समजा आपल्याला प्रॉब्लेम आलाय ; आता आपण त्याच्यावर पर्याय काढतो..पण कोणत्याही प्रॉब्लेम त्यावर उपाय करणे हे तेव्हाच जमतं ; जेव्हा आपल्याला नेमकी अडचण काय आहे ? हे समजतं.
हा प्रॉब्लेम नेमका शोधता यावा याकरीताच टोयोटाचे संस्थापक सकिची टोयोदा यांनी “फाईव्ह व्हायज्” (Five Whys) नावाचं एक अतिशय साधं पण जबरदस्त तत्त्व सांगितलं होतं.
त्यांचं म्हणणं असं होतं की — जेव्हा कधी गोंधळ वाटतो,निर्णय कठीण वाटतो,
तेव्हा स्वतःला सलग पाच वेळा “का?” हा प्रश्न विचारा !
पाचव्या “का” पर्यंत पोहोचल्यावर खरी कारणं,मूळ सत्य,नेहमी समोर येतं.
उदा. — समजा तुम्हाला अचानक एक लक्झरी कोट घ्यायची इच्छा झाली.
📌पहिला “का?” — मला हा कोट का हवा आहे?कारण मला लोकांना इम्प्रेस करायचं आहे.
📌दुसरा “का?” — लोकांना इम्प्रेस का करायचं आहे?
कारण,मला त्यांच्या कडून माझ्याकडे अटेंशन हवंय.
📌तिसरा “का?” — मला लोकांचं अटेंशन का हवंय?कारण,मी आतून असुरक्षित वाटतंय.
📌चौथा “का?” — मला असुरक्षित का वाटतंय?
कारण मी अजून माझं खरं ध्येय गाठलेलं नाही मी अडकलेलो आहे.
📌पाचवा “का?”मग मी अजून ते यश का गाठलेलं नाही? कारण मी सध्या जे करत आहे,ते मला खरंच आवडत नाही.
आता स्वतःलाच विचारा — त्या कोटचा आणि या सगळ्याचा काय संबंध आहे?
टोयोटा म्हणतात की ; पाचव्या “का” नंतर जे उत्तर येतं,तेच खरं मूळ कारण असतं —जे वरवरच्या गोष्टींपेक्षा खूप आत दडलेले असतं
ते पाचवं “कारण” आपल्या आत असणाऱ्या प्रॉब्लेमवर बोट ठेवतंय
ते आपल्याला दाखवतं आपण खरोखर कोण आहोत,काय लपवतोय, आणि काय खरंच महत्त्वाचं नाही.
🎯जगातल्या सर्व मोठा कंपन्यांच्या मॅनेजमेंट मध्ये हे प्रिन्सिपल प्रॉब्लेम सॉल्विंग करता वापरला जातं कारण ? हे तत्त्व फक्त समस्या सोडवण्यासाठी नाही — तर स्वतःला ओळखण्यासाठीचं एक आरसा आहे.म्हणून जेव्हा कधी तुम्हाला मोठा प्रॉब्लेम किंवा छोटा प्रॉब्लेम समोर येईल तेव्हा स्वतःला पाच वेळा "का" विचारा !
कोणती समस्या लवकर सुटेल..
Post a Comment