“शब्दांच्या धारेतून उठणारी ही लढाई… मानवतेसाठी, विवेकासाठी, आणि प्रबोधनाच्या अनंत उजेडासाठी आहे.”
जेव्हापासून मी लिहायला सुरुवात केली, तेव्हापासून शब्दांना धार आली…आणि जिथे धार असते, तिथे संघर्षाचा प्रवाह ओघानेच वाहत येतो.
मानवतावादी विचार, विवेक जागरण आणि प्रबोधनाच्या कार्यासाठी मी लिहायला सुरुवात केली… तेव्हा शब्द फक्त अभिव्यक्ती नव्हते, तर ते ध्येय झाले. माझ्या लेखणीने जेव्हा पहिल्यांदा समाजातील विसंगतींना स्पर्श केला, तेव्हा लेखणी तलवारीसारखी भासत होती..
निरपराधांना ढाल,आणि अन्यायाच्या छातीवर पडणारा प्रखर वार..!
परखड मत मांडण्याची हिंमत केली की,प्रतिकूलतेचे वारे आपोआप सुटतातच…प्रत्यक्षात आणि इनबॉक्समध्ये येणाऱ्या धमक्या हा या प्रवासाचा केवळ अपघाती भाग आहे.
पण प्रश्न नेहमीच मनाला कुरतडतो..🫣
“लेखणी हाती घेतली म्हणजे तलवार उचलल्यासारखं असतं का?”
हो..!
कारण जेव्हा शब्द सत्य बोलतात तेव्हा सत्तेच्या सिंहासनाला अस्वस्थ करतात. जेव्हा विवेक उजळतो, तेव्हा अंधकार चिडतो...जेव्हा मानवता उभी राहते, तेव्हा स्वार्थी मनोवृत्ती थरथरते.
पण मी थांबलो नाही…आणि थांबणारही नाही...!
कारण मला ठाऊक आहे, विचारांची आग कधी विझत नाही, ती प्रत्येक युगात परिवर्तनाची नवीन ज्योत पेटवत राहते...तीच आग माझं ध्येय आणि माझी प्रेरणा आहे, मित्रांनो..🔥
“ मनाला जागृत करणं आणि समाजाला सजग करणं..हाच माझ्या शब्दांचा खरा धर्म आहे. ”
मी लिहितो तेव्हा माझं ध्येय फक्त लेखन नसतं…मी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना आवाज देतो,समाजातील दुर्बलांच्या वेदना शब्दात उतरवतो,शिक्षणाच्या व्यापारीकरणा विरोधात विवेकाचा दीप लावतो,मानवतेला सर्वश्रेष्ठ मानणारी दृष्टी समाजात रुजवायचा प्रयत्न करतो.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्य करताना जाणवलेली प्रत्येक विसंगती, अन्याय आणि अनुत्तीर्ण व्यवस्था माझ्या लेखनाला दिशा देते.
विद्यार्थी मानसिक आरोग्य, शिक्षक-विद्यार्थी नात्यांची संवेदनशीलता, शिक्षणाचा मूलभूत हक्क, आणि सामाजिक समतेचा आग्रह...या सर्व विषयांवर माझी लेखणी नेहमीच सजग, तटस्थ आणि मानवतावादी राहिली आहे.
“मी लिहितो कारण मनाची शाई शांत बसू देत नाही… आणि विवेकाला मौन कधीच मान्य नसतं.”
माझ्या मनातील आणि पोस्टमधील उणिवा निर्भेळ मनाने दाखवणारे सर्वजण माझे खरे गुरू आहेत.
अशा सज्जनांनीच माझ्या लेखणीला दिशा दिली, माझे विचार अधिक परिष्कृत केले,आणि मला समज दिली की, विचारांमध्ये परखडपणा असेल,आणि मनात मानवता असेल, तर सत्याचा मार्ग कधीच चुकत नाही.
“सत्य बोलणारे शब्द नेहमी अस्वस्थ करतात पण अंधाराला घाबरवणारा प्रकाश देखील तेच निर्माण करतात.”
मी लिहितो तेव्हा मला जाणवतं..
शब्द हे शस्त्र नसतात…ते प्रकाशकिरण असतात. ते अंधारावर हल्ला करत नाहीत, पण अंधाराला स्वतःहून हटायला भाग पाडतात.
माझ्या लेखणीचा प्रत्येक वार मानवतेसाठी, विवेकासाठी, प्रबोधनासाठी आहे.
आणि म्हणूनच हा प्रवास अखंड सुरू राहणार आहे…✍️
कारण माझा विश्वास साधा आहे..प्रबोधनाची ज्योत विझत नाही,
ती युगांना उजळण्यासाठीच जन्म घेते, असं मला वाटतं.
आपल्या सर्वांच्या वैचारिक स्नेह, प्रेम आणि कौतुकाच्या प्रोत्साहनामुळे माझ्या लेखनप्रवासाला नव्या ऊर्जेची, नव्या जिद्दीची आणि नव्या दिशेची प्रेरणा मिळते; आपल्या विश्वासातून मिळणारी ही उबच मला अधिक प्रामाणिकपणे लिहायला, सत्याशी निष्ठावान राहायला आणि समाजासाठी विवेकाचा प्रकाश पेटवायला सामर्थ्य देते.
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
-आपलाच एक विद्रोही आणि वैचारिक मित्र..
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख.. ✍️
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#मानवतावाद #विवेक #प्रबोधन #लेखणीचीशक्ती #विचारप्रवाह #प्रेरणालेखन #IntellectualWritings #VoiceOfHumanity #ThoughtRevolution #PenForChange #सामाजिकप्रबोधन #विवेकजागरण #HumanityFirst #TruthSpeaks #FearlessWriting #IdeologicalWriter #SocialAwareness #EducationalReform #StudentVoice #मानसिकआरोग्य #StudentMentalHealth #EducationRights #AntiCommercialization #स्वतंत्रविचार #परखडलेखन #FearlessThoughts #RevolutionThroughWords #ThoughtWarrior #PenIsPower #wordrevolution #WriterWithPurpose #प्रेरणा #आवाजद्या #SocialJustice #HumanRights #SpeakTruth #ConstitutionalValues #AwakeSociety #Vivekwadi #literaturelover #TheSpiritOfZindagi #inspireeducateempowerexcel #DrAPJAbdulKalamFoundation #EducationalJourney #SocialResponsibility #AwarenessMovement #AuthorLife #MarathiWriter #IntellectualJourney #TransformWithThoughts #BeTheChange #WriterCommunity #VoiceForVoiceless #YouthAwakening #ज्ञानदीप #शब्दक्रांती #QuietRevolution #LightAgainstDarkness
Post a Comment