“ज्ञानवती स्त्री हाच समाजाचा सर्वात मौल्यवान ‘भविष्योत्तर शृंगार’ आहे.”
🌺 शृंगारापेक्षा ज्ञानाची निवड करणारी स्त्री — समाजाच्या भवितव्याची जननी... ✍️
समाजाच्या इतिहासात काही स्त्रिया अलंकारांनी नव्हे…तर विचारांच्या तेजाने ओळखल्या जातात.
शरीराला सुशोभित करणारा शृंगार क्षणभंगुर असतो;परंतु बुद्धीला उजळवणारे ज्ञान शतकानुशतके मानवतेचा मार्ग उजळत राहतं.
“ जी स्त्री आपल्या शृंगाराच्या पैशांतून पुस्तके विकत घेते, आणि स्वतः वाचते ती समाजात धाडसी व महान संततीचा जन्म देते.”
हे वाक्य केवळ प्रशंसा नाही; ही समाजाला केलेली जागृतीची घोषणा आहे.
🎓 ज्ञानाची किंमत आणि स्त्रीची निवड..
स्त्रीने अलंकार घालावेत, हे कुणी नाकारत नाही; पण जर ती त्या अलंकारांपेक्षा पुस्तकांना महत्त्व देते, तर ती फक्त स्वतःला बदलत नाही तर ती पुढील पिढीचा मानसिक आकार घडवते.
कारण…
ज्या हातात कधी कंगनांची खणखण असते, तिथे जेव्हा पुस्तकांची पाने उलटतात, तेव्हा समाजात विचारांची क्रांती जन्म घेते.
🌼 वाचणारी आई म्हणजे चालत्या-बोलत्या विद्येचं मंदिर असतं..
वाचणारी स्त्री म्हणजे.. ✍️
✔ विचारांची शिल्पकार
✔ संस्कारांची जननी
✔ समतेची वाहक
✔ आणि समाजाच्या प्रगतीची बीजवाहक..
तिच्या वाचनातून जन्म घेतात…
धाडसी नेते, बुद्धिमान विचारवंत, समाजसुधारक, शास्त्रज्ञ, आणि कर्तृत्ववान नागरिक...
कारण आई वाचते तेव्हा मुलं विचार करायला शिकतात.
आई जागृत असते तेव्हा पिढ्या जागृत होतात.
🎓 स्त्रीचा खरा अलंकार — तिचं ज्ञान..✍️
सोनं, चांदी, मोती हे बाह्य सौंदर्य आहे; पण ज्ञान हे स्त्रीचं शाश्वत भूषण आहे.
ते तिला देते…स्वाभिमान, विवेक,आत्मविश्वास,सामाजिक जाण, स्वातंत्र्याची ओळख आणि सर्वात महत्त्वाचं..अंध:कारातून प्रकाशाकडे नेणारी अंतशक्ती.
🌟 ज्ञानवती स्त्री म्हणजे समाजाच्या भविष्याची दिशा..
ती फक्त मुलांना जन्म देत नाही; ती मूल्यांना जन्म देते. ती विचारांना जन्म देते...ती नव्या जगाला जन्म देते.
आईचे वाचन म्हणजे मुलांच्या भविष्याची भक्कम पायाभरणी..
पुस्तके म्हणजे तिच्या मनातील दिव्यांचे दिवटं...आणि तिचा विचार म्हणजे समाजाच्या प्रगतीचा नकाशा.
🎓समाज बदलायचा असेल, तर स्त्रीला पुस्तक द्या..
शृंगाराने घर सुशोभित होतं; पण ज्ञानाने संपूर्ण पिढी घडते.
आज प्रत्येक घरातील स्त्रीने..किमान महिन्यात एक तरी पुस्तक उचललं पाहिजे...ती स्वतः वाचली तर तिचं मुलं कधीही अंध:विश्वासाच्या सावलीत वाढणार नाहीत.
कारण वाचणारी आई,..हेच सर्वात मोठं परिवर्तनाचं बीज आहे.
ज्ञानाची ज्योत पेटवणारी स्त्री हीच खरी वीरांगना,आणि तिच्या हातात निर्मित होणारी पिढी..समाजाच्या भविष्याची सर्वात मोठी आशा असते.
स्त्रीने शृंगारापेक्षा ज्ञानाची निवड केली की, तिचा प्रकाश फक्त तिच्या आयुष्यात मर्यादित राहत नाही तर तो संपूर्ण समाजाचा भविष्यकाळ उजळतो.
“ज्या स्त्रीच्या हातात पुस्तक असतं, तिच्या मनात भविष्याचा नकाशा असतो.”
कारण सुशोभित चेहरा काही क्षण मोहवतो, पण सुजाण विचार शतकानुशतके मार्गदर्शक ठरतात.
म्हणूनच, पुस्तक हातात घेणारी स्त्री म्हणजे बदलाची पहिली घोषणा, प्रगतीची पहिली पायरी, आणि मानवी सभ्यतेचा खरा शिल्पकार. ती वाचते म्हणजे घर उजळतं; ती विचारते म्हणजे समाज जागृत होतो; आणि ती जागृत होते म्हणजे संपूर्ण राष्ट्र जागृत होतं.
अशा प्रत्येक ज्ञानवती स्त्रीला सलाम..कारण तिच्या हातात फक्त पुस्तक नसतं, तर उद्याच्या चांगल्या जगाची गुरुकिल्ली असते.
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#ज्ञानवतीस्त्री #WomenEmpowerment #स्त्रीशक्ती #EducationForWomen #ReadToLead #PustakPrerna #शृंगाराऐवजीज्ञान #ज्ञानाचीज्योत #MotherOfFuture #InspirationalMarathi #Vichardhan #SamajSudharna #WomenEducation #ज्ञानहेशक्ती #Vivekvad #SocialAwareness #MarathiArticle #Prabodhan #ThoughtfulWriting #WomenWithBooks #ReadMore #BooksChangeSociety #ज्ञानवतीआई #FutureMakers #MarathiMotivation #EmpowerWomen #SamajParivartan #KnowledgeIsBeauty #ज्ञानशृंगार #educatewomen #VicharPravah #marathiwriter #rafiqueshaikhwrites #TheSpiritOfZindagi #InspireEducateEmpower
Post a Comment