#अस्वस्थ_वर्तमानातून.. ✍️
‘निकड उच्च शिक्षणाच्या भरारीची’...
आजच्या दैनिक सकाळ ( नांदेड, मराठवाडा आवृत्ती) मध्ये
संपादकीय पानात 'भाष्य' या सदरात डॉ. अशोक कुडले सरांचा( शिक्षण क्षेत्र व अर्थशास्त्र अभ्यासक) लेख आजच्या वास्तविकतेवर प्रकाश टाकतो..
हा लेख केवळ उच्च शिक्षणाच्या आकडेवारीवर भाष्य करत नाही, तर भारतीय शिक्षणव्यवस्थेच्या अंतरंगातील गंभीर विसंगती उघड करतो. ‘भरारी’चा गाजावाजा करणाऱ्या धोरणांच्या पलीकडे वास्तव किती तोकडे आहे, हे लेखकाने ठोस संदर्भ, क्रमवारी आणि उदाहरणांच्या आधारे प्रभावीपणे मांडले आहे.
आज भारत विद्यार्थ्यांच्या संख्येत आघाडीवर असला, तरी गुणवत्तेच्या निकषांवर मागे पडतो..ही बाब वेदनादायक पण सत्य आहे. जागतिक क्रमवारीत मोजकीच विद्यापीठे दिसतात, संशोधनाचा दर्जा, आंतरराष्ट्रीय सहभाग, शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर, संशोधनासाठीचा निधी या सर्वच बाबींत आपण अजूनही अपुरे आहोत, हे लेख ठामपणे अधोरेखित करतो. ‘संख्येची वाढ म्हणजेच प्रगती’ ही मानसिकता उच्च शिक्षणाला घातक ठरत आहे, हा लेखाचा मुख्य आशय महत्त्वाचा आहे.
विशेषतः खाजगीकरण, व्यापारीकरण आणि दर्जाहीन संस्थांची वाढ यावर केलेली टीका अत्यंत समर्पक आहे. शिक्षण हे सेवा न राहता बाजारू उत्पादन बनत असताना, गरीब व मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांसाठी संधींचे दार अरुंद होत चालले आहे.
संशोधनाऐवजी प्रमाणपत्रांची स्पर्धा, ज्ञानाऐवजी गुणांची पूजा आणि विवेकाऐवजी यंत्रवत शिक्षण या प्रवृत्तींचे परिणाम देशाच्या बौद्धिक भविष्यावर गंभीर ठरणार आहेत, याची जाणीव लेख करून देतो.
हा लेख केवळ टीकात्मक नाही, तर सूचकही आहे. गुणवत्ताधिष्ठित सुधारणा, संशोधनाला प्रोत्साहन, शिक्षकांची बौद्धिक स्वायत्तता, सार्वजनिक विद्यापीठांचे बळकटीकरण आणि शिक्षणाचे सामाजिक भान.या दिशेने धोरणात्मक बदल आवश्यक असल्याचा अप्रत्यक्ष आग्रह यातून व्यक्त होतो.
थोडक्यात सांगायचे तर, हा लेख “आम्ही किती मोठे आहोत” या आत्मतुष्ट घोषणांवर पाणी फेरतो आणि “आपण किती सक्षम आहोत?” हा अस्वस्थ करणारा प्रश्न विचारतो.
विवेकवादी, प्रबोधनात्मक आणि वास्तवदर्शी लेखन म्हणून हा लेख वाचकांना आत्मपरीक्षणास भाग पाडतो आणि तेच त्याचे खरे यश आहे, असं मला वाटतं मित्रांनो..
हा लेख ऑनलाईन वाचण्यासाठी.. 👇
https://www.esakal.com/sampadakiya
एक शिक्षण प्रेमी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख,
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment