🎓 सदिच्छा ग्रेट भेट : कॉम्रेड आडम मास्तर..
( माजी आमदार — सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघ | मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारत )
परभणी जिल्ह्यातील पूर्णा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आज परभणी येथे कॉम्रेड आडम मास्तर यांची सदिच्छा भेट घेण्याचा सन्मान लाभला.
कॉम्रेड आडम मास्तरांचे आयुष्य हे केवळ राजकीय पद किंवा ओळखीपुरते मर्यादित नसून, ते संघर्ष, संघटन, समाज जनतेशी निष्ठा आणि तळागाळातील वंचितांसाठीच्या जीवनलढ्याचे प्रतीक आहे.
सोलापूरातील वंचित, कामगार आणि दुर्लक्षित घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी त्यांनी केलेले कार्य विशेषतः परवडणाऱ्या गृहनिर्माणाच्या लढ्याद्वारे हजारो कुटुंबांना घर मिळवून देणे हा भारतीय डाव्या आंदोलनाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय आहे.
विडी-कामगारांच्या हक्कांसाठी त्यांनी लढलेली लढाई ही वर्गसंघर्षाची जिवंत अनुभूती आहे.
महाविद्यालयीन आयुष्यात SFI च्या माध्यमातून कार्य करताना मला कॉम्रेड विठ्ठल मोरे सर, कॉम्रेड आडम मास्तर यांसारख्या विचारप्रवर्तक व्यक्तींचे मार्गदर्शन लाभले, हा माझ्यासाठी अभिमानाचा आणि प्रेरणेचा विषय आहे.
त्या दिवसांत बीजारोपण झालेले वर्गचिंतन, स्वातंत्र्य, समता आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व आजही माझ्या विचारांचा, लेखनाचा आणि सामाजिक बांधिलकीचा पाया आहे.
आज झालेल्या मनमोकळ्या संवादात आपण मांडलेली विचारांची खोली, राजकारणातील संस्कार, जनतेच्या प्रश्नांवर लढताना लागणारी तडफ आणि धैर्य या सर्वांनी माझ्या विचारविश्वाला नव्याने आकार दिला.
आपण केलेले सूक्ष्म मार्गदर्शन आणि प्रेरणा ही आगामी कार्यात माझ्यासाठी निश्चितच दिशादर्शक ठरेल, असा विश्वास बाळगतो.
अशा व्यक्तिमत्त्वाला भेटणे म्हणजे इतिहास, विचारधारा आणि संघर्षाचं ज्वलंत रूप समोर येणं आणि त्या भेटीचा अर्थ फक्त संवादापुरता नसून, एका मूल्याधारित राजकीय संस्कृतीशी पुन्हा जोडला जाणं आहे.
धन्यवाद कॉम्रेड,आपली परंपरा फक्त स्मृती नसून भविष्यासाठीची लढण्याची शपथ आहे. ✊
कॉम्रेड लाल सलाम.. 🙏
-एक मार्क्सवादी..✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख...
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment