जग बदलण्यासाठी तलवार लागते असं नाही, तर विचार लागतात..तलवार जखम करते, पण विचार परिवर्तन घडवतो,आणि हे विचार जिवंत ठेवण्यासाठी लागतो धैर्याचा अंगार,आत्मसन्मानाचा ज्वालामुखी, आणि लाचारतेविरुद्ध उभं राहण्याचं धैर्य..
कारण जेव्हा माणूस विचार गमावतो, तेव्हा तो जिवंत असला तरी मृत्यूपेक्षाही शांत होतो, कारण विचार हरवलेला मनुष्य म्हणजे चालता-बोलता सावली, ज्याचं अस्तित्व फक्त शरीरापुरतं मर्यादित असतं.
स्वयं-सिद्ध आचरणाने सिद्ध केलेला विचार हा मनुष्याच्या आत्मसन्मानाचं घोषवाक्य असतो..
आजच्या या दिखाऊ जगात, जिथे विचार विकले जातात आणि माणूस पदासाठी, मानासाठी, कीर्तीच्या खोट्या चकाकीसाठी स्वतःचा आत्मा तारण ठेवतो,..तिथे विचारवंत होणं म्हणजे बंडखोर होणं.✍️
कारण विचारवंत तोच जो सत्तेला सत्य दाखवतो, आणि लाचार तोच जो सत्याला सत्तेच्या सावलीत लपवतो...या काळात विचारांवर ठाम राहणं म्हणजेच क्रांती, आणि त्या क्रांतीची पहिली ठिणगी.. ही तुमच्या विचारांतच दडलेली असते...
समाजाला हवे आहेत विचार करणारे मनुष्य, नाही तर वाकणारे पुतळे..!
विचारवंत तोच जो सत्तेच्या दरबारातही सत्य बोलण्याचं धैर्य राखतो,आणि लाचार तोच जो चुकांना पाहूनही गप्प राहतो.
विचार बदलणे म्हणजे प्रगती, पण लाचारतेमुळे बदललेले विचार म्हणजे पतन..
जेव्हा माणूस भीती, स्वार्थ, आणि सत्तेच्या मोहात अडकतो, तेव्हा त्याच्या विचारांचा तेज हरवतो, आणि तो समाजासाठी नव्हे,..तर स्वतःच्या स्वार्थासाठी विचार करू लागतो... त्यावेळी त्याचे शब्द गोड असतात, पण हेतू विषारी.
इतिहास साक्ष आहे, विचारवंतांनी फासावर चढूनही सत्य टिकवलं,पण लाचारांनी आयुष्यभर वाकूनही सन्मान मिळवला नाही...विचारवंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या विचारांनी क्रांती केली,आणि लाचारांच्या जिवंतपणानं समाज गप्प झाला.
म्हणूनच आज गरज आहे,
“प्रसिद्ध होण्याची नाही, प्रबुद्ध होण्याची..!”
विचारांवर ठाम उभं राहणं हीच खरी क्रांती आहे...जो माणूस आपल्या विचारांशी प्रामाणिक राहतो, तोच समाजात बदल घडवतो..
कारण विचारवंत कधी गर्दीत मिसळत नाही, तो गर्दीला विचार करायला भाग पाडतो..😇
जगात पैसा, पद, आणि प्रतिष्ठा यांचं आकर्षण खूप आहे,पण सर्वात मौल्यवान गोष्ट म्हणजे स्वतःचे विचार अबाधित ठेवण्याचं धैर्य...जेव्हा जग म्हणेल “वाक”, तेव्हा ठामपणे उभं राहा.
कारण जो माणूस आपल्या विचारांसाठी लढतो,..तोच खऱ्या अर्थाने जिवंत असतो.
लाचार होऊन बदललेले विचार हे अध:पतनाचं दार उघडतात,
तर विचारवंत होऊन जगलेलं आयुष्य हे समाजाला दिशा देतं..
तुम्हीचं ठरवा..
तुम्हाला वाकायचं आहे का, की विचारांनी जग उजळायचं आहे.?
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#विचारांचीक्रांती #ThinkRevolution #विचारवंतहोऊनजगा #विचारांचीशक्ती #BeTheThinker #सत्यआणिधैर्य #ThoughtsChangeTheWorld #विचारांवरठामरहा #बदलाचाआवाज #MindAwakening #VivekJagran #प्रबुद्धविचार #लाचारतेविरुद्ध #स्वतःचेविचार #VoiceOfConscience #विचारवंतांचाजग #ThinkBeyondFear #प्रसिद्धनव्हेप्रबुद्धव्हा #VivekWadiManus #धैर्यआणिविचार #RevoltOfThought #विचारांचीठिणगी #सत्याच्यापक्षात #SocialAwakening #SpiritOfZindagi #RafikShaikhWrites #EducationalReform #विद्यार्थीमित्र #विवेकाचीदीपज्योत, #jaibhim, #विवेकयात्रा #TheSpiritOfZindagiFoundation #DrAPJAbdulKalamFoundation #parbhanimh22
Post a Comment