आज आपण स्मरतो त्या व्यक्तिमत्त्वाला, ज्यांनी आपल्या आयुष्याचा प्रत्येक श्वास अंध:काराशी लढण्यासाठी आणि प्रकाशाचा दीप पेटवण्यासाठी अर्पण केला..तो म्हणजे..
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर..!
त्यांचं आयुष्य हे केवळ सामाजिक कार्याचं नव्हतं, तर ते विवेकाच्या, विज्ञानाच्या आणि मानवतेच्या धर्माचं जिवंत उदाहरण होतं.
"श्रद्धा ठेव, पण प्रश्न विचारायलाही विसरू नको!"
हा संदेश डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी समाजाला दिला. त्यांनी धर्म, परंपरा आणि आंधळ्या श्रद्धांच्या बंधनात अडकलेल्या समाजाला जागं करण्यासाठी आपल्या तर्कशक्तीचा दीप पेटवला.
त्यांच्या विचारांत धर्मविरोध नव्हता, तर अंधश्रद्धाविरोध होता;
अंधश्रद्देतून होणाऱ्या मानसिक, आर्थिक, शारीरिक, सामाजिक शोषणाला त्यांनी विरोध केला..त्यांच्या कृतींत संघर्षसह संवेदना आणि विज्ञानाची साद होती.
त्यांनी दाखवून दिलं की.. ✍️
👉 विवेकवाद म्हणजे अंधश्रद्धेच्या अंधारात विचारांचा दीप लावणं.. प्रत्येक निर्णयात तर्क, विज्ञान आणि मानवतेचा संगम साधणं.
👉 विज्ञान म्हणजे केवळ प्रयोगशाळेतील उपकरणं नव्हेत, तर मनुष्याच्या विचारांची मुक्तता आहे.
👉 मानवतावाद म्हणजे केवळ शब्द नाही, तर प्रत्येकाला विवेकानं जगण्याचा अधिकार देणं आहे.
👉 विवेकवादाचा पुरस्कार म्हणजे धर्मांधतेऐवजी सत्यशोधन, प्रामाणिकता आणि सामाजिक जबाबदारीचा स्वीकार करणं.
👉 विवेकवादी होणं म्हणजे मतप्रवाहानं नव्हे, तर मनन-चिंतनानं जगण्याचा मार्ग निवडणं.
👉 समाजात विवेकवाद रुजवणं म्हणजे मानवाच्या बुद्धीला स्वातंत्र्य आणि भावनांना दिशादर्शन देणं.
👉 खरी श्रद्धा तीच — जी विचारांना जखडत नाही, तर विवेकाला मुक्त करते.
आजच्या काळात, जेव्हा खोटं, अफवा आणि अंधश्रद्धा पुन्हा डोकं वर काढतात,तेव्हा डॉ.दाभोळकरांचं स्मरण म्हणजे विवेकाची जागर यात्रा..!
त्यांचा प्रत्येक विचार आपल्याला सांगतो...
"खरी प्रगती मंदिरात नव्हे,तर विचारात आहे,आणि खरा धर्म तोच.. जो प्रश्न विचारण्याची हिंमत देतो."
त्यांचं जीवन जसं एक दीपस्तंभ होतं, तसंच त्यांचं बलिदानही समाजाला जागं ठेवणारा शाश्वत प्रकाश आहे.
आज त्यांच्या जयंतीदिनी आपण केवळ अभिवादन नाही करत, तर विवेकाचा वारसा पुढे नेण्याची शपथ घेऊया मित्रांनो..
विनम्र अभिवादन विज्ञान, विवेक आणि मानवतेच्या त्या दीपस्तंभाला..
शहीद डॉ. नरेंद्र दाभोळकर..! अमर रहे..🙏
विचार संकलन आणि संपादन... ✍️
- एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#VivekJagarDin #NarendraDabholkar #DrNarendraDabholkar #नरेंद्रदाभोळकर #विवेकजागरदिन #Vivekvaad #विवेकवाद #ScientificTemper #ScienceAndHumanity #विज्ञानविचार #AntiSuperstition #अंधश्रद्धानिर्मूलन #RationalThinking #RationalHumanism #Humanism #ThoughtAwakening #विचारजागृती #SocialReform #Manavatavichar #विवेकाचावारसा #QuestionEverything #ThinkRationally #SpiritOfScience #तर्कविचार #EnlightenedSociety #VivekachiJwala #Prabodhan #VicharYatra #ShraddhaAniVivek #SocialAwakening #ScientificHumanism #SpiritOfZindagiFoundation #APJAbdulKalamFoundation #ProfRafiqShaikh #प्रा_रफीक_शेख #StudentAwareness #YouthForHumanity #ManavtaAmarRahe #VivekPrakash #ThoughtForChange #Inspiration #Motivation #HumanityFirst #ScienceForSociety #SocialAwareness #EducationForChange #BeRational #ThinkWise #SpreadVivek #AwakenedIndia #RationalVoice #DrDabholkarAmarRahe #RespectHumanity #FightSuperstition #VivekWadiYuva #HumanistMovement #TruthAndLogic #ProgressiveIndia #ScientificSpirit #manavtazindabad
Post a Comment