🔥 संविधान: लोकशाहीचा दीपस्तंभ.. ✍️
🔰आज 26 नोव्हेंबर...भारतीय संविधान दिन..✍️
केवळ एक दिनांक नाही, तर विचारांचा, संघर्षांचा आणि मानवी मूल्यांचा सुवर्ण अध्याय आहे. या दिवशी आपण फक्त संविधानाचा गौरव करत नाही, तर त्यामागील महान बुद्धिमत्ता आणि अटळ संघर्ष यांनाही प्रणाम करतो.
भारताचे सार्वभौमत्व, एकात्मता, न्याय, स्वातंत्र्य आणि समानता ही केवळ घोषणाबाजी नाही; ती संविधानाने दिलेली जिवंत हमी आहे. या मूल्यांमुळेच प्रत्येक नागरिकाला भीतीविना प्रश्न विचारण्याचा अधिकार, भेदभावाविना जगण्याची प्रतिष्ठा आणि स्वप्न पाहण्याची समान संधी मिळते.
या महान दस्तऐवजामागे दूरदृष्टी, अद्वितीय बुद्धिमत्ता आणि सामाजिक न्यायाची जाज्वल्य आकांक्षा असलेली व्यक्ती उभी आहे.. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी केवळ लेखन नाही केले; तर त्यांनी विचारांना संविधानात रूपांतरित केले.
आजच्या दिनी आपण स्वतःला एक प्रश्न विचारला पाहिजे..
“ आपण संविधानाचा लाभ घेणारे नागरिक आहोत की त्याच्या मूल्यांचं पालन करणारे जबाबदार नागरिक..?”
कारण संविधान फक्त न्यायालयात नव्हे तर आपल्या विचारात, वर्तनात आणि कृतीत जगलं पाहिजे.
आज, संविधान दिनानिमित्त..डॉ. बाबासाहेबांना कृतज्ञ अभिवादन
आणि सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा, मित्रांनों..
🌿 संविधान जपा, विचार जपा… कारण राष्ट्र तेव्हा महान बनतं, जेव्हा त्याचे नागरिक न्याय आणि मूल्यांना सर्वाधिक प्राधान्य देतात. 🌿
जय भिम,जय संविधान, जय भारत..! 🇮🇳
- एक संविधान प्रेमी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment