शक्ती वाढवण्याची सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण प्रेरणादायक विचार इतरांसोबत वाटतो, तेव्हा ती ऊर्जा द्विगुणित होते आणि आपले जीवन अधिक सकारात्मक आणि समृद्ध बनते. त्यामुळे, चांगल्या गोष्टी शेअर करत राहा आणि एकमेकांना पुढे जाण्यास प्रेरित करा मित्रांनो..!
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक पुस्तकप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#LifeLessons #PositiveThinking #Hardwork #Motivation #Inspiration #SuccessMindset #MarathiMotivation #MarathiQuotes #Philosophy #LifeGoals #SelfGrowth #MindsetShift #WisdomWords #StruggleToSuccess #BelieveInYourself #Dedication #NeverGiveUp #PowerOfThoughts #AttitudeMatters #DailyMotivation #MarathiThoughts #Uddyam #Jidd #Manogat #SelfRealization #InnerStrength #FocusOnGrowth #LifeTransformation #WorkEthic #DestinyVsHardwork #SuccessJourney #ThinkPositive #PersonalDevelopment #MentalStrength #KarmYog #LifeTruths #SoulWisdom #MarathiInspiration #WakeUpCall #PurposefulLiving #MotivationalWriting #ThoughtProvoking #awakening
Post a Comment