जगात अनेक योद्धे तलवारीने लढले, पण काही योद्धे करुणेच्या धारांनी जग जिंकून गेले..!
अशा योद्ध्यांपैकी एक होते.. हेन्री ड्युनंट, मानवतेच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरलेले नाव.
1859 मध्ये झालेल्या सोलफेरिनोच्या युद्धभूमीवर, रक्ताने निथळलेल्या रणांगणावर जेव्हा हजारो सैनिक मृत्यूशी झुंज देत होते, तेव्हा एक व्यापारी मनुष्य मानवतेच्या वेदनांनी विदीर्ण झाला.
त्यानें व्यापार बाजूला ठेवला आणि मानवतेचा ध्यास घेतला. त्याच क्षणी जन्म झाला रेडक्रॉसच्या विचाराचा..!
त्याच्या अंत:करणातील ती करुणा, ती असह्य वेदना आणि ती कृतीची ज्वाला यांच्यामुळे जगाने पाहिलं,की मानवतेचं शौर्य युद्धाच्या रक्तानेही हरवत नाही..
त्याच्या एका प्रेरक कृतीतून जन्मली अशी संस्था जी आजही रणांगणावर, आपत्तीमध्ये, आणि महामारीमध्ये माणसाला माणूस म्हणून वागवते.
🕊️ हेन्री ड्युनंट यांनी दाखवून दिलं की..✍️
“ जीवनाचं खरं सौंदर्य लढण्यात नाही, तर जखमींना वाचविण्यात आहे; विजय रक्ताच्या नाही, करुणेच्या प्रवाहातून उमलतो.”
पहिला नोबेल शांतता पुरस्कार त्यांच्या हातात गेला, पण त्यांची खरी ओळख पुरस्कारात नव्हती.. तर ती होती त्यांच्या निःस्वार्थ सेवाभावात..!
आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आपण त्यांना अभिवादन करताना हे लक्षात घ्यायला हवं की,
मानवतेचा धर्म हा कुठल्याही धर्मापेक्षा श्रेष्ठ आहे,आणि दया, सहानुभूती, सेवा.. ह्याच आहेत खऱ्या संस्कृतीच्या मुळा.
🔥 “रेडक्रॉस” ही फक्त संस्था नाही, तर ती एक विचारधारा आहे,जिथे प्रत्येक जखमी माणूस मानवतेच्या छायेत विसावतो… आणि प्रत्येक सेवाभावी हात देवत्वाला स्पर्श करतो..! 🙏
मानवतेच्या या महान योद्ध्याला...हेन्री ड्युनंट..
ज्यांनी रणांगणावर रक्त नव्हे तर करुणेचा प्रवाह वाहवला,
ज्यांनी माणुसकीला सीमा, धर्म आणि वंश यांच्याही पलीकडे नेलं,
अशा या अमर मानवतेच्या दीपस्तंभाला...आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आमचं विनम्र, कृतज्ञ अभिवादन… 🙏
“जग जिंकणारे अनेक असतात, पण जखमींना वाचवणारेच खरे वीर ठरतात!”
एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#मानवता #हेन्रीड्युनंट #Humanity #RedCross #NobelPeacePrize #प्रेरणा #Inspiration #Motivation #ServiceToHumanity #HumanitarianHero #PeaceMessenger #SocialAwareness #HumanValues #Compassion #Kindness #Empathy #ManavataYodha #ThoughtfulWriting #Probodhan #SocialReform #शांततेचा_योद्धा #Vivekvad #EducationForChange #TheSpiritOfZindagiFoundation #DrAPJAbdulKalamVidyaarthiFoundation #VidyaarthiMitra #RafiqueShaikh #HumanityFirst #ServeTheNation #सामाजिकजागृती #करुणेचाशौर्य #InspiringIndia
Post a Comment