हरवू नकोस..तूच स्वतःची पहाट आहेस... ✍️
खोलून काळाच्या खुणा,
उमलू देत नवे स्वप्न पुन्हा;
दुःखांच्या सावलीत थांबू नकोस..
थांबून जगणं म्हणजे स्वतःवरचा गुन्हा.
उचल एक नवा श्वास,
फोड निराशेच्या काचा;
मनाच्या पडद्यामागे
उगवतो प्रकाश जिद्दीचा त्याचा.
राख झालेल्या दिवसांतून
उठू देत नवी उमेद आनंदा;
जगणं म्हणजे रणांगणातील कविता,
आणि हार मानणं,आत्म्याचा सर्वात मोठा गुन्हा.
तुटलेल्या क्षणांच्या राखेतून
वेदना झडू दे सरीसारख्या;
जीवनाची चाकं फिरतात पुढे..
थांबवू नकोस त्यांना दु:खाच्या वेदनासारख्या..
वाऱ्याला विचारून बघ,
उधळूनही तो परत शांत वाहतो;
मनाला शिकव त्याचा धडा..
जखम झाल्यावरही तोच नव्या तालात गातो.
म्हणून उघड मनाच्या खिडक्या,
जाऊ देत अंधाराचे क्षण दूर क्षितिजा;
आज पुन्हा जगण्याची वेळ आली
कारण स्वतःला हरवणं हाच खरा गुन्हा..
उद्याचा सूर्य उगवतो
कालच्या अंधारावर टाकत प्रकाशाची रेषा;
तसाच तूही उभा राहा नव्याने,
आणि लिहून टाक जीवनाची नवी दिशा..
-विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
Post a Comment