🔰विवेक, स्वातंत्र्य आणि जबाबदारी..सार्त्रची निर्भय विचारयात्रा
इतिहासाच्या प्रत्येक टप्प्यावर काही विचार असे जन्माला येतात, जे माणसाला केवळ विचार करायला भाग पाडत नाहीत, तर स्वतःकडे पाहण्याचं धाडस देतात. 20 व्या शतकातील अशाच निर्भय विचारवंतांपैकी एक नाव म्हणजे Jean-Paul Sartre...त्यांचा अस्तित्ववाद माणसाला दिलासा देणारा नाही, तर आरसा दाखवणारा आहे..निर्मम,पण मुक्त करणारा..
सार्त्र माणसाला सांगतो, “ तू जे आहेस, त्यासाठी कुणालाही दोष देऊ नकोस. कारण तू स्वतःचं स्वतःचा निर्माता आहेस.”
#ज्याँ- पॉल सार्त्र (Jean-Paul Sartre) कोण होता.?
Jean-Paul Sartre (1905–1980) हा फ्रान्सचा महान तत्त्वज्ञ, साहित्यिक व अस्तित्ववादी विचारवंत होता.त्याने Rational Existentialism मांडून “अस्तित्व आधी, स्वरूप नंतर” हा क्रांतिकारी विचार दिला आणि मानवी स्वातंत्र्य, विवेक व जबाबदारी यांवर भर दिला.
#अस्तित्व आधी, स्वरूप नंतर—एक क्रांतिकारक विधान..
परंपरागत तत्त्वज्ञान माणसाचं आयुष्य आधीच ठरलेलं मानत होतं देव, नियती, कर्म, संस्कार यांच्या चौकटीत...पण सार्त्र या चौकटी फोडतो.
तो ठामपणे सांगतो, “Existence precedes Essence.”
#माणूस आधी जन्मतो..नंतर तो आपल्या कृतींमधून स्वतःला घडवतो.याचा अर्थ असा की, " ना जन्म माणसाचं भवितव्य ठरवतो,ना धर्म त्याचं अंतिम सत्य ठरवतो,ना समाज त्याला कायमचा बंदिस्त करू शकतो."
ही कल्पना जितकी मुक्त करणारी आहे, तितकीच अस्वस्थ करणारीही आहे. कारण इथे माणसाकडे पळवाट नाही.
“ माणूस नियतीचा परिणाम नाही, तर निवडींचा परिणाम आहे; आणि स्वतःची जबाबदारी स्वीकारणं हाच खरा स्वातंत्र्याचा अर्थ आहे.”
#स्वातंत्र्य—वरदान नाही, तर जबाबदारीचा भार..
#सार्त्रच्या मते माणूस पूर्णतः स्वतंत्र आहे..पण हे स्वातंत्र्य सणासारखं नाही; ते ओझ्यासारखं आहे.
तो म्हणतो, “Man is condemned to be free.”
माणूस स्वातंत्र्यासाठी शापित आहे, कारण प्रत्येक निवडीनंतर “मी असं का केलं?” हा प्रश्न कुणालाच विचारता येत नाही; तो स्वतःलाच विचारावा लागतो.
" निवड न करणेही एक निवडच असते. गप्प बसणंही भूमिका असते. तटस्थता हीसुद्धा जबाबदारीच असते."
#आत्मफसवणुकीचा मुखवटा : Bad Faith
सार्त्र माणसाच्या एका घातक सवयीवर बोट ठेवतो—Bad Faith, म्हणजे आत्मफसवणूक...
“ मी गरीब आहे म्हणून…” “मी नोकर आहे म्हणून…” “परिस्थितीच अशी होती म्हणून…” ही सगळी वाक्यं कारणं नसून पळवाटा आहेत, असं सार्त्र ठामपणे सांगतो.
तो म्हणतो, " तू ज्या अवस्थेत आहेस, तीही कधीतरी केलेल्या निवडींचंच फळ आहे."
हा विचार बोचरा आहे...पण तोच विचार माणसाला झोपेतून जागं करतो.
#भीती नाही, तर जागरूकता : अस्तित्वात्मक अस्वस्थता
जेव्हा माणसाला कळतं की, " देव अंतिम निर्णयकर्ता नाही, नैतिकतेची हमी कुणी दिलेली नाही,आणि जबाबदारी पूर्णतः स्वतःचीच आहे, तेव्हा जी अस्वस्थता निर्माण होते, तिला सार्त्र Angst म्हणतो.
" ही भीती नसून जाणीव आहे. ही घबराट नसून जागृती आहे."
हीच अस्वस्थता माणसाला विचार करायला, प्रश्न विचारायला आणि बदल घडवायला भाग पाडते.
#विवेकाधिष्ठित नैतिकता : माणूस केंद्रस्थानी
सार्त्रचा अस्तित्ववाद देवविरहित असला, तरी तो अमानवी नाही.
उलट, तो म्हणतो, " आपण स्वतःसाठी जे निवडतो, ते संपूर्ण मानवतेसाठी एक आदर्श ठरतं."
म्हणजेच,आपली कृती ही केवळ वैयक्तिक नसते, ती सामाजिक घोषणा असते.इथे नैतिकता आदेशातून नाही,तर विवेकातून आणि जबाबदारीतून जन्म घेते.
#शब्दांतून कृतीकडे...
सार्त्र फक्त तत्त्वज्ञ नव्हता; तर तो कृतीशील विचारवंत होता.साहित्य, नाटक, कादंबरी यांच्या माध्यमातून त्यांनी माणसाच्या अस्तित्वातील प्रश्न लोकांसमोर आणले.नोबेल पुरस्कार नाकारणं ही केवळ वैयक्तिक घटना नव्हती तर ती संस्थात्मक सत्तेला दिलेली वैचारिक चपराक होती.
#आजच्या काळात सार्त्र का महत्त्वाचा?
आजचा माणूस धर्माच्या नावाखाली पळतो,व्यवस्थेच्या नावाखाली गप्प बसतो,आणि परिस्थितीच्या नावाखाली स्वतःची जबाबदारी झटकतो.
अशा काळात सार्त्र विचारतो, “तू नेमकं काय निवडलंस?”
हा प्रश्न अस्वस्थ करतो, पण तोच प्रश्न माणसाला माणूस बनवतो.
#माणूस—स्वतःचा निर्माता..
Jean-Paul Sartre माणसाला सांगतो,
" तुझं आयुष्य म्हणजे तुझं निमित्त नाही; तुझं आयुष्य म्हणजे तुझी घोषणा आहे."
हा विचार सोपा नाही.पण तोच विचार माणसाला गुलामगिरीतून मुक्त करतो...कारण जिथे देव संपतो,तिथे माणूस सुरू होतो..विवेकासह, स्वातंत्र्यासहआणि जबाबदारीच्या पूर्ण जाणिवेसह.
आज सार्त्रचा विचार केवळ तत्त्वज्ञानापुरता मर्यादित राहिलेला नाही; तो आपल्या दैनंदिन आयुष्याला आरसा दाखवतो. स्वतःच्या अपयशांना नियतीकडे ढकलणारा, अन्याय पाहूनही मौन पाळणारा आणि “माझ्यामुळे काय होणार?” या भ्रमात अडकलेला माणूस..या प्रत्येकाला सार्त्रचा प्रश्न छेदून जातो.
" कारण माणूस जेव्हा स्वतःची जबाबदारी स्वीकारतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो."
सार्त्र आपल्याला दिलासा देत नाही, तो आपल्याला जागं करतो. तो सांगतो की स्वातंत्र्य ही सवलत नसून कसोटी आहे; आणि विवेक ही केवळ बुद्धीची क्षमता नाही, तर कृतीची दिशा आहे.
म्हणूनच, "माणूस जेव्हा अन्यायाविरुद्ध उभा राहतो, प्रश्न विचारतो, आणि स्वतःच्या निवडींसाठी सजग राहतो,तेव्हाच त्याच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त होतो."
अखेरीस सार्त्रचा संदेश साधा, पण कठोर आहे, " तू तुझ्या आयुष्याचा प्रेक्षक नाहीस, तू त्याचा निर्माता आहेस. देव, नियती किंवा परिस्थितीच्या नावावर जबाबदारी टाकून चालणार नाही. कारण जिथे कारणं संपतात, तिथे माणूस सुरू होतो..विवेकाच्या प्रकाशात, स्वातंत्र्याच्या भारासह आणि जबाबदारीच्या निर्भय स्वीकारासह."
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#JeanPaulSartre #Existentialism #RationalExistentialism #ExistencePrecedesEssence #HumanFreedom #RadicalFreedom #Responsibility #Humanism #Philosophy #PhilosophicalThought #CriticalThinking #SelfResponsibility #ConsciousLiving #AwakenTheMind #ThoughtProvoking #QuoteOfTheDay #PhilosophyQuotes #IntellectualContent #MindAwakening #DeepThoughts #LifePhilosophy #Awareness #SpeakUp #QuestionEverything #माणूसस्वतःचानिर्माता #स्वातंत्र्यआणिजबाबदारी #विवेकवाद #अस्तित्ववाद #मानवीमूल्ये #विचारप्रबोधन #समाजपरिवर्तन #प्रश्नविचार #निर्भयविचार #मानवतावाद #वैचारिकलेखन #विचारांचीचळवळ #माणूसपण #स्वतःचीजबाबदारी #निवडींचातत्त्वज्ञान #RadicalHumanist #EducationalAwareness #SocialReform #YouthThinking #TheSpiritOfZindagi #InspireEducateEmpower #Vidyarthisathi #RafikShaikh
Post a Comment