समता, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाचा विचार समाजात रुजवणारे महात्मा ज्योतिबा फुले हे परिवर्तनाच्या चळवळीचे दिपस्तंभ होते. त्यांनी केवळ विचार मांडले नाहीत, तर त्या विचारांना कृतीची धार देत अन्यायाच्या मुळावर प्रहार केला.
स्त्रीशिक्षणाचा पाया रचताना, बहुजनांना शिक्षणाचे दरवाजे उघडताना त्यांनी रूढी, अंधश्रद्धा आणि सामाजिक विषमता यांच्याविरोधात निर्भीड लढा उभारला. त्यांच्या कार्यात केवळ सुधारणा नव्हती, तर संपूर्ण समाजमनाला नव्याने घडवण्याची क्रांती होती.
वंचित घटकांना सन्मानाने उभं राहण्यासाठी त्यांनी दिलेला मार्ग आजही समाजाला दिशा देणारा आहे. “ शिक्षण हेच मुक्तीचं शस्त्र ” हा त्यांचा संदेश केवळ घोषवाक्य नाही, तर प्रत्येक पिढीने आत्मसात करावा असा जीवनमंत्र आहे.
आजही जेव्हा समाजात भेदभाव, अन्याय आणि अज्ञान डोकं वर काढतात, तेव्हा महात्मा फुलेंचे विचार आपल्याला सजग, संवेदनशील आणि जबाबदार बनवतात.
त्यांच्या कार्याचा खरा सन्मान केवळ अभिवादनात नसून, त्यांच्या विचारांना आचरणात उतरवण्यात आहे. समतेसाठी उभं राहणं, शिक्षणाला प्राधान्य देणं आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं हीच त्यांच्या विचार वारशाची खरी परंपरा आहे.
प्रत्येक व्यक्तीने स्वतःमध्ये परिवर्तन घडवून समाज परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित ठेवली, तरच महात्मा फुले यांचे स्वप्न साकार होईल, असं मला वाटतं मित्रांनो..
समता व सत्याचा आग्रही महामेरू महात्मा ज्योतिबा फुले यांना जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏
त्यांच्या विचारांची मशाल आपल्या कृतीतून सतत प्रज्वलित राहो, हीच खरी त्यांना आदरांजली.🌹🙏
-त्यांचा एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment