एक वैचारिक हाक निसर्गासाठी, मानवतेसाठी आणि येणाऱ्या भविष्याच्या अस्तित्वासाठी..!
आज आपण प्रगतीच्या नावाखाली जे काही घडवत आहोत, ते खरंच प्रगती आहे का... की विनाशाचा आरंभ? ही वेळ आहे आरशात स्वतःकडे पाहण्याची..कारण आम्ही तळमळतोय स्वतःसाठी नाही,..तर येणाऱ्या पिढ्यांसाठी..!
निसर्ग, जो आपल्याला जन्मापासून पोसतो, सावली देतो, श्वास देतो,त्याचं आपणचं रक्त शोषून घेतो आहोत विकासाच्या आंधळ्या नावाखाली..!
जंगलं रिती झाली, नद्या सुकल्या, आकाश धुराने भरलं…
पण तरीही सत्ताधाऱ्यांच्या फाइलमध्ये निसर्गाचं नाव नाही,
त्यांच्या घोषणेत “विकास” आहे, पण “पर्यावरण” हरवलं आहे.
संशोधक सांगतात..पुढची 10 ते 15 वर्षं मानवजातीसाठी निर्णायक असतील...जर आपण आता थांबलो नाही, तर निसर्ग थांबवेल पण त्याच्या उग्रतेनं..!
तो आधीही दाखवून गेला आहे, वादळांनी, पूरांनी, दुष्काळांनी.
निसर्गाच्या रागात माणसाची शक्ती क्षणात वितळते…
कारण तो सूड घेत नाही.. तो संतुलन परत मिळवतो! ⚡
आम्ही मरायला तयार आहोत, पण आमची मुलं तडपत असताना जग बघणं...हे कोणत्याही संवेदनशील माणसाला शक्य नाही.
कारण आमचं जीवन संपेल, पण त्यांचं भविष्य संपणार आहे.
आम्ही जे आहोत, ते पृथ्वीचं एक पान आहोत;पण त्यांनी जे यावं, ते संपूर्ण पुस्तकचं हिरावलं जाणार आहे!
🏛️ व्यवस्था कोसळली आहे आणि आपण गप्प आहोत…
गावकडून देशाकडे पाहिलं, तर सगळीकडे एकाच रोगाचं संक्रमण दिसतं भ्रष्टाचार, लोभ, स्वार्थ आणि संवेदनाशून्यता.
जनतेचा विश्वास विकला गेला आहे,शेतकऱ्यांचा घाम लुटला गेला आहे,आणि गरीबांच्या आशा सत्तेच्या पायात चिरडल्या गेल्या आहेत.
हेच पुढारी, हेच भांडवलदार,रक्तपिपासू गिधाडांसारखे आपल्यावर जगतात.ते तुमच्या मुलांच्या भविष्याचा व्यापार करतात,आणि तुम्ही — तुमच्या भीतीच्या कैदेत शांत बसता.
हीच शांतता उद्याच्या विनाशाची बीजे पेरते..!
🔥 “प्रश्न विचारण्याची हिंमत ठेवा!”
ज्यांना सत्ता मिळाली, त्यांनी जबाबदारी गमावली;
ज्यांना जनतेनं मत दिलं, त्यांनी लोकांना विसरलं.
हीच ती वेदना आहे, जी प्रत्येक जागृत माणसाच्या अंतःकरणात पेटलेली आहे.
म्हणून विचार करा..जर आज तुम्ही गप्प बसलात,
तर उद्या तुमच्या मुलांच्या डोळ्यात प्रश्न असेल,
“तुम्ही काय केलंत आमच्यासाठी?”
तेव्हा इतिहास तुमचं मौन क्षमा करणार नाही!
कारण अन्यायाविरुद्ध बोलणं म्हणजे क्रांती नव्हे,
ते म्हणजे मानवतेची जबाबदारी! 🙏
“आता तरी जागे व्हा…”
निसर्गाचा राग थोपवायचा असेल,तर त्याच्या जखमा भरण्याचं काम आपल्यालाच करावं लागेल.प्रत्येक झाड म्हणजे एक प्रार्थना,
प्रत्येक थेंब पाणी म्हणजे एक आशीर्वाद..हे समजून घेतलं, तर अजूनही वेळ गेली नाही.
सत्तेला, भ्रष्टाचाराला आणि निष्क्रियतेला प्रश्न विचारा,
कारण बदल जनतेतूनच सुरू होतो...आपली पिढी जर हरली, तरी चालेल पण येणाऱ्या पिढ्यांना आपण हरवू देऊ नका!
✊ “आम्ही येणाऱ्या पिढ्यांसाठी तळमळतोय…”
ही तळमळ म्हणजे भीती नाही ती चेतना आहे.
ही हाक म्हणजे आंदोलन नाही तर ती आत्मपरीक्षणाची सुरुवात आहे...आपण बदललो, तर जग बदलेल..
कारण निसर्ग वाचवणं म्हणजे मानवतेला वाचवणं होय.
🕊️ विचार संकलन आणि लेखन..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख ✍️
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#आम्हीयेणाऱ्यापिढ्यांसाठीतळमळतोय #SaveNature #NatureConservation #EnvironmentalAwareness #ClimateChange #Nisarg #NisargBachava #ParisarBachava #SustainableFuture #Manavata #HumanityFirst #EarthCrisis #GlobalWarming #MarathiMotivation #Inspiration #SocialAwareness #Prerana #Vivekvad #MarathiThoughts #MarathiBlog #EnvironmentalCrisis #NatureProtection #NisargRakshan #SaveEnvironment #GreenPlanet #FutureGenerations #VoiceForNature #StandForEarth #EcoFriendlyLiving #StopPollution #WakeUpIndia #QuestionTheSystem #AntiCorruption #SocialChange #ResponsibleCitizens #YouthAwakening #ManavDharma #SaveFuture #MotherEarth #ThinkGreen #ActNow #SpiritOfZindagiFoundation #DrAPJAbdulKalamFoundation #VidyarthiMitra #RafiqueShaikh #MotivationalWriter #MarathiWriter #EnvironmentalJustice #SaveOurPlanet #MarathiInspiration #MarathiMotivationalPost #ChangeBeginsWithYou #BeTheVoice #WakeUpCall #NatureForLife #ProtectEarth #EcoConscious #EnvironmentalMovement #GreenRevolution #SustainableLiving #MarathiAwareness #ThoughtfulWriting #MarathiLekh #SocialReform #HumanResponsibility #VoiceOfTruth #NatureBalance #FutureMatters #ClimateCrisis #NatureSpeaks #EnvironmentMatters
Post a Comment