मानवतावादी, लोककल्याणकारी, विश्ववंद्य, शककर्ते, प्रजाहितदक्ष, बहुजनप्रतिपालक, कुळवाडी भूषण, रयतेचे राजे, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, भारतीय नौदलाचे जनक आणि आदर्श राज्यकारभाराचे प्रतीक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजांना मानाचा मुजरा आणि सर्वांना हार्दिक शिवमय शुभेच्छा.. 🌹
शिवजयंती ही केवळ उत्सवाची तारीख नाही; तर ती स्वाभिमान, न्यायनिष्ठा आणि सुशासनाची प्रेरणा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभे केलेले स्वराज्य हे केवळ राजकीय सत्ता नव्हते, तर ते रयतेच्या कल्याणाचा, स्त्रीसन्मानाचा, धर्मसहिष्णुतेचा आणि दूरदृष्टीपूर्ण प्रशासनाचा सजीव आदर्श होते.
संकटांवर मात करत ध्येयाशी प्रामाणिक राहण्याची शिकवण त्यांनी दिली.
आजच्या काळात शिवचरित्राचा अर्थ फक्त घोषणांत नाही, तर आचरणात आहे. अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहणे, कर्तव्याला प्राधान्य देणे आणि समाजहिताला सर्वोच्च मानणे, हाच खरा शिवमय मार्ग आहे.
जय शिवराय..! 🌹🙏
Post a Comment