“ज्याचं आयुष्यच ज्ञानाचा दीप आहे, त्याला अंधार कधीच घेरू शकत नाही.”
“पुन्हा एकदा ज्ञानदीप प्रज्वलित करण्याच्या प्रवासात...✍️
कधी कधी आयुष्य एखाद्या शांत तलावासारखं वाटतं, आणि त्या तलावात अचानक उठलेली लहर आपल्या मनाला थोडं हलवून जाते...
मागील आठवड्यात आलेल्या हृदयविकाराच्या सौम्य झटक्यानंतर..जरी काही क्षण विश्रांती घेतली, तरी आत्म्याची जिद्द आणि मनातील सेवा-प्रेरणा कधीच थांबत नाही..
आज पुन्हा नव्या ऊर्जेनं, नव्या संकल्पानं, आणि नव्या चेतनेनं..
आपणा सर्वांच्या सेवेसाठी सज्ज आहे मित्रांनो... 🙏
शिक्षण, सेवा,मार्गदर्शन, सामाजिकता,लेखन-संशोधन कार्यासाठी समर्पित सेवा भावनेने.. पुन्हां एकदा सुसज्ज..
🎓 शिक्षण — माझं केवळ कार्य नाही, ती माझी साधना आहे.
✍️ लेखन — माझं केवळ माध्यम नाही, तर ती माझ्या विचारांची ज्योत आहे.
🔬 संशोधन — माझं केवळ कर्तव्य नाही, तर ती सत्य शोधण्याची तपश्चर्या आहे.
🌍 सामाजिकता — माझं केवळ परिश्रमाचं क्षेत्र नाही, तर ती माझ्या आत्म्याची प्रेरणा आहे.
या सगळ्या प्रवासात,आपल्या स्नेह, शुभेच्छा आणि सदिच्छांचा सागर पाठीशी असल्यामुळे,मी पुन्हा एकदा नव्या ऊर्जेनं, नव्या आशेनं, नव्या तेजानं पुढे चाललो आहे.
चला, पुन्हा पेटवूया आयुष्याच्या ज्ञान-मशाली...🔥
ज्या प्रकाशात विचार उजळतील, मनं जागतील, आणि समाज घडेल.
आपल्या सगळ्यांच्या प्रेम, स्नेह आणि विश्वासाबद्दल
मनःपूर्वक आभार. 🙏
– आपल्या सेवेत,
ज्ञान, प्रबोधन आणि प्रेरणेच्या मार्गावर अखंड प्रवासात... ✍️
-आपलाच #विद्यार्थीमित्र.. ✍️
प्रा.रफीक शेख,
एक साहित्यप्रेमी, शिक्षण-प्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
The Spirit of Zindagi Foundation
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
डॉ. कलाम ग्रुप ऑफ एज्युकेशन आणि शैक्षणिक संशोधन संस्था.
शिक्षण | सेवा | सामाजिकता | संशोधन | प्रकाशन
Post a Comment