शिक्षणाचा मूलभूत अर्थ हा कधीच “स्वस्त” नव्हता; ते सर्वांसाठी उपलब्ध असावं..ही सरकारची नैतिक जबाबदारी आहे.
पण उपलब्धता म्हणजे दर्जा पाडणे नव्हे. शिक्षकाला कमी पगार देऊन शिक्षणाच्या पवित्र क्षेत्राला स्वस्तात तडजोडीचा बाजार बनवणे, ही समाजाची सर्वात मोठी चूक आहे.
इंग्रजी माध्यम ही प्रतिष्ठेची शर्यत बनली आहे, पण त्याची फी सामान्य पालकांना परवडण्याजोगी नाही..
शिक्षण परवडत नाही म्हणून मुलगा मागे राहतो...हे अपयश शिक्षकाचे नाही, तर व्यवस्थेचे आहे.
जर 15 हजाराचा आणि 70 हजाराचा शिक्षक एकसारखेच असते, तर डॉक्टर, इंजिनिअर, IAS, न्यायाधीश हेही 15 हजारात मिळाले असते.
शिक्षकाचं वेतन म्हणजे त्याच्या डिग्रीचे मोल नाही; तर ती एका पिढीचे भविष्य, तिची गुणवत्ता, तिची विचारशक्ती घडवण्याच्या जबाबदारीचा सन्मान आहे.
सरकारने शिक्षण स्वस्त करावं..हो..!
पण शिक्षक स्वस्त बनवू नयेत...स्वस्त शिक्षक तयार होतात तिथे स्वस्त विचार जन्माला येतात, आणि स्वस्त विचारांनी देश भविष्याकडे नाहीं तर अंधाराकडे जातो...
म्हणून स्पष्ट सांगू..
शिक्षण मोफत असू शकतं, पण शिक्षकाची गुणवत्ता कधीच स्वस्त नसावी;कारण राष्ट्राचे भविष्य कमी पगारात घडवता येत नाही.
-एक शिक्षण प्रेमी आणि संशोधक.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख,
डॉ. कलाम ग्रुप ऑफ एज्युकेशन आणि शैक्षणिक संशोधन संस्था.
शिक्षण | सेवा | सामाजिकता | संशोधन | प्रकाशन
Post a Comment