“भीतीच्या पायावर उभा असलेला धर्म
काळाच्या ओघात कोसळतो;
विवेकाच्या शिलाखंडावर उभे असलेले
नीतिशास्त्र मात्र काळालाही तोंड देते.
जो माणसाच्या मनाला प्रश्न विचारण्याची,
विचार करण्याची आणि सत्य शोधण्याची हिंमत देतो..
तोच भयाच्या अंधारावर विजय मिळवणारा खरा देव ठरतो.”
— Baruch Spinoza
🔰 बारुख स्पिनोझा : विवेकप्रेमी आणि मुक्त नीतिशास्त्राचा दीपस्तंभ..
इतिहासाच्या प्रत्येक वळणावर काही विचारवंत असे उभे राहतात, जे काळाशी तडजोड करत नाहीत; उलट काळालाच प्रश्न विचारतात. भीतीच्या सावल्यांत अडकलेल्या समाजाला ते आरसा दाखवतात आणि ठामपणे सांगतात...“सत्य बाहेर नाही; ते माणसाच्या स्वतःच्या बुद्धीत दडलेले आहे.”
बारुख स्पिनोझा हे असेच निर्भीड, विवेकवादी आणि मुक्त विचारांचे तत्त्वज्ञ होते. देव, धर्म आणि नैतिकतेभोवती उभ्या राहिलेल्या अंधश्रद्धेच्या भिंती त्यांनी तर्काच्या प्रकाशाने भेदून काढल्या.
बारुख स्पिनोझा (1632–1677) हा नेदरलँड्समधील महान विवेकवादी तत्त्वज्ञ आधुनिक तत्त्वज्ञानाच्या इतिहासात क्रांतिकारक मानला जातो. धर्मापेक्षा विवेक, निसर्ग आणि बुद्धीवर आधारित नीतिशास्त्र मांडणारा हा विचारवंत आपल्या काळाच्या कित्येक पावले पुढे होता. समाजातून बहिष्कृत होण्याची किंमत मोजूनही त्याने विचारस्वातंत्र्याशी कधीही तडजोड केली नाही.
स्पिनोझाच्या तत्त्वज्ञानाची सुरुवातच एका धाडसी नकारातून होते.नैतिकता ही देवाच्या भीतीवर उभी राहू शकत नाही. कारण भीती माणसाला सज्जन बनवत नाही; ती त्याला आज्ञाधारक गुलाम बनवते. विवेक मात्र माणसाला जबाबदार, सजग आणि स्वतंत्र बनवतो.
म्हणूनच स्पिनोझासाठी सदाचार म्हणजे स्वर्गाच्या लालसेतून किंवा नरकाच्या धास्तीतून केलेले कर्म नव्हे, तर बुद्धीने समजून घेतलेली आणि समाजहिताशी जोडलेली कृती होय. त्यांच्या शब्दांत सांगायचे तर...
" नैतिकता ही धर्मग्रंथातील आज्ञा नसून, जीवन समजून घेण्याची एक प्रगल्भ कला आहे."
देवाविषयी बोलताना स्पिनोझाने मानवी कल्पनांना मोठा धक्का दिला. त्यांनी देवाला सिंहासनावरून खाली उतरवले आणि निसर्गाच्या प्रत्येक कणात विराजमान केले. देव म्हणजे निसर्ग ही केवळ तत्त्वज्ञानातील संकल्पना नव्हे, तर मानवाला भयमुक्त करणारी घोषणा होती.
चमत्कार, दैवी शिक्षा, वरदानांची लालसा...या साऱ्या कल्पनांना त्यांनी कारण–परिणामाच्या विवेकशील चौकटीत विसर्जित केले. " देवाला खूश करण्यापेक्षा निसर्ग समजून घेणे अधिक पवित्र आहे. ", हा निर्भय संदेश त्यांनी दिला.
स्पिनोझाच्या नीतिशास्त्राचा गाभा स्वातंत्र्यात आहे; पण हे स्वातंत्र्य मनमानीचे नाही. जो रागाच्या भरात निर्णय घेतो, तो मुक्त नसतो; जो भीतीने वाकतो, तोही मुक्त नसतो. " खरे स्वातंत्र्य म्हणजे आपल्या भावना समजून घेणे, त्यांच्यावर विवेकाचा अंकुश ठेवणे आणि निसर्ग नियमांशी सुसंवाद साधत जगणे."
" ज्याने स्वतःच्या मनावर विजय मिळवला, त्याला बाह्य सत्तेची गरज उरत नाही.. " हा विचार आजही तितकाच प्रखर आहे.
धर्म आणि राज्य यांच्यातील नातेसंबंधांवर स्पिनोझाने दिलेला इशारा आजच्या काळात अधिकच अर्थपूर्ण वाटतो. धर्म जेव्हा सत्तेच्या हातात शस्त्र बनतो, तेव्हा विचारस्वातंत्र्याची हत्या होते. राज्याचे काम लोकांच्या श्रद्धा नियंत्रित करणे नसून, त्यांना मुक्तपणे विचार करण्याची मुभा देणे हे आहे. कारण प्रश्न विचारणारा नागरिकच खरा जबाबदार नागरिक असतो; अंधानुकरण करणारा नव्हे.
स्पिनोझाचा वारसा म्हणजे केवळ तत्त्वज्ञान नव्हे; तो एक जीवनदृष्टी आहे. मानवतावाद, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि धर्मनिरपेक्ष मूल्ये...या साऱ्यांच्या मुळाशी स्पिनोझाचा विवेकवादी दीप अखंड प्रज्वलित आहे.
म्हणूनच आइन्स्टाईनसारखा शास्त्रज्ञ म्हणतो, “मी स्पिनोझाच्या देवावर विश्वास ठेवतो.” हा देव भीती मागत नाही; तो समज, तर्क आणि नैतिक जबाबदारी मागतो.
आजच्या अस्वस्थ, ध्रुवीकरण झालेल्या आणि भावनांच्या भरात वाहून जाणाऱ्या काळात स्पिनोझाचे विचार केवळ अभ्यासासाठी नव्हे, तर जगण्यासाठी आवश्यक ठरतात. धर्म, जात, राष्ट्र आणि ओळखींच्या नावाने भीती पेरली जाते; प्रश्न विचारणाऱ्यांना संशयाने पाहिले जाते. अशा वेळी स्पिनोझा आपल्याला ठामपणे आठवण करून देतो.. " विचार करणे हे पाप नाही; ते माणूस असण्याचे सर्वात मोठे लक्षण आहे."
विवेक नाकारणारा समाज क्षणभर शिस्तबद्ध वाटू शकतो; पण तो आतून कुजत जातो. विवेक स्वीकारणारा समाजच दीर्घकाळ मानवी, सशक्त आणि न्याय्य राहतो.
म्हणूनच.. बारुख स्पिनोझा हा केवळ भूतकाळातील तत्त्वज्ञ नाही;तर तो आजच्या काळातील विवेकाचा जिवंत संदर्भ आहे, अंधारात दिशा दाखवणारा, मुक्त विचारांचा अखंड दीपस्तंभ.
धन्यवाद, मित्रांनो..🙏
(टीप : वरील लेख हा विविध मुक्त स्रोतांतील माहिती संकलित करून सादर केलेला संशोधित स्वरूप आहे.)
-विचार संकलन आणि संपादन..✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#BaruchSpinoza #स्पिनोझा #SpinozaPhilosophy #Ethics #नीतिशास्त्र #ReasonOverReligion #विवेकवाद #Rationalism #Humanism #मानवतावाद #FreeThinking #विचारस्वातंत्र्य #Philosophy #तत्त्वज्ञान #ModernPhilosophy #Secularism #धर्मनिरपेक्षता #Atheism #Pantheism #GodIsNature #DeusSiveNatura #CriticalThinking #प्रश्नविचार #TruthSeeking #सत्यशोध #FearVsReason #भीतीविरुद्धविवेक #EthicalLiving #MoralPhilosophy #lifephilosophy #ThoughtLeadership #IntellectualRevolution #SocialReform #समाजप्रबोधन #SocialAwakening #ScientificTemper r #वैज्ञानिकदृष्टी #HumanValues #MoralCourage #FreedomOfThought #Expression #AntiDogma #AgainstBlindFaith #RationalEthics #VivekachaDeep #विवेकाचा_दीपस्तंभ #InspirationalWriting #MotivationalThoughts #ThoughtProvoking #DeepThoughts #PhilosophicalQuotes #SpinozaQuotes #wisdom #ज्ञान #प्रबोधन #Enlightenment #ReformistIdeas #ProgressiveThinking #RadicalHumanism #CriticalMind #IntellectualFreedom #ModernHumanism #SocialConsciousness #YouthInspiration #StudentsMovement #EducationalThought #ThinkDifferent #QuestionEverything #FearlessThinking #MindOverFear #EthicsOfFreedom #HumanCentered #ReasonAndLogic #LifeAndTruth #PhilosophyLovers #ReadersOfPhilosophy #MarathiThought #मराठीलेखन #मराठीविचार #MarathiArticle #MarathiIntellectual #indianreaders
Post a Comment