🔰 काॅ. भालचंद्र कांगो — केवळ एक नेता नव्हे, तर विचारांचा प्रवास जगणारा खरा चळवळीचा माणूस...
सर्वसामान्य कार्यकर्त्याला समजून घेणारे, प्रत्येकाच्या मनातील संघर्ष ओळखणारे आणि वेगवेगळ्या प्रवृत्ती व क्षमता असलेल्या नेते-कार्यकर्त्यांना एका सूत्रात बांधणारे डाव्या चळवळीचे संवेदनशील दुवे.
बौद्धिक तीक्ष्णतेला विनम्रतेची जोड देत, स्पष्ट भूमिका आणि ठाम मांडणी करणारे व्यक्तिमत्त्व...स्वतः पुढे येण्यापेक्षा सामूहिक नेतृत्व घडवण्याची धडपड करणारे, आणि हे सगळं करताना अहंकाराचा लवलेशही न ठेवणारे.. हीच आपली खरी ओळख, कॉम्रेड..
विचार हे केवळ विचार-व्यासपीठावर मांडण्यासाठी नसतात, तर ते कृतीत उतरवण्यासाठी असतात, हे आपल्या वाटचालीतून सतत अधोरेखित होतं.
अशा काळात, जिथे नेतृत्व म्हणजे प्रसिद्धी मानली जाते, तिथे काॅ. कांगो जबाबदारी आणि समर्पणाचं प्रतीक ठरतात.
काॅम्रेड, आपलं आयुष्य हे चळवळीतील कार्यकर्त्यांसाठी एक जिवंत मार्गदर्शन आहे,विचारांनी प्रगल्भ, कृतीने निष्ठावंत आणि मनाने अत्यंत साधं.
आपल्याला वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक आणि लाल सलाम सह क्रांतिकारी हार्दिक शुभेच्छा..!
तुमचा संघर्ष, तुमची नम्रता आणि तुमचा विवेक हीच चळवळीची खरी ताकद आहे...लाल सलाम कॉम्रेड..! ✊
- आपलाच चळवळीतील एक साथी..
#विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख..
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment