मी प्रा. रफीक शेख गेली तब्बल 25 वर्षे परभणी येथे शैक्षणिक आणि सामाजिक कार्यक्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहे. सन 2008 पासून फेसबुक या प्रगत समाजमाध्यमाच्या माध्यमातून मी माझ्या शैक्षणिक, सामाजिक आणि वैचारिक भूमिकेची विवेकी अभिव्यक्ती सातत्याने करत आलो आहे. विचार, प्रबोधन आणि विवेक जागरण हेच या प्रवासाचं केंद्र राहिलं असून, तेही पूर्णतः निःस्वार्थ भावनेने.
फेसबुक या विचारव्यासपीठामुळे माझ्या अभिव्यक्तीला केवळ स्थानिक नव्हे, तर जागतिक स्तरावर पोहोच मिळाली. गेल्या दीड दशकांहून अधिक काळात राज्य, देशातील विविध व्यक्ती, शैक्षणिक संस्था, वैचारिक व्यासपीठे, स्वयंसेवी संस्था तसेच काही शासकीय संस्थांशी माझा वैचारिक संवाद आणि संबंध प्रस्थापित झाले. याचा मला अभिमान आहे आणि या संधीचे श्रेय फेसबुक या समाजमाध्यमालाच जाते.
भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 19(1)(a) नुसार मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विवेकी आणि जबाबदार वापर करत मी फेसबुकवर सातत्याने लेखन केले. आजपर्यंत 8 ते 10 लाखांचा वाचकवर्ग, 10–12 हजार फॉलोअर्स, 44,000 पेक्षा अधिक वैचारिक पोस्ट, लेख, शैक्षणिक उपक्रमांशी संबंधित माहिती आणि छायाचित्रे मी प्रकाशित केली आहेत.वेळोवेळी फेसबुकनें माझ्या सक्रीयतेची दखल घेत, गेल्या वर्षी फेसबुकने माझं अकाउंट Monetize करून तिमाही 100 डॉलरपेक्षा अधिक उत्पन्नही दिलं, हे माझ्या कार्याच्या विश्वासार्हतेचं द्योतक आहे. त्यामुळे फेसबुकप्रती माझ्या मनात कृतज्ञतेची भावना राहिली आहे.
महत्त्वाचं म्हणजे, फेसबुकच्या Community Guidelines संदर्भातील सर्व सूचना मी नेहमीच गांभीर्याने घेतल्या असून त्यांचं काटेकोर पालन केलं आहे आणि पुढेही करीन, याबाबत मी लेखी अभिवचन देण्यासही तयार आहे.
अशा पार्श्वभूमीवर कोणतीही पूर्वसूचना न देता माझं फेसबुक अकाउंट थेट Permanently Disabled करण्यात आलं, हा प्रकार केवळ धक्कादायक नाही तर गंभीर अन्यायकारक आहे. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे मला तीव्र मानसिक तणावाला सामोरं जावं लागत आहे.
फेसबुकच्या Help Center कडे मी सर्व अधिकृत मार्गांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. तसेच काही सायबर तज्ज्ञांशीही संपर्क साधला; मात्र या संपूर्ण प्रक्रियेतून मला केवळ निराशाच पदरी पडली आहे. कोणतेही ठोस उत्तर, स्पष्ट कारण किंवा पारदर्शक भूमिका आजपर्यंत समोर आलेली नाही, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे.
माझे विवेकी विचार आणि समाजप्रबोधनात्मक लेख जर फेसबुकच्या Community Guidelines चा भंग करणारे असतील, तर त्या संदर्भातील नेमकी, ठोस आणि लेखी कारणे सांगणे ही फेसबुकची नैतिकच नव्हे तर लोकशाही मूल्यांशी बांधील असलेली जबाबदारी आहे. ती जबाबदारी टाळून थेट अकाउंट Permanently Disabled करणे, हा प्रकार केवळ मनमानी आणि अन्यायकारक आहे.
अन्यथा, हा निर्णय माझ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालणारा, माझ्या वैचारिक भूमिकेची जाणीवपूर्वक मुस्कटदाबी करणारा आणि मी धार्मिक अल्पसंख्याक गटातून येत असल्याच्या पार्श्वभूमीवर गंभीर संशय निर्माण करणारा आहे. हा प्रकार मला मानसिक स्वरूपाचा हल्ला आणि वैचारिक दडपशाहीच वाटतो, असे स्पष्टपणे नमूद करतो.
अशा अन्यायकारक आणि अपारदर्शक कारवाईचा मी तीव्र शब्दांत निषेध नोंदवत असून, याकडे केवळ “तांत्रिक चूक” म्हणून पाहिले जाणे मला मान्य नाही.
फेसबुकने माझ्या खात्याबाबत नेमकी कोणती तांत्रिक अथवा धोरणात्मक अडचण आहे, हे स्पष्टपणे माझ्या निदर्शनास आणून द्यावं. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ मी फेसबुकला दिलेला अमूल्य वेळ, सातत्यपूर्ण कंटेंट, वैचारिक सक्रियता, नियमित पोस्टिंग, Meta Ads वर केलेला खर्च, मिळालेली लोकप्रियता आणि शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रातील माझी सार्वजनिक विश्वासार्हता या सर्व बाबींचा सखोल पुनर्विचार करून माझं अकाउंट तात्काळ पूर्ववत करण्यात यावं, ही ठाम मागणी आहे.
मी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील एक प्रतिष्ठित कार्यकर्ता असून, फेसबुकसारख्या प्रगत समाजमाध्यमाकडून अधिक पारदर्शकता आणि न्याय्य वर्तनाची अपेक्षा ठेवणं हा माझा अधिकार आहे.
जर पुढील एका आठवड्यात माझं अकाउंट सक्रिय करण्यात आलं नाही, तर माझ्यावरील या अन्यायाविरोधात जागतिक स्तरावरील मानवाधिकार संघटना तसेच कायदेशीर मार्गांचा अवलंब करण्यास मी बाध्य होईन, याची स्पष्ट नोंद घ्यावी.
प्रगत समाजमाध्यमांवर विश्वास ठेवणारे विवेकी वाचक, सभ्य आणि जागरूक फेसबुक वापरकर्ते, माझा वाचकवर्ग, संविधानप्रेमी नागरिक तसेच मुक्त अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींनी या लढ्यात मला साथ द्यावी, ही अपेक्षा.
– आपलाच एक वैचारिक स्नेही मित्र. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
🔰 डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन
“Nurturing Potential Through Education”
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#अभिव्यक्तीस्वातंत्र्य #Article19_1_a #संविधानप्रेम #लोकशाही #विचारस्वातंत्र्य #मुक्तअभिव्यक्ती #वैचारिकस्वातंत्र्य #लोकशाहीमूल्ये #FacebookAccountDisabled #UnjustBan #RestoreMyAccount #MetaTransparency #FacebookInjustice #CommunityGuidelines #DigitalRights #PlatformAccountability #HumanRights #DigitalHumanRights #MinorityRights #FreedomOfThought #NoToCensorship #IdeologicalSuppression #EducationForChange #SocialReformer #ThoughtLeadership #IntellectualResistance #VoiceOfEducators #SocialAwareness #वैचारिकप्रबोधन #शिक्षणआणिसमाज #ProfRafiqShaikh #विद्यार्थीमित्र #APJAbdulKalamFoundation #Parbhani #EducatorVoice #25YearsOfService #StandWithTruth #SupportFreeSpeech #SpeakUp #JusticeMatters #solidarity
Post a Comment