मानवाच्या दुःखाचं खरं मूळ कारण आहे...मी, अहंकार, स्वार्थ आणि स्वकेंद्रित विचार.. ज्या क्षणी माणूस आपल्या या दुर्गुणांवर विजय मिळवतो, त्या क्षणी त्याचं जीवन नव्या प्रवाहात वाहू लागतं, जणू एखादं ओसाड झाड पावसाच्या सरींनी पुन्हा फुलून येतं.
मात्र, या विशाल जगात अशा दुर्मिळ आत्मा फार थोडे असतात जे स्वतःच्या दोषांवर मात करून परमशांतीचा मार्ग निवडतात. अशी माणसं बहुधा सांसारिक कलहांपासून दूर राहतात, म्हणूनच अहंभावाच्या दलदलीत अडकलेल्या व्यक्तींना योग्य प्रेरणास्थान सहज मिळत नाही..
मग प्रश्न उभा राहतो...त्यांना दिशा दाखवणार कोण?
आत्मजागृतीच्या वाटेवर दीपस्तंभ होणार कोण?
समाज बहुधा स्वतःचे दुर्गुण दडवतो, पण त्यांना नष्ट करण्यासाठी महात्म्यांचं मार्गदर्शन स्वीकारायला कचरतो. प्रत्यक्षात, आत्मपरीक्षणाशिवाय कोणताही सुधार नाही. जेव्हा माणूस स्वतःच्या वाईट गुणांकडे आरशात पाहतो, तेव्हा तो आतून प्रगल्भ होऊ लागतो.
परंतु, भौतिक संसाराचा कल्लोळ, नात्यांची ओढ, अपयशाचं ओझं....हे सारे घटक मनुष्याला पुन्हा त्याच्या स्वतःच्या चांगुलपणापासून दूर नेतात. तरीसुद्धा खरी जाणीव हीच आहे की,जीवन सुखी की दुःखी व्हावं, याचा निर्णय दुसरा कोणी नाही तर तो स्वतःच घेतो.
जर तो चिंतन-मनन करून आपल्या अपयशात धडे शोधू लागला, दुःखातून धीर घेऊ लागला, पश्चात्तापातून नवं बळ उभं करू लागला, तर त्याचं आयुष्य परोपकार, पुण्य आणि उदात्त कर्तृत्वाने उजळून निघेल..
सत्य, सद्गुण आणि आत्मसंयम हे जेव्हा त्याच्या जीवनात उतरतात, तेव्हा भौतिक सुखाच्या तुलनेत आत्मिक शांतीचं सौंदर्य अधिक तेजस्वी भासू लागतं.
वैचारिक परिपक्वता हीच खरी मुक्ती आहे..
जशी जशी माणूस दुर्बलतेच्या बंधनातून मुक्त होतो, तसतसं त्याचं आयुष्य शांतीपूर्ण, आनंदी आणि अर्थपूर्ण होतं.
मनुष्य जर स्वतःवर विजय मिळवला, तरच तो खऱ्या अर्थाने जगावर विजय मिळवतो.
मनुष्याच्या हातात सर्वात मोठं अस्त्र तलवार नाही, सत्ता नाही, संपत्ती नाही...
सर्वात मोठं अस्त्र आहे त्याचं स्वतःवरचा विजय..
जो स्वतःच्या स्वार्थाला जिंकतो, जो अहंकाराला शरण घालतो, जो आत्मशांतीचा मार्ग स्वीकारतो..तोच खऱ्या अर्थाने विजेता ठरतो.
कारण पर्वत जिंकणं सोपं आहे, पण स्वतःच्या मनाला जिंकणं कठीण आहे...आणि जो स्वतःच्या मनाला जिंकतो, तोच अखेर संपूर्ण जगावर अधिराज्य गाजवतो.
-विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#आत्मजागृती #आत्मसंयम #जीवनतत्त्वज्ञान #प्रेरणादायीविचार #अहंकारविजय #सद्गुणांचीशक्ती #मनशांती #विचारप्रवर्तक #जीवनाचेसत्य #खराविजय #SelfAwareness #InnerPeace #PowerOfVirtue #MindOverMatter #WinYourself #TrueVictory #LifeWisdom #InspirationDaily #SpiritualGrowth #Motivation #विद्यार्थीप्रेरणा #YuvaShakti #LifeLessons #KalamFoundation #SpiritOfZindagi #YouthInspiration
Post a Comment