सदिच्छा भेट : वैचारिक स्नेही मित्र आदरणीय Javed Patel साहब..
(मुस्लिम अधिकार परिषद, परभणी)
वहीद पटेल मित्र मंडळ यांचे ज्येष्ठ बंधू आणि माझे वैचारिक स्नेही मित्र आदरणीय जावेद पटेल साहब यांच्याशी अनेक दिवसांनंतर आज कार्यालयीन भेटीचा सुंदर योग जुळून आला. त्यांच्या मुलांच्या शैक्षणिक मार्गदर्शनाच्या निमित्ताने त्यांनी डॉ. कलाम फाउंडेशनच्या शैक्षणिक दालनाला सदिच्छा भेट दिली. या भेटीत मनमोकळ्या वैचारिक चर्चा, सामाजिक प्रश्नांवरील चिंतन आणि भविष्यकालीन वाटचालीबाबत सकारात्मक संवाद घडला.
मागील अनेक दशकांपासून विविध समाजमाध्यमांवर मुक्त अभिव्यक्तीतून मुस्लिम समाजातील आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करणारे, तसेच मुस्लिम अधिकार परिषदेच्या माध्यमातून समाजहितासाठी शासकीय स्तरावर लढा उभारणारे अभ्यासू, शांत, संयमी आणि प्रबोधनवादी नेतृत्व म्हणजे आदरणीय जावेद पटेल साहब होय.
आमची मैत्री ही केवळ वैयक्तिक नसून वैचारिक नात्याने जोडलेली आहे. विचार भिन्न असले तरी एकमेकांच्या मतांचा आदर राखत समाजहितासाठी सकारात्मक संवाद घडवत राहणे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. त्यांचे मुक्त चिंतन, सामाजिक विषयांवरील स्पष्ट भूमिका आणि सामान्य कार्यकर्त्यांना दिलेली वैचारिक प्रेरणा ही निश्चितच समाजासाठी दिशादर्शक ठरत आहे.
आजच्या सदिच्छा भेटीत त्यांचा वैचारिक सहवास लाभला. त्यांच्या विचारांची स्पष्टता, संयमी देहबोली, सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याचा व्यापक दृष्टिकोन आणि आगामी सामाजिक-राजकीय परिस्थितीवरील भाष्य यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
" समाजातील बदल हा केवळ टीका करून घडत नाही, तर प्रबोधन, शिक्षण, संवाद आणि सकारात्मक नेतृत्वातून घडतो, याची जाणीव त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून प्रकर्षाने जाणवते."
शिक्षण, सामाजिक जागृती आणि वैचारिक प्रगल्भता यांच्या आधारावर समाज उन्नतीचा मार्ग शोधणाऱ्या व्यक्तींची आज समाजाला नितांत गरज आहे. आदरणीय जावेद पटेल साहब यांचा पुढील सामाजिक आणि वैचारिक प्रवास मुस्लिम समाजासह सर्वसामान्य जनतेला योग्य दिशा, जागरूकता आणि सक्षम नेतृत्व देणारा ठरेल, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
आपल्या सदिच्छा भेटीमुळे मन समृद्ध झाले. आपला सहवास, आपले विचार आणि समाजहिताची बांधिलकी याबद्दल मनःपूर्वक आभार..!
-आपलाच वैचारिक स्नेही
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment