जगभरातील क्रांतिकारकांमध्ये सर्वात तेजस्वी, धाडसी आणि आकर्षक व्यक्तिमत्व म्हणजे चे ग्वेरा.. एक नाव, एक विचार, आणि एक अखंड लढा..!
अमेरिकेसारख्या बलाढ्य भांडवलशाही साम्राज्याच्या छाताडावर बुट ठेवून न्यायाचा झेंडा फडकवणारा हा योद्धा केवळ क्यूबाचा नव्हे, तर संपूर्ण मानवजातीचा क्रांतिकारी प्रतिनिधी ठरला.
त्याने दाखवून दिलं..“क्रांती बंदुकीच्या गोळ्यांमध्ये नाही, तर ती विचारांच्या ठिणग्यांमध्ये जिवंत राहते.”
चे ग्वेराने जगाला शिकवलं की अन्यायाविरुद्ध उभं राहणं म्हणजे... दंगली करणं नव्हे, तर विवेकाच्या रणांगणात विचारांनं लढणं होय..
त्याची विचारसरणी ही केवळ ‘कम्युनिझम’ नव्हे, तर मानवतेच्या समतेचा आणि स्वाभिमानाचा शाश्वत मंत्र आहे.. जी आजही जगातल्या विविध देशातील नवं-तरुणांना आकर्षित करते आहे..
त्याने आपल्याला सांगितलं...
“जर तू अन्याय पाहतोस आणि शांत राहतोस, तर तू अत्याचाराचा भाग आहेस.”
हीच ओळ आजच्या प्रत्येक युवकासाठी आरसा ठरावी..की, क्रांती म्हणजे पोस्टवर ‘लाल सलाम’ लिहिणं नाही, तर रोजच्या जीवनात न्याय, सत्य आणि मानवी मूल्यांसाठी उभं राहणं आहे.
चे ग्वेराचं आयुष्य म्हणजे विचारांचा धगधगता ज्वालामुखी.. आणि त्या राखेतून उगवणं म्हणजे नवी क्रांती, नवं भान, नवं -परिवर्तन आणि नवं मानवतावाद..
महान क्रांतिकारी, विचारांचे शिल्पकार, आणि शोषितांचा तारणहार...कॉम्रेड आणि वैचारिक कमांडर चे ग्वेरा ... यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
क्रांती मरणार नाही, जोपर्यंत एक तरी माणूस न्यायासाठी श्वास घेतो...!
त्याचा वैचारिक चाहता.. ✍️
- एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment