जीवन हा एक अखंड प्रवास आहे, शरीराच्या पावलांनी नव्हे तर विचारांच्या आणि अनुभवांच्या वाटांनी चालणारा प्रवास.
जगण्याच्या या प्रवासात दोन गोष्टी माणसाला खऱ्या अर्थाने समृद्ध करतात एक वाचन आणि दुसरं प्रवास..
पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा ज्ञानप्रकाश आणि प्रवासाच्या वाटेवर सापडणारे अनुभव, या दोघांनीच मनुष्याला 'मी कोण आहे?' या शाश्वत प्रश्नाच्या उत्तराजवळ नेले आहे.
पुस्तकं माणसाला अंतर्मुख करतात, तर प्रवास त्याला विश्वाशी जोडतो. एक ज्ञान देतं, दुसरं अनुभव देतं..आणि जेव्हा ही दोन्ही साधनं एकत्र येतात... तेव्हा जन्मतो ‘जगण्याचा खरा अर्थ.’
🎓 वाचन आणि प्रवास — माझ्या जीवनाचा द्वैत दीपस्तंभ.. ✍️
शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रातील दोन दशकांचा माझा प्रवास हा केवळ व्यावसायिक नव्हता, तर तो एक अध्यात्मिक आणि वैचारिक साधना होती..
प्रत्येक पावलावर अनुभवांचा साठा मिळाला, प्रत्येक भेटीत नवा विचार सापडला.विविध ठिकाणचे प्रवास, शैक्षणिक परिषदांमधील चर्चासत्रं, विद्यार्थ्यांशी संवाद आणि समाजकार्याच्या कार्यशाळा...या साऱ्यांनी आयुष्याचा कणा घडवला, आणि ज्ञानलालसेच्या दिव्याने विवेकाचा मार्ग उजळवला.
📖 पुस्तकांच्या पानांतून जागलेला विवेक..
शालेय जीवनात वाचलेल्या महात्मा गांधी, भगतसिंग, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साने गुरुजी यांच्या विचारांनी मनात सामाजिक न्यायाची बीजं रुजवली..
महाविद्यालयीन जीवनात कार्ल मार्क्सचा सामाजिक आणि आर्थिक दृष्टिकोन, फ्रेड्रिक नित्शेचा तत्त्वविचार, गौतम बुद्धाची करुणा, आणि खलील जिब्रानची संवेदनशीलता..या सर्व विचारवंतांच्या लेखनानं ‘विवेक, प्रश्न आणि परिवर्तन’ यांची दिशा दाखवली.
वाचनानं माझ्या विचारांना गती दिली आणि भाषेला धार.
आजही दिवसाची सुरुवात होते ती किमान पाच वर्तमानपत्रांपासून, आठवड्यात दोन पुस्तकांच्या वाचनापासून आणि समाजमाध्यमांवरील वैचारिक संवादातून...
कारण ज्ञान म्हणजे केवळ माहिती नव्हे, तर जगण्याचं भान.
🌍 प्रवास — आत्मशोधाची वाट..
वाचन आपल्याला अंतर्मुख करतं, तर प्रवास आपल्याला व्यापक बनवतो, मित्रांनो... रस्ते केवळ गंतव्यस्थानाकडे नेत नाहीत; ते आपल्याला स्वतःकडेही नेतात. प्रवास म्हणजे फक्त अंतर पार करणं नव्हे, तर स्वतःला नव्यानं शोधणं असतं. प्रत्येक वाट, प्रत्येक थांबा, प्रत्येक दृश्य आपल्याला काहीतरी शिकवून जातं — आणि नकळत आपण बाहेरचं जग पाहता पाहता, आपल्या आतलं विश्व शोधायला लागतो. कारण खरा प्रवास तोच, जो आपल्या विचारांना विस्तार देतो आणि मनाला प्रकाश देतो.
विविध लोक, संस्कृती, विचार, संघर्ष, आणि आशा, या साऱ्यांशी भेट होत जाते आणि मनात मानवतेचं बीज अंकुरतं.
प्रवास शिकवतो की, जीवनाचं सौंदर्य भौतिक सुखांत नसून जाणिवांच्या विस्तारात आहे..
जेव्हा आपण अज्ञात प्रदेशात पाऊल ठेवतो, तेव्हा भीतीच्या सावल्यांना ओलांडून नवी ओळख सापडते.. तीच खरी आत्मशोधाची सुरुवात असते मित्रांनो..
🔥 आजच्या काळातील खरी यात्रा... ही विवेकाची.. ✍️
आजचा समाज श्रद्धेच्या नावाखाली अंधारात भटकत आहे. धार्मिक यात्रांपेक्षा आता गरज आहे ‘ज्ञान यात्रेची’..ती यात्रा जी अंधश्रद्धेच्या धुक्यातून विवेकाचा प्रकाश शोधेल, जी प्रश्न विचारण्याचं धैर्य देईल, जी मनुष्याला माणूस बनवेल.
ज्ञान हीच खरी प्रार्थना, आणि विवेक हाचं खरा देव...
जगणं अर्थपूर्ण करण्यासाठी आपल्याला भौतिक यात्रांपेक्षा मानसिक आणि बौद्धिक प्रवासाची आवश्यकता आहे..
तोच प्रवास आत्म्याला निर्भयता देतो आणि विचारांना निर्भीड करतो..
प्रत्येक वाचक, प्रत्येक प्रवासी, आणि प्रत्येक विचारवंत या त्रिसंधीवर उभा आहे..जिथे वाचन आत्म्याला स्पर्शतं, प्रवास विचारांना दिशा देतो आणि आत्मशोध त्यांना अर्थ देतो.
कारण खरा प्रवास म्हणजे,बाहेरचं अंतर नाही, तर आतल्या ‘मी’कडे जाण्याचा प्रवास...आणि हा प्रवास जितका खोल, तितकं जीवन तेजस्वी…!
-एक जीवन प्रवासी वाचक.. ✍️
-साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#ज्ञानप्रवास #आत्मशोध #विवेकयात्रा #वाचनसंस्कार #प्रेरणादायीविचार #विचारांचाप्रवास #जीवनप्रवास #प्रवासाचाअर्थ #विवेकाचीदीपज्योत #साहित्यसाधना #विचारप्रकाश #विचारवंत #विवेकवादी #विचारजागृती #ज्ञानदीप #ज्ञानउपासना #विद्यार्थीमित्र #प्रारफीकशेख #TheSpiritOfZindagi #APJAbdulKalamFoundation #SocialAwareness #EducationalReform #SamajPrabodhan #PhilosophicalJourney #ThoughtfulWriting #BooksAndBeyond #JourneyWithin #SelfDiscovery #InspirationForYouth #LifeJourney #PrabodhanYatra #TravelAndLearn #KnowledgeIsPower #MindfulLiving #AwakenYourMind #PositiveVibes #HumanityFirst #SocialChange #PrerakVichar #MotivationalThoughts #MarathiWriters #SocialWriter #EducationalAwakening #MarathiArticle #ज्ञानयात्रा #आत्मप्रकाश #साहित्यप्रेम #VivekPrakash #ManachaPravas #AdhyayanYatra #JeevanSadhana #InspirationalJourney #VicharManthan #AtmaShodh #AtmaVikas #VivekMarg #SamajParivartan #VicharYatra #jeevanpravas
Post a Comment