जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या विद्यार्थी निवडणुकीत पुन्हा एकदा विवेक, विचार आणि संघर्षाने भरलेला डाव्या चळवळीचा विजयश्रीचा लाल झेंडा फडकला आहे. ✨
अभाविपचा दारुण पराभव.. म्हणजे विचारांवर सत्ता लादण्याच्या प्रवृत्तीला विद्यार्थ्यांनी दिलेला ठाम नकार..
अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि संयुक्त सचिव,या चारही पदांवर डाव्या विचारसरणीच्या तरुणांचा विजय म्हणजे शिक्षण संस्थांमध्ये बुद्धी, विवेक आणि बंधुतेच्या विचारांचा पुनर्जन्म.
आजच्या या यशात फक्त मतांचा आकडा नाही, तर तो विद्यार्थी जागृतीचा घोष आहे...
हा विजय आहे...
✊ संविधानावर विश्वास ठेवणाऱ्या विचारांचा,
✊ लोकशाहीत विश्वास ठेवणाऱ्या मनांचा,
✊ आणि विचारांवर विश्वास ठेवणाऱ्या तरुण पिढीचा!
आता भाजपप्रणित प्रवक्ते, त्यांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे, या तरुणांवर ‘अर्बन नक्षल’ किंवा ‘देशद्रोही’ अशी शिक्कामोर्तब भाषा वापरतील... पण विचारांना शिक्के लावून कोणीच रोखू शकत नाही.
कारण विचार हे गोळीने मरत नाहीत, ते प्रत्येक विद्यार्थ्याच्या अंतर्मनात पुन्हा पुन्हा जन्म घेतात.
हा विजय म्हणजे...
💫 बुद्धीचा बंड,
💫 स्वाभिमानाचा जयघोष,
💫 आणि सामाजिक न्यायाच्या वाटचालीतील तेजस्वी टप्पा!
जय भीम! लाल सलाम! ✊
विचारांचा प्रवास चालूच राहील… कारण विचार हेच खरी क्रांती आहेत. 🔥
-एक कॉम्रेड ✍️
Post a Comment