जीवन म्हणजे एका क्षणाचं दान आणि एका श्वासाचं ऋण.
निसर्गानं आपल्याला दिलेलं हे आयुष्य थोडं असलं तरी फार मोठं आहे..कारण “मोठेपण” हे काळाच्या मोजमापात नसतं, तर ते मनाच्या उंचीमध्ये असतं...!
जेव्हा माणूस स्वतःच्या अस्तित्वाचं भान ठेवतो, तेव्हा तो जगायला शिकतो.जगण्याची अक्कल कुणी शिकवायची नसते; ती अनुभव, अपयश, आणि हृदयाच्या धक्क्यांनी जन्माला येते.
शाळेतील पुस्तकं साक्षर करतात, पण जीवनातील माणसं सुजाण करतात..कधी रागाने, कधी अपमानाने, कधी प्रेमाने तर ती प्रत्येक क्षणाला आपल्याला घडवत असतात.
फेसबुकच्या चेहऱ्यांमध्ये जग सुंदर दिसतं, पण वास्तव हे “अबाउट” सेक्शनमध्ये कधी दिसत नाही.
स्टेटस 30 सेकंदाचं असतं, पण माणसाची अवस्था अनेक वर्षांची असते.त्यामुळे या छोट्याशा जीवनात आपण “फिल्टर” लावून नव्हे, “मन” उघडून जगायला हवं.
थोडं जगणं, पण मनापासून जगणं...
आपण कुणाच्या मनावर ओझं नको ठेवायला; कारण मनावरचं ओझं हे आत्म्याची थकवा बनतं...जिथं प्रेम नाही, तिथं नातं कोरडं पडतं...जिथं विश्वास नाही, तिथं व्यवहार कुंठित होतो.
आणि जिथं काळजी नाही, तिथं माणुसकीची सावलीही टिकत नाही.
म्हणून, या छोट्याशा आयुष्यात द्वेष नको, दोषारोप नको..
कारण द्वेषाने मिळत काहीच नाही, फक्त अंतःकरण काळं होतं.
जे आपल्या विरुद्ध वागले, त्यांना माफ करणं म्हणजे आपली उंची दाखवणं...त्यांच्या चुकीत अडकून राहणं म्हणजे स्वतःच्या उजेडाला कैद करणं.
आपण आपल्याच आयुष्याचे मॅनेजर असायला हवे..
जो प्रत्येक व्यक्तीच्या मनात सुखाचं खाते उघडतो, प्रेमाचं व्याज देतो, आणि विश्वासाचं चलन जपतो...अनोळखी माणूसही आपल्यातला सुगंध घेऊन जावा,अशी आपुलकीची सुवासिकता असावी..
झिजायचं तर चंदनापरी झिजा,कारण लोखंड घाव देतं, पण चंदन सुगंध देतं.
चांगलं राहा, जरी जग बदलत असेल तरी..
कारण चांगुलपणा हा मूर्खपणा नाही तर तो माणुसकीचा सर्वात उच्च प्रकार आहे...जो आपल्यावर अन्याय करतो, त्याच्या कर्माचं ओझं आपल्यावर नाही.आपल्याच कृतींनी आपली ओळख बनते, आणि तीच खरी प्रतिष्ठा असते.
✨ "सोनं, चांदी, यश हे जगाचं मोजमाप आहे, पण सुवासिक मातीसारखं नम्र होणं, हेच आत्म्याचं सौंदर्य आहे."
✨ "प्रसिद्धीपेक्षा सिद्धता श्रेष्ठ आहे, कारण ती वेळेच्या नजरेत नव्हे तर माणसांच्या मनात झळकते."
थोडं आयुष्य असो, पण ते इतकं मोठं असावं की त्यात आपल्या माणुसकीचा सुगंध सदैव दरवळत राहील..!
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
#थोडंपणफारमोठंजगावं #जीवनाचाअर्थ #प्रेरणादायीविचार #PositiveVibes #LifeLessons #MotivationalMarathi #MarathiQuotes #ThoughtsOfTheDay #InspirationDaily #MarathiMotivation #ManachiBaat #LifePhilosophy #PositiveMindset #SelfGrowth #HumanityFirst #ThinkPositive #WisdomWords #EmotionalIntelligence #KindnessMatters #PeacefulMind #MarathiWriter #VivekvaadiVichar #SocialAwareness #MindfulLiving #LifePurpose #BeTheChange #Goodness #SimpleLivingHighThinking #Empathy #HeartTouchingThoughts #ProfRafikShaikh, #jaibhim #SpiritOfZindagiFoundation#DrAPJAbdulKalamVidyaarthiFoundation #Parbhani #SocialWriter #InspirationalWriter #EducationalReformer #MarathiLiterature #SocioSpiritualThoughts #PremVishwasAaniManuski #ChandanapariZhizayach #DilSeJaga #EmotionalWisdom #MaanaviMulya #JeevanPrerna #SelfRespect #ForgiveAndGrow #TrustAndLove #BeKindAlways #SoulfulLiving #LifeMotivation #HumanValues #LiveWithPurpose #PeaceAndPositivity #MindsetMatters #ThePowerOfGoodness #EmbraceLife #ThinkDeeply #SpiritualGrowth #bettertomorrow,
#trending #love #motivation #inspiration #photooftheday #viralvideo #positivity #mindsetmatters #lifegoals #PositiveVibesChallenge
Post a Comment