🌍 मलिक अंबर - सर्वहाराचा मुक्तिदाता, इतिहासातील गूढ विजेता..
आज ऐतिहासिक वारशाच्या साक्षीने पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यातील खुलताबाद येथे पर्यटन आणि इतिहासभेटीचा सुंदर योग आला.
इतिहासाच्या सुवर्ण पानांवर आपल्या दूरदृष्टी, प्रशासकीय कौशल्य आणि अद्वितीय जलव्यवस्थापनामुळे अजरामर ठरलेल्या महान व्यक्तिमत्त्व मलिक अंबर यांच्या समाधीस्थळाला पुन्हा एकदा भेट देण्याचा सन्मान लाभला. आमच्या काही माजी विद्यार्थ्यांसह झालेली ही भेट केवळ पर्यटन नव्हती, तर इतिहासाशी संवाद साधण्याची, भूतकाळातील वैभव अनुभवण्याची आणि त्या महान वारशातून प्रेरणा घेण्याची एक अविस्मरणीय संधी होती.
इतिहास हा केवळ वाचण्याचा विषय नसतो,तो प्रत्यक्ष अनुभवला, समजून घेतला आणि पुढील पिढीपर्यंत पोहोचवला, तरच त्याचे खरे महत्त्व जाणवते. अशा ऐतिहासिक स्थळांच्या भेटी आपल्या सांस्कृतिक वारशाची जाणीव अधिक दृढ करतात आणि आपल्या समृद्ध इतिहासाबद्दल अभिमानही वाढवतात.
सर्वहारा जनतेचा मुक्तिदाता, अन्यायाविरुद्ध उठणाऱ्या आवाजांचा प्रेरणास्रोत, आणि दूरदर्शी राज्यशास्त्रज्ञ म्हणून ज्यांचा मी चाहता आणि अभ्यासक आहे...त्या महान आत्म्याच्या समाधीसमोर उभं राहिल्यावर काही क्षण काळ थबकलो आणि मनात इतिहास पुन्हा जिवंत झाला मित्रांनो...
इतिहासाच्या पानांवर कधी काळी एक नाव तेजोमय अक्षरांनी कोरलं गेलं...ते नाव म्हणजे मलिक अंबर..!
एक असा पुरुष, ज्याने गुलामगिरीत जन्म घेतला, पण स्वातंत्र्याचा दीप सर्वांच्या हृदयात प्रज्वलित केला.
इथिओपिया (अबस्सिनिया) या आफ्रिकन भूमीत, ओरोमा जमातीतील एक बालक जन्माला आलं..हीच ती “Free Born People” जमात, ज्यांच्या रक्तात स्वातंत्र्याचा ठसा कोरलेला होता.
या बालकाचं नाव होतं ‘चापू’ नियतीने ज्याला गुलाम म्हणून विकलं, पण इतिहासाने ज्याला “राजकारणाचा शिल्पकार” ठरवलं.
सन 1548 मध्ये जन्मलेला हा ‘चापू’ गुलाम म्हणून मध्य आशियात विकला गेला...बगदादमधील मीर कासिम अल-बगदादी यांनी त्याला केवळ 80 डच गिल्डरमध्ये विकत घेतलं, पण त्या विक्रीने त्याच्या नियतीचा मार्ग बदलला...
त्यांनी या तरुणाला इस्लाम धर्माची दीक्षा दिली, शिक्षण दिलं, युद्धनीती शिकवली, राज्यकारभाराचं शास्त्र आत्मसात करवून घेतलं...
‘चापू’ आता झाला — अंबर..!
आणि नंतर जगाला परिचित झाला...मलिक अंबर, म्हणजेच “शूर, ज्ञानी आणि नीतिमान सेनानी.”
अहमदनगरच्या निजामशाही राज्यात तो चंगेजखानच्या सेवेत रुजू झाला.त्याच्या दूरदृष्टीने, प्रशासन कौशल्याने, महसूल प्रणालीतील सुधारणा आणि शेतसाऱ्यांच्या न्याय्य हिशोबाने तो लवकरच लोकनायक बनला..
विजापूर आणि गोलकुंड्याच्या रणभूमींवर आपल्या युद्धकौशल्याचा ठसा उमटवून, दरबाराने त्याला “मलिक” ही उपाधी दिली आणि तो झाला मलिक अंबर..!
निजामशाहीच्या ढासळत्या साम्राज्याला त्याने पुन्हा उभं केलं.
त्याच्या नेतृत्वाने दिल्लीच्या बलाढ्य अकबरालाही अस्वस्थ केलं.
त्याने “गनिमी कावा” म्हणजेच छापामार युद्धाची नवी संकल्पना दिली...शिस्तबद्ध घोडदळ, गुरिल्ला युद्धनीती आणि वेगवान रणशक्तीने त्याने मुघलांना दक्षिणेत पाय रोवू दिले नाहीत.
महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि भौगोलिक रचनेत मलिक अंबरचं योगदान अद्वितीय आहे..
त्याने मराठी मातीचा अभ्यास केला, शेतकऱ्यांच्या हितासाठी नवीन महसूल पद्धत राबवली, खडकी (सध्याचं औरंगाबाद म्हणजेच छत्रपती संभाजी नगर) हे नवं शहर उभारलं, अजिंक्य जंजिरा किल्ला बांधला, नहर व्यवस्था निर्माण केली, सुफी संत परंपरेचा प्रसार केला, आणि सर्वधर्म समभावाच्या तत्त्वावर समाजाला बांधून ठेवलं.
त्याने मराठ्यांना स्वाभिमानाची जाणीव करुन दिली...त्यांच्या शौर्याला ओळख दिली आणि दरबारात सन्मानाचं स्थान निर्माण करून दिलं.
भोसले राजघराण्याशी आणि सिंधखेडचे लखोजी जाधव यांच्याशी असलेले निकट संबंध हे पुढे स्वराज्याच्या पायाभरणीत महत्वाचे ठरले.. ह्याचं सर्वं श्रेय मलिक अंबरलाच जाते..
मलिक अंबरने मराठ्यांना केवळ गनिमी युद्ध शिकवलं नाही
तर “स्वराज्याचा आत्मा” त्यांच्या अंतःकरणात जागवला.
आज, जेव्हा इतिहासाचं लेखन केलं जातं, तेव्हा मलिक अंबरचं नाव केवळ एका आफ्रिकन योद्ध्याचं म्हणून नव्हे,तर एका अशा विचारवंताचं, न्यायप्रिय प्रशासकाचं आणि समानतेचा संदेश देणाऱ्या मानवतावाद्याचं म्हणून घेतलं गेलं पाहिजे.
तो खरा ‘सर्वहाराचा मुक्तिदाता’ होता..
ज्याने गुलामीच्या साखळ्या तोडून, स्वातंत्र्याची मशाल पेटवली,
आणि दाखवून दिलं की..
“ मानवाचं मोल त्याच्या रंगात नसतं, तर त्याच्या कर्मात असतं.”
या समाधीच्या शांत वातावरणातही त्यांचा संघर्ष, दूरदृष्टी आणि न्यायनिष्ठतेची प्रतिध्वनी ऐकू येते..जणू ही समाधीही सांगते आहे,
“गुलामीत जन्मलो तरी विचारांनी मुक्त होतो,
आणि न्यायासाठी लढलो तरी अमरत्व कमावतो.”
मलिक अंबरचं जीवन केवळ इतिहास नव्हे,तर आजही अन्यायाविरुद्ध उभं राहण्याची प्रेरणा देणारं अमर पर्व आहे.
-त्यांचा एक वैचारिक चाहता आणि अभ्यासक.. ✍️
- एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#मलिकअंबर #MalikAmbar #History #IndianHistory #DeccanHistory #मराठाइतिहास #छत्रपतीसंभाजीनगर #औरंगाबाद #खुलताबाद #Heritage #HistoricalPlaces #HistoricalTour #HistoryLovers #Maharashtra #मराठी #महाराष्ट्र #सर्वहाराचामुक्तिदाता #SocialJustice #Freedom #Equality #Humanity #Inspiration #Leadership #VisionaryLeader #WarStrategy #गनिमीकावा #MarathaHistory #HistoryMatters #KnowYourHistory #भारतीयइतिहास #इतिहासातूनप्रेरणा #PrideOfHistory #UnsungHeroes #AfricanHero #Oromo #Ethiopia #CulturalHeritage #TravelWithPurpose #EducationalTour #LearnHistory #Motivation #TheSpiritOfZindagi #DrKalamFoundation #विद्यार्थीमित्र #प्रारफीकशेख #जयइतिहास #मराठमाती #समानता #स्वाभिमान #JusticeForAll #ViralPost #ExploreHistory #HistoricLegacy #इतिहास_जगा #इतिहास_वाचा #हिस्टरीइंमराठी
Post a Comment