सर्वधर्म समभाव शिकवणाऱ्या,रयतेच्या राजाला मानाचा मुजरा...🙏
शिवाजी महाराज हे केवळ पराक्रम आणि शौर्याचे प्रतीक नव्हते, तर ते दूरदृष्टी, सुजाण व लोकाभिमुख राज्यकारभार, स्त्रीसन्मान, धार्मिक सहिष्णुता आणि अढळ न्यायनिष्ठा यांचे तेजस्वी आदर्श होते. त्यांच्या ‘स्वराज्य’ संकल्पनेत सत्ता ही प्रजेच्या कल्याणासाठी असावी, समानता व स्वाभिमान यांवर समाज उभा राहावा आणि प्रत्येकाला गुणवत्तेनुसार संधी मिळावी..ही प्रगतिशील दृष्टी स्पष्ट दिसते. त्यांनी धर्म , जातीय भेदभाव किंवा संकुचित विचारांना न जुमानता कार्यक्षमतेला व नीतिमूल्यांना प्राधान्य दिले; म्हणूनच त्यांचे स्वराज्य हे धार्मिक, राजकीय आणि भौगोलिक नव्हते, तर मूल्याधिष्ठित होते.
आजच्या काळात त्यांची जयंती साजरी करताना केवळ घोषणांनी नव्हे, तर विवेक, वैज्ञानिक दृष्टिकोन, सामाजिक समता आणि मानवतावादी मूल्ये आचरणात आणून त्यांना खरी अभिवादन करणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्यातून आपण धैर्याबरोबरच तर्कशुद्ध विचार, संघटनशक्ती, लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्व यांचे धडे घेऊ या.
अन्यायाविरुद्ध ठाम उभे राहणे, स्त्रीपुरुष समानतेचा पुरस्कार करणे आणि सर्वधर्म समभाव जोपासणे हीच शिवचरित्रातून मिळणारी खरी प्रबोधनात्मक प्रेरणा आहे, मित्रांनो..
या जयंतीनिमित्त आपण त्यांच्या विचारांची प्रगतिशील ज्योत मनामनांत प्रज्वलित ठेवून न्याय, समता, बंधुता आणि स्वाभिमान यांवर आधारलेले सशक्त, सुजाण व संवेदनशील समाज घडवू या... हीच खरी शिवराजांना मानवंदना..! 🌹
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
- आपलाच एक वैचारिक स्नेहीं.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment