प्रसिद्ध पार्श्वगायिका, मेलोडी क्वीन Singer Alka Yagnik यांना भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या दीर्घ, समर्पित आणि अतुलनीय योगदानाबद्दल भारताच्या महामहीम राष्ट्रपती Droupadi Murmu यांच्या हस्ते देशातील तिसरा सर्वोच्च नागरी सन्मान ‘पद्मभूषण’ प्रदान करण्यात आला. हा सन्मान केवळ एका गायिकेचा गौरव नसून भारतीय संगीत परंपरेच्या समृद्ध वारशाचा आणि सुरांच्या साधनेचा सन्मान आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांना निरोगी, आनंदी व दीर्घायुष्याच्या लक्ष-लक्ष शुभेच्छा..!
आमच्या नव्वदच्या दशकातील पिढीसाठी अलका याज्ञिक यांचा आवाज म्हणजे भावनांचे, प्रेमाचे, विरहाचे आणि आनंदाचे एक सुंदर संगीतविश्व आहे. Kumar Sanu आणि Udit Narayan यांच्या सुरेल साथीत अलका याज्ञिक यांनी असंख्य गाण्यांना असा जीवंत स्पर्श दिला की ती गाणी आजही काळाच्या प्रवाहात तितकीच ताजी आणि मोहक वाटतात.
एखाद्या गीताला शब्दांचे सौंदर्य लाभते ते गीतकारांमुळे, पण त्या शब्दांना आत्मा, भावना आणि चिरंतनता प्राप्त होते ती गायकांच्या आवाजातूनचं...Gulzar, Javed Akhtar, Sameer Anjaan, Santosh Anand, Anand Bakshi आणि Mehboob यांसारख्या दिग्गज गीतकारांच्या रचनांना अलका याज्ञिक यांच्या स्वरांनी भावनांची अशी उंची दिली की ती गाणी भारतीय जन-मानसाच्या स्मृतीत कायमची कोरली गेली आहे, मित्रांनो..
भारतीय संगीतसृष्टीचा इतिहास हा अनेक दिग्गज स्वरसम्राट आणि स्वरसम्राज्ञींनी समृद्ध केला आहे. Lata Mangeshkar, Mohammed Rafi, Kishore Kumar, Asha Bhosle, Geeta Dutt, Shamshad Begum, Suraiya, Mohammed Aziz, Mukesh आणि Manna Dey यांसारख्या महान कलाकारांनी भारतीय संगीताला अजरामर केले. त्यांच्या प्रतिभेच्या पाऊलखुणा केवळ भारतापुरत्याच मर्यादित राहिल्या नाहीत, तर जगभरातील रसिकांच्या मनात आदर आणि प्रेमाचे स्थान निर्माण करून गेल्या. हा वारसा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे.
माझ्या मते, नव्वदच्या दशकात भारतीय चित्रपट संगीताला लोकप्रियतेची आणि भावविश्वाची नवी उंची देण्यात अलका याज्ञिक, कुमार सानू आणि उदित नारायण या त्रिकुटाचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. हजारो चित्रपटांमधून लाखो हृदयांना स्पर्श करणारी त्यांची गाणी आजही प्रत्येक पिढीला तितकीच भावतात. त्यांच्या स्वरांनी प्रेमाला भाषा दिली, भावनांना अभिव्यक्ती दिली आणि जीवनातील अनेक क्षणांना अविस्मरणीय बनवले.
संगीत ही केवळ मनोरंजनाची कला नाही तर ती माणसाच्या अंतर्मनाशी संवाद साधणारी, दुःखाला दिलासा देणारी, आशेला पंख देणारी आणि जीवनाला सौंदर्य प्रदान करणारी दिव्य शक्ती आहे,असं मला वाटतं..
शब्द जेथे थांबतात, तेथे संगीत बोलू लागते. म्हणूनच महान कलाकारांचे योगदान केवळ कला क्षेत्रापुरते मर्यादित राहत नाही, तर ते समाजाच्या सांस्कृतिक जडणघडणीचाही भाग बनते.
भारत सरकारने अलका याज्ञिक यांना ‘पद्मभूषण’ प्रदान करून त्यांच्या स्वर-साधनेचा, समर्पणाचा आणि भारतीय संगीत क्षेत्रातील अद्वितीय योगदानाचा योग्य सन्मान केला आहे. हा सन्मान प्रत्येक संगीतप्रेमीसाठी आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.
स्वरांना सीमा नसतात, सुरांना वय नसते आणि खऱ्या कलेला काळाची मर्यादा नसते. अलका याज्ञिक यांचा आवाज याच चिरंतन सत्याची साक्ष देतो.
पुन्हा एकदा त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उज्ज्वल, निरोगी व दीर्घ आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा! 🌹🎶🙏🏻
-एक संगीतप्रेमी..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
#AlkaYagnik #PadmaBhushan #MelodyQueen #IndianMusic #PlaybackSinger #MusicLegend #GoldenVoice #BollywoodMusic #EvergreenSongs #90sMusic #90sKids #KumarSanu #UditNarayan #Gulzar #JavedAkhtar #SameerAnjaan #SantoshAnand #AnandBakshi #Mehboob #LataMangeshkar #MohammedRafi #KishoreKumar #AshaBhosle #Mukesh #MannaDey #IndianCinema #MusicLovers #MusicalTribute #VoiceOfGenerations #GoldenEra #TimelessMelodies #IndianCulture #ProudIndian #PadmaAwards #SangeetPremi #भारतीयसंगीत #अलकायाज्ञिक #पद्मभूषण #स्वरांचासुवर्णप्रवास #मेलोडीक्वीन #स्वरसम्राज्ञी #सुरेलआवाज #संगीतप्रेमी #संगीतविश्व #सांस्कृतिकवारसा #अभिमानास्पदक्षण #चिरंतनस्वर #भारतरत्नसमानयोगदान #कलाकारांचागौरव #संगीताचीजादू #प्रेरणादायीव्यक्तिमत्त्व #स्वरांचीजादू #सुरांचीमैफल #भारतीयअभिमान #साहित्यप्रेमी #विवेकवादी #समाजमाध्यमकार #विद्यार्थीमित्र #रफीकशेख #TheSpiritOfZindagi #TheRadicalHumanist #InspireEducateEmpowerExcel #MusicIsLife #LegendNeverFades #CelebratingExcellence #RespectForArt #MusicalLegacy #VoiceOfMillions #IndianLegends #SaluteToLegends #HarmonyOfIndia #SingingIcon #CulturalPride #MusicalInspiration #TrueArtist #MusicHeals #ArtBeyondTime #IndiaProud #MusicalExcellence #Inspiration #Motivation #SuccessStory #Respect #Gratitude #TributeToLegends 🎶🌹🇮🇳✨
Post a Comment