परभणी शहराच्या दक्षिण भागातील वार्ड क्र.12 मधून झालेल्या अतिशय चुरशीच्या लढतीत निसटता पराभव..
परिसरात लहानाचा मोठा झालेला, कौटुंबिक अडचणी, सामाजिक संघर्ष आणि प्रतिकूल परिस्थितीतून स्वतःचं कर्तृत्व घडवणारा आमचा हक्काचा वहीद भाऊ पटेल..
परभणी महानगरपालिका निवडणुकीत पराभूत झाला, याचं दुःख फक्त त्याचं नाही, तर ज्याचं आयुष्य दिवस-रात्र लोकांच्या भल्यासाठी झटण्यात गेलं,अशा प्रामाणिक माणसाला दहशतीच्या आणि दबावाच्या राजकारणामुळे हरवलं गेलं, ही खंत इथल्या सजग समाजाला नक्कीच अस्वस्थ करणारी आहे.
परंतु लक्षात ठेवा,
प्रत्येक लढाईचा उद्देश फक्त विजय मिळवणं हा नसतो..काही लढाया अशासाठी लढल्या जातात की इतिहासाला हे सांगता यावं,की कोणीतरी अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे उभा राहिला होता,की कोणीतरी भीतीवर मात करून आपला आवाज बुलंद केला होता, की कोणीतरी पदासाठी नव्हे, तर तत्त्वासाठी लढत होता.
परिणाम काहीही असो, संघर्षात उभं राहण्याची जिद्द, न झुकणारी मान आणि न मावळणारा विवेक हाच खरा विजय असतो, मित्रांनो..
येथे पराभवाची फिकीर कोण करतो.?
संघर्षांनी पेटलेल्या वस्तीत जन्मलेला आमचा वहीद भाऊ
पराभवासाठी नव्हे, तर लढण्यासाठीच घडलेला आहे.
लढू… आणि नक्कीच जिंकू..!
हार मानू नकोस, मित्रा..
कारण अजून खूप मोठी, खूप खोल आणि अर्थपूर्ण लढाई तुला लढायची आहे..
या अपयशातूनच नवं बळ उभं राहणार आहे, याच ठेचकाळण्यातून भविष्यातील आव्हानांना सामोरं जाण्याची ताकद मिळणार आहे..
राजकारणात पराभव असतो, पण प्रामाणिकतेचा कधीच पराभव होत नाही.
तुझ्या सचोटीला, तुझ्या संघर्षाला आणि तुझ्या निर्भीड उभेपणाला
मनापासून सलाम…!
वहीद पटेल मित्र मंडळ 🥰
- तुझा मार्गदर्शक आणि वैचारिक मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
Post a Comment