" वास्तवाशी संघर्ष असणाऱ्यांचं वेदनेशी नातं असतं…
म्हणूनच ते लेखणीत प्रकट होतं..!" #विद्यार्थीमित्र
कधी कधी शब्द जन्मत नाहीत, ते उमलत नाहीत…ते जळतात, घडतात आणि मगच पानावर उतरतात.
वेदनेचे शब्द आणि संघर्षाची शाई,जिथे लेखन जन्म घेतं, तिथे विचार केवळ लिहिले जात नाहीत, ते जाणवतात, जळतात आणि जागवतात.
मनुष्याच्या आत्म्यात काही अदृश्य ज्वाला असतात. या ज्वाला कधी धुक्यासारख्या शांत, तर कधी ज्वालामुखीसारख्या उग्र असतात. पण त्या धगधगत्या अग्नीतूनच विचार, शब्द आणि क्रांतीचा जन्म होतो.
जगातील महान लेखक, कवी, विचारवंत आणि तत्त्वज्ञ कागदावर फुले लिहीत नाहीत तर ते स्वतःच्या जखमा लिहितात. त्यांच्या शब्दांना सौंदर्य असतं, परंतु त्यांचं सत्य वेदनेच्या मातीत खोलवर रुजलेलं असतं.
संघर्ष हा केवळ अडथळा नाही तर तो आत्म्याचा आरसा आहे.
जीवन जेव्हा कठोर होतं, तेव्हा शब्दांची बीजं आणखी खोलवर रुजतात.
दुःख, अपयश, तडफड आणि एकाकीपणा..हीच ती अदृश्य शाळा, जिथे विचार परिपक्व होतात आणि मनुष्य स्वतःच्या अंतरात्म्याशी संवाद साधतो.
आजचा विद्यार्थी हा फक्त अभ्यासाच्या पानात अडकलेला मेंदू नाही.त्याच्या आत एक संपूर्ण विश्व घडत असतं..
स्वप्नांचं, शंका-कुशंकांचं, भीतीचं आणि भविष्याचं..!
कधी कधी तो शब्दांत बोलत नाही, पण त्याच्या शांततेत एक अपरिमित वादळ दडलेलं असतं. आणि जेव्हा तो लिहायला सुरुवात करतो, तेव्हा त्याच्या शब्दांत वास्तवाची धडधड, अस्वस्थतेची धूर आणि आशेची चिंगारी एकत्र पेटलेली असते.
लेखन हे केवळ कला नाही तर ती आत्मशुद्धी आहे.
जे शब्दांत उतरतात ते दुखावलेले असतात;जे समजतात ते संघर्षात तावून सुलाखून निघालेले असतात;आणि जे बदल घडवतात.. ते जागृत चेतनेचे आवाज असतात.
कधी कधी शब्द दिसत नाहीत, पण ते जिवंत असतात.
ते मनाच्या शांत कोपऱ्यात श्वास घेतात, योग्य क्षणाची वाट पाहतात आणि एक दिवस वीजेसारखे प्रकट होतात. अशा शब्दांमध्ये फक्त भावनांचा भार नसतो.. त्यात इतिहासाची नोंद, अनुभवाची शिलालेख आणि आत्म्याची साक्ष असते.
अशा शब्दांत अशी शक्ती असते की ते मनाला हलवू शकतात, व्यवस्थेला प्रश्न विचारू शकतात आणि समाजाला जागवू शकतात.
लेखन म्हणजे धैर्य..स्वतःच्या जखमांकडे स्वतःच पाहण्याचं धैर्य,
आणि जगासमोर आपण कोण आहोत हे निर्भीडपणे सांगण्याचं सामर्थ्य.
सत्य नाजूक असतं, पण ते मोडत नाही; तर ते शांत असतं, पण पर्वत हलवण्याची ताकद त्यात असते.
जो स्वतःशी प्रामाणिक असतो तोच जगाला जागवू शकतो..आणि असा लेखक कधी इतिहासात हरवत नाही…
तर तो इतिहास घडवतो...!
लेखन केवळ अक्षरांची मांडणी नसते,ते आत्म्याची साक्ष, विचारांची इमारत आणि भविष्याची दिशा असते, असं मला वाटतं मित्रांनो.. 🙏
-एक शब्दप्रवाशी.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment