“ जो शोषित आहे, त्याला सत्तेत भाग मिळाला पाहिजे; आणि जो जागृत आहे, त्याने इतरांना जागं केलं पाहिजे.” -मा. कांशीराम साहेब..
" सामाजिक परिवर्तनाचे शिल्पकार... बहुजन चळवळीचे प्रखर नायक, लोकशक्तीला संघटनेची दिशा देणारे महान विचारवंत मा. कांशीराम साहेब यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन..."
त्यांनी दाखवलेला मार्ग केवळ सत्तेचा नव्हता, तर स्वाभिमानाच्या जागृतीचा होता...त्यांच्या विचारांनी अस्पृश्यतेच्या अंधारातून बहुजन समाजाला आत्मभानाचा प्रकाश दिला..
त्यांच्या कृतींनी दाखवून दिलं की, " संघटन म्हणजे परिवर्तनाची पहिली पायरी..!"
आजही त्यांच्या विचारांची ज्योत सामाजिक, राजकीय आणि वैचारिक लढ्यातील प्रत्येक सजग कार्यकर्त्यांच्या अंतःकरणात तेजाने प्रज्वलित आहे.
🔥 "जोपर्यंत अन्यायावर आधारित व्यवस्था उभी आहे, तोपर्यंत मा.कांशीराम साहेबांचे विचार हेच परिवर्तनाची नवी क्रांती घडवत राहतील..." ✊
आज त्यांचा स्मृतिदिन.. त्यानिमित्ताने विनम्र अभिवादन.. 🙏
त्यांचा वैचारिक चाहता.. ✍️
- एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment