🔰 मा. वहीद भाऊ पटेल — जनतेची मने जिंकणारं, विश्वासार्हता आणि पारदर्शकतेचे प्रतीक, आणि परिसराच्या औद्योगिक, शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी अखंड लढा देणारे नेतृत्व.
परभणी शहरातील दक्षिण भागातील वार्ड क्र. 12..
(इंदिरा गांधी नगर, परसावत नगर, अजिजिया नगर, बाबर कॉलनी, कृषी नगर, मंत्री नगर आणि अलिबाग नगर).
हा परिसर मुस्लिम बहुल असल्याने येथे वर्षानुवर्षे मूलभूत प्रश्न, सुविधांची कमतरता, आरोग्याच्या समस्या आणि असमान विकासाचे दुष्टचक्र सतत टिकून आहे.
राजकीय सत्ताधाऱ्यांनी समस्यांना कायमस्वरूपी राखून मतदारांना आश्वासनांच्या फसव्या जाळ्यात अडकवले.. हा इतिहास दुर्दैवी असून चिंतनाला भाग पाडणारा आहे. सत्ता बदलली, चेहरे बदलले… पण समस्या मात्र जैसे थे राहिल्या..!
माझ्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यात ह्या परिसराचा उल्लेख नेहमीच वेदनेने आणि जबाबदारीने झाला आहे.
कारण हा परिसर तळमळीचा आहे… पण दुर्लक्षाचा नाही.
हा परिसर मेहनती आणि कष्टकऱ्या माणसाचं आणि सर्वं सामान्य लोकांचा आहे… पण संधीपासून वंचित ठेवला गेलेल्यांचा नाही.
या संघर्षात गेल्या 15 वर्षांपासून अविरत काम करणारे एक नाव नेहमीच चमकतं आहे ते म्हणजे मा. वहीद भाऊ पटेल..
वहीद भाऊचं नेतृत्व म्हणजे फक्त राजकीय पद नाही…ते जनतेचा हक्क, आवाज आणि स्वाभिमान यांचं प्रतीक आहे.
वहीद भाऊ हे फक्त नेते नसून ‘भाऊ’ ही ओळख जपणारे माणूस आहेत.त्यांचं काम हे घोषणांचं नाही… प्रत्यक्ष कृतीचं उदाहरण आहे.
परिसरातील प्रश्नांवर वहीद भाऊनी सातत्याने केलेले प्रामाणिक प्रयत्न उल्लेखनीय आहेत..
आरोग्य सेवा व सुविधा संबंधित पाठपुरावा, बाबर कॉलनीतील अतिवृष्टीसंदर्भातील प्रश्नांचे निराकरण,मुस्लिम आरक्षण, शिक्षण व संरक्षणाविषयी राज्यस्तरावर केलेला अभ्यासपूर्ण लढा,विविध कल्याणकारी योजनांमध्ये खरे लाभार्थी जोडण्याचे काम,सामाजिक संघटनातून युवकांना दिशा, शैक्षणिक आणि सामाजिक मदत कार्यासाठी सदैव अग्रेसर असलेलं दमदार नेतृत्व..
हे केवळ कार्य नाही…हे जबाबदारी, संवेदनशीलता आणि समाजासाठीची बांधिलकी आहे, मित्रांनो..
गरीब, कष्टकरी, उपेक्षित आणि वंचित घटकांना हक्काने न्याय आणि सन्मान मिळायला हवा ही भावना आणि ध्येय जपणारं नेतृत्व म्हणजे मा. वहीद भाऊ पटेल.
परिसराला योग्य न्याय आणि उज्ज्वल भविष्य देऊ शकेल अशी अभ्यासपूर्ण ध्येय दृष्टी असलेलं उमदं नेतृत्व.. आपल्यातचं आहे..
उद्याचा परभणीचा दक्षिण भाग हा प्रश्नांचा नाही… तर विकासाचा आणि संधींचा केंद्रबिंदू व्हावा.. हा विश्वास आणि आशावाद ह्या परिसराला मा.वहीद भाऊंच्या अभ्यासपूर्ण आणि संघर्षरत नेतृत्वाच्या माध्यमातूनचं मिळेल..
आपले प्रामाणिक कार्य, आपली धडपड,तळमळ आणि आपल्या विचारांची दिशा हीच भविष्यातील नेतृत्वाची खरी ओळख बनेल हा दृढ विश्वास कायम आम्ही मनाशी बाळगून आहोत..
मा. वहीद भाऊ — तुमच्या कार्याला, विचारांना आणि लोकाभिमुख नेतृत्वाला आमच्या सदिच्छा आणि शुभेच्छा सदैव सोबत आहेत..हा प्रवास फक्त राजकारणाचा नाही तर हा प्रवास परिवर्तनाचा आहे, मित्रा..!
आपणास यशस्वी राजकीय कारकिर्दीसाठी पुनःश्च लक्ष लक्ष हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन.. 🌹
आम्हांस आपला सार्थ अभिमान, मित्रा..🌹
वहीद पटेल मित्र मंडळ 🙏
-आपलाच मार्गदर्शक स्नेहीं.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment