जीवन म्हणजे फक्त दिवसांची माळ नाही,तर ती प्रत्येक क्षणाने विणलेली एक नियतीची गाठ आहे. आजचा दिवस म्हणजे फक्त एक तारीख नाही,तर तो उद्याच्या यशाचं बीज आहे, जे तुम्ही आत्ता पेरता आहात.
काळाच्या नदीत वाहत जाणाऱ्या दिवसांमध्ये ‘आज’ हा एकमेव किनारा आहे, जिथून आपण आपल्या भविष्यातील नौका उभारू शकतो...‘उद्याचं स्वप्न’ हे नेहमी गोड असतं, पण...
‘आजचं कर्म’ हेच त्या स्वप्नाला वास्तवात आणणारं हत्यार असतं.
काही लोक उद्याची वाट बघतात.. “कधी येईल योग्य वेळ, कधी मिळेल संधी…”पण सत्य एवढंच आहे... योग्य वेळ कधीच येत नाही, ती घडवावी लागते..आणि ती घडवण्याची सुरुवात होते आजच्या निर्णयातून,आजच्या कृतीतून, आणि आजच्या आत्मविश्वासातून मित्रांनो..
आज एक पाऊल पुढे टाका...
कदाचित लहानसे असेल, पण तेच उद्याच्या पर्वतावर नेणारं पाऊल ठरेल. स्वप्न मोठं असो, पण सुरुवात नेहमी छोट्या प्रयत्नांपासूनच होते...आज अभ्यासाची एक पान वाचा,आज एक चांगला विचार लिहा,आज कोणाचं हृदय जिंका..
कारण हाच ‘आज’ तुम्हाला त्या मोठ्या उद्यासाठी तयार करतो.
लक्षात ठेवा...
उद्याचं भविष्य आजच्या घामावर उभं राहतं. जो ‘आज’ वाया घालवतो, तो ‘उद्या’चा अभिमान हरवतो..आणि जो आजचं महत्त्व ओळखतो,त्याच्या हातात काळही नमतो, नियतीही झुकते..
" भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची भीती, माणसाचं वर्तमान हिसकावून घेण्यापूर्वी आजचा क्षण नियोजनानें जगा."
म्हणून उठा, सज्ज व्हा, आणि आजचा दिवस सोन्यासारखा घडवा कारण एक दिवस तुम्ही मागे वळून पाहाल, आणि म्हणाल..
“होय, त्या दिवशी मी सुरुवात केली होती… आणि त्याच दिवसाने माझं भविष्य घडवलं!”
"जीवनाची खरी संपत्ती सोनं-चांदी नाही, तर प्रत्येक क्षणाचं सजगतेनं जगलेलं वर्तमान आहे."
काळ थांबत नाही, पण प्रयत्न थांबवणं हीच माणसाची चूक असते...उद्या उजळण्यासाठी आजचं घामाचं थेंब हवंच...
स्वप्नं मोठी ठेवा, पण त्यांचा पाया आजच्या कृतीत घाला.
कारण भविष्य हे काही जादूने तयार होत नाही,तर ते घडतं.. आजच्या निर्धाराने, आजच्या मेहनतीने, आणि आजच्या धैर्याने.
“भविष्याचा विचार करत बसू नका,आजचं कार्य करा... कारण आजचे प्रयत्न उद्याचं वैभव ठरवतात.”
-एक साहित्यप्रेमी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#आजचादिवस #MotivationalMarathi #InspirationDaily #FutureStartsToday #आजचीशुरुवात #MarathiMotivation #SuccessMindset #DreamBigActNow #KalacheSwapan #HardWorkPaysOff #LifeGoals #MarathiQuotes #PositiveVibesOnly #प्रेरणादायीविचार #ZindagiLessons #MarathiBlogger #BeTheChange #MarathiThoughts #TodayMatters #MakeTodayCount #SelfBelief #Determination #UdyachaBhavishya #जीवनप्रेरणा #MotivationalPost #ThoughtOfTheDay #MarathiWriting #KalpanaTeKarya #TheSpiritOfZindagi #StudentMotivation #APJAbdulKalam #MarathiInspiration #LifeInMarathi #काळाचेमहत्त्व #MehnatYashDete #BelieveInYourself #MotivationForStudents #PreranaMantra #MarathiWriters #SuccessStories #SpiritualVibes #VicharManthan #MarathiBlog #आजचेविचार #MarathiEnergy #परिश्रमाचेजादू #StartToday #FocusOnNow #MarathiWisdom #mindsetmatters
Post a Comment