शिक्षक आपल्या वर्गात मुलांना गोष्ट सांगत होते... एका मोठ्या जहाजाचा समुद्राच्या मध्यभागी भयंकर अपघात झाला.
कॅप्टनने ताबडतोब सर्व प्रवाशांना जहाज रिकामं करण्याचा आदेश दिला.
त्या जहाजावर एक तरुण दांपत्यही होतं...
जेव्हा त्यांची लाइफबोटमध्ये चढायची वेळ आली तेव्हा बोटीत फक्त एकाच व्यक्तीसाठी जागा उरली होती.
त्या क्षणी त्या पुरुषाने आपल्या बायकोला बाजूला सारून स्वतः बोटीवर उडी मारली.
बुडत्या जहाजावर उभी असलेली ती स्त्री दूर जात असलेल्या आपल्या नवऱ्याकडे बघत काहीतरी ओरडली.
इथं शिक्षक थांबले आणि मुलांना विचारलं .. “तुम्हाला काय वाटतं, त्या स्त्रीने आपल्या नवऱ्याला काय म्हटलं असेल?”
बहुतेक विद्यार्थी लगेच म्हणाले, “तिने म्हटलं असेल, मी तुझा द्वेष करते! I hate you!”
शिक्षकांनी वर्गभर नजर फिरवली तर एक विद्यार्थी मात्र शांत बसला होता.
शिक्षकांनी त्याला विचारलं, “बाळा, तुला काय वाटतं?”
तो मुलगा म्हणाला, “मला वाटतं, तिने म्हटलं असेल, आपल्या मुलाची काळजी घे.”
शिक्षक चकित झाले आणि विचारले, “तू ही गोष्ट आधी ऐकली आहेस का?”
मुलगा म्हणाला, “नाही सर, पण हेच शब्द माझी आई, ती आजारी असताना, माझ्या वडिलांना म्हटली होती.”
शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हणाले, “बरोबर उत्तर.”
मग त्यांनी गोष्ट पुढे सांगितली —
जहाज बुडालं आणि ती स्त्री देवाघरी गेली.
पुरुष मात्र किनाऱ्यावर पोहोचला आणि उरलेलं आयुष्य आपल्या लेकराच्या संगोपनात घालवलं.
बर्याच वर्षांनी तो पुरुष मरण पावला.
घर साफ करताना त्याच्या मुलीला वडिलांची डायरी सापडली.
त्या डायरीत लिहिलं होतं —
“त्या जहाजप्रवासाच्या वेळी तुझी आई असाध्य आजाराने त्रस्त होती. तिचे आयुष्य काहीच दिवसांचं राहिलं होतं.
त्या क्षणी मला कठोर निर्णय घ्यावा लागला —
मी जगलो, कारण मला तुझं आयुष्य वाचवायचं होतं.”
💫 कधी भांडण झालं, आणि कुणीतरी आधी माफी मागितली,
तर याचा अर्थ तो दोषी आहे असं नाही —
तो नातं टिकवणं अधिक महत्त्वाचं मानतो.
🍽 मित्रांबरोबर खाताना जो मित्र बिल भरतो,
त्याच्याकडे खूप पैसे आहेत असं नाही..
त्याच्यासाठी मैत्री पैशांपेक्षा मोठी आहे.
🤝 जे लोक तुमची मदत करतात,
ते काही उपकार फेडत नाहीत...
ते फक्त मनाने दयाळू असतात.
Post a Comment