कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाला मिळणारा युवकांचा अभूतपूर्व प्रतिसाद हा केवळ एका मोहिमेचा प्रतिसाद नसून, देशातील तरुणांच्या मनात साचलेल्या असंतोषाचा आणि व्यवस्थेविरुद्धच्या संतापाचा उद्रेक आहे.
NEET आणि CBSE परीक्षांमधील गोंधळ, पेपरफुटी, निकालातील विसंगती आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याशी केलेले प्रयोग यामुळे लाखो युवकांच्या स्वप्नांवर घाला घातला गेला आहे. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात जर पारदर्शकता आणि उत्तरदायित्व नसेल, तर देशाचे भविष्यच अंधारात ढकलले जाते.
आजचा युवक केवळ नोकरी, पदवी किंवा करिअरसाठी संघर्ष करत नाही; तो न्याय, समान संधी आणि प्रामाणिक व्यवस्थेसाठी लढत आहे. केंद्र शासनाच्या अनेक धोरणांचा फटका सर्वसामान्य युवकांना बसत असताना त्यांच्या वेदना, प्रश्न आणि अपेक्षा सातत्याने दुर्लक्षित केल्या जात आहेत. त्यामुळे निर्माण झालेली ही चीड आणि अस्वस्थता आता आंदोलनाच्या रूपाने रस्त्यावर उतरू लागली आहे.
लोकशाहीत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारणे हा गुन्हा नसून नागरिकांचा अधिकार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारला गेला पाहिजे. NEET आणि CBSE मधील गोंधळाला जबाबदार असलेल्या शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, ही केवळ राजकीय मागणी नसून लाखो विद्यार्थी आणि पालकांच्या न्यायाची मागणी आहे.
युवकांच्या भविष्याचा सौदा करणारी कोणतीही व्यवस्था टिकू शकत नाही. कारण इतिहास साक्षी आहे, जेव्हा तरुणाई जागी होते, तेव्हा बदल अटळ असतो.
- एक संविधानप्रेमी भारतीय.. ✍️
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
#CJP #CockroachJantaParty #Jantarmantar #CJPProtest #NEET2026 #CBSE, #cjp_nail_systems_official
Post a Comment