दुःखद बातमी... भावपूर्ण आदरांजली..! 😢
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ, संवेदनशील लेखक, विचारवंत आणि मुक्तांगणचे विश्वस्त अध्यक्ष डॉ. आनंद नाडकर्णी सर यांच्या आज पहाटे ५ वाजता दुःखद निधनाची बातमी समजली आणि मन अत्यंत व्यथित झाले.🥺
मानसशास्त्र या विषयाला केवळ वैद्यकीय चौकटीत न ठेवता, सामाजिक जाणिवांशी जोडून सामान्य माणसाच्या आयुष्याशी संवाद साधणाऱ्या महाराष्ट्रातील मोजक्या प्रतिभावंत व्यक्तिमत्त्वांमध्ये डॉ. आनंद नाडकर्णी सरांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.
मानसिक आरोग्य, मानवी नातेसंबंध, ताण-तणाव आणि जीवनमूल्ये यांविषयी त्यांनी समाजात प्रबोधनाची एक सशक्त चळवळ उभी केली.
डॉ. नाडकर्णी सरांची आणि माझी भेट परभणी येथे आयोजित “जीवन सुंदर आहे.” या व्याख्यानमालेत झाली होती. त्या एका भेटीतही त्यांच्या विचारांची उब, संवादातील आत्मीयता आणि माणसाला समजून घेण्याची विलक्षण संवेदनशीलता जाणवली होती. त्यानंतर पुण्याच्या एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांमधून तसेच मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या अभ्यास मार्गदर्शन शिबिरांच्या माध्यमातून त्यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन सतत लाभत राहिले.
कोविडनंतरच्या कठीण काळात विविध पॉडकास्ट, ऑनलाइन चर्चासत्रे आणि वैचारिक संवादातून सरांचे बौद्धिक मार्गदर्शन अनेकांना नव्याने जगण्याची दिशा देणारे ठरले.
" निराशेच्या अंधारातही आशेचा दिवा कसा जपायचा, हे त्यांच्या विचारांतून शिकायला मिळाले."
सरांच्या प्रेरणेमुळेचं मी मानसशास्त्र विषयातील माझा तिसरा पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करू शकलो. ज्ञानासोबत संवेदनशीलतेचं भान देणाऱ्या त्या ऋणातून मी कधीही मुक्त होऊ शकणार नाही. त्यांच्या विचारांची शिदोरी आणि माणुसकीचा वारसा पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील.
डॉ. आनंद नाडकर्णी सरांना विनम्र आदरांजली..! 🌹
त्यांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन.🙏
— आपलाच एक वैचारिक चाहता.
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment