जे अशक्य वाटलं, ते अखेर घडलं... न्यूयॉर्कच्या अब्जाधीशांना पराभूत करत, अवघ्या तिशीतील जोहरान ममदानीने इतिहास घडवला.
"जगातील सर्वात श्रीमंत शहरात कष्टकरी लोकांचं सन्मानाचं जगणं हा त्यांचा हक्क आहे!" असं जाहीर सांगणारा हा तरुण आज न्यूयॉर्कचा नवा चेहरा ठरला आहे..
राजकारणातल्या प्रस्थापित सत्तेला हादरा देणारा हा तरुण, मार्टिन ल्युथर किंग यांच्या शब्दांना प्रेरणा मानतो..
"लोकशाही असो वा समाजवाद, पण संपत्तीचे योग्य वाटप हे देवाच्या सर्व मुलांसाठी आवश्यक आहे."
सर्वांसाठी परवडणारी घरे, मोफत बससेवा, स्वस्त आरोग्यसेवा, स्वस्त किराणा योजना...हे त्याचे ‘लोककल्याणाचे मॉडेल’
तो अमेरिकेला पुन्हा एकदा "वेलफेअर स्टेट" च्या दिशेने नेत आहे.
धर्म, वंश, जातींच्या पलिकडे जाऊन जोहरान स्पष्ट सांगतो,
"जे योग्य ते योग्य, जे चुकीचं ते चुकीचं."
इस्राईलच्या युद्धनीतीवरही तो आवाज उठवतो आणि म्हणतो,
“मानवतेपेक्षा मोठं कुठलंच राष्ट्र नाही..!”
या तरुणानं केवळ न्यूयॉर्क नव्हे, तर जगभरातील राजकारणात नव्या मानवकेंद्री युगाचा आरंभ केला आहे..
तो फक्त नेता नाही, तर तो एक चळवळ आहे आशेची, विवेकाची आणि परिवर्तनाची...
भारतीयांसाठी अभिमानाची बाब म्हणजे..
जोहरान हा प्रसिद्ध दिग्दर्शिका मीरा नायर यांचा पुत्र आणि विचारांचा वारसदार आहे.
अवघ्या तिशीत तो शिकवतो..
“राजकारण म्हणजे सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या आशांचा प्रवास.”
अशा नव्या युगाचा दूत जोहरान ममदानी..! 🌹
विचार संकलन आणि संपादन.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
Post a Comment