“देशातील तरुणांना नोकरी नाही, संधी नाही, शिक्षण महाग झालं, स्पर्धा प्रचंड वाढली… आणि जेव्हा हेच तरुण प्रश्न विचारतात, RTI टाकतात, पत्रकारिता करतात, सोशल मीडियावर आवाज उठवतात.. तेव्हा त्यांच्याकडे संशयाने पाहिलं जातं.
लोकशाहीत प्रश्न विचारणारा नागरिक हा शत्रू नसतो,
तर जागरूक नागरिक असतो.आलोचना म्हणजे देशविरोध नाही.
प्रश्न विचारणे म्हणजे गुन्हा नाही.
जर बेरोजगारीवर बोलणं चुकीचं असेल,
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवणं चुकीचं असेल,
महागाईवर टीका करणं चुकीचं असेल,
तर मग लोकशाहीचा अर्थ तरी काय उरतो?
देशातील तरुण फक्त नोकरी मागतो, समान संधी मागतो, संविधानाने दिलेले अधिकार मागतो.
तो अन्यायाविरुद्ध बोलतो म्हणून त्याला कमी लेखणं योग्य नाही...
पत्रकार, RTI कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते — हे लोकशाहीचे महत्त्वाचे भाग आहेत.
कारण प्रश्न विचारणारे लोकच सत्तेला जबाबदार ठेवतात...
आज जर तरुण शांत बसला तर उद्या लोकशाहीच शांत होईल.
म्हणून विचारणारे आवाज दाबू नका… त्यांना ऐका..
मतभेद असू शकतात, पण नागरिकांचा सन्मान कायम राहायला हवा.
कारण संविधान आपल्याला फक्त मतदानाचा नाही,
तर प्रश्न विचारण्याचाही अधिकार देतं...
Post a Comment