कालपेक्षा आज चांगलं, आजपेक्षा उद्या उत्तम – हीच खरी स्वतःशी स्पर्धा आहे, मित्रांनो.. ✍️
आयुष्य म्हणजे कुणाशी तरी जिंकण्याची शर्यत नव्हे; ते कुणाला मागे टाकण्याचं मैदानही नाही.तर आयुष्य म्हणजे दररोज स्वतःकडे आरसा धरून विचारण्याचं धाडस,
“आज मी कालपेक्षा थोडा तरी चांगला झालो का…?”
आपण बहुतेक वेळा दुसऱ्यांच्या वेगाशी, गुणांशी, गुणवत्तेशी, यशाशी, पगाराशी, प्रतिष्ठेशी स्वतःची तुलना करत राहतो.
कोणी पुढे गेलं की आपल्याला अस्वस्थता येते, कोणी मागे राहिलं की आपल्याला क्षणिक समाधान मिळतं...पण या सगळ्या तुलनांमध्ये एक गोष्ट मात्र नक्कीच हरवते...
ती म्हणजे स्वतःची वाढ..!😱
खरी स्पर्धा बाहेर नसते. ती ना शेजाऱ्याशी असते, ना मित्राशी, ना समाजाशी.. तर खरी स्पर्धा असते ती कालच्या स्वतःशी..
काल जो मी होतो..भित्रा, संभ्रमात अडकलेला, टाळाटाळ करणारा, थकवा आणि निराशेच्या सावलीत वावरणारा…
आज त्याच्यापेक्षा थोडा तरी अधिक सजग, अधिक धैर्यवान, अधिक प्रामाणिक मी झालो का?
हा प्रश्नच माणसाला मोठं करतो.. 🥰
“कालपेक्षा आज चांगलं” याचा अर्थ प्रचंड बदल नव्हे.
एका रात्रीत क्रांती घडवणं अपेक्षित नाही...कधी कधी एवढंच पुरेसं असतं..
काल जे शब्द बोललो नाहीत, ते आज स्पष्टपणे बोलणं.
काल जी चूक मान्य केली नाही, ती आज स्वीकारणं.
काल जे काम टाळलं, ते आज मनापासून सुरू करणं.
छोट्या पावलांनीच मोठ्या वाटा तयार होतात, मित्रांनों..
एक चांगली सवय, एक स्पष्ट निर्णय, एक प्रामाणिक प्रयत्न..हे सगळं मिळून माणसाचं आयुष्य घडवत असतं.
आणि मग येतो पुढचा टप्पा..
“आजपेक्षा उद्या उत्तम.. बरं का..!”
उद्या म्हणजे फक्त पुढचा दिवस नाही;तर उद्या म्हणजे आशेची दिशा...आज थोडं कमी पडलं तरी चालेल, आज थकलो तरी चालेल, पण उद्यासाठी मनात एक ठाम विश्वास हवा,
“मी थांबणार नाही..”
जो माणूस उद्याची शक्यता जिवंत ठेवतो, तो कधीच संपत नाही.
परिस्थिती त्याला वाकवू शकते, पण मोडू शकत नाही.
स्वतःशी स्पर्धा करणारा माणूस इतरांच्या अपयशावर आनंद मानत नाही, आणि इतरांच्या यशाने खचतही नाही...कारण त्याला ठाऊक असतं,
माझी लढाई माझ्याशीचं आहे.. 🫣
आज मी अधिक माणूस होतोय का?
अधिक संवेदनशील, अधिक विवेकी, अधिक जबाबदार?
आज मी रागावर थोडा तरी संयम मिळवला का?
स्वार्थावर थोडी तरी समजूत जिंकली का?
हीच खरी प्रगती आहे, मित्रांनों..
समाज बदलायचा असेल, तर आधी माणूस बदलायला हवा.
आणि माणूस बदलतो तो घोषणा करून नाही, तर दररोज स्वतःशी प्रामाणिक राहून..
म्हणूनच लक्षात ठेवा.. मित्रांनो..
तुम्ही कुठे पोहोचलात, यापेक्षा तुम्ही थांबला नाहीत हे अधिक महत्त्वाचं आहे..
कालपेक्षा आज थोडं उजळलेलं मन,
आजपेक्षा उद्या थोडी अधिक स्पष्ट दिशा,
आणि या दोघांच्या मधली अखंड चाल..
हेच आयुष्याचं खऱ्या अर्थानं सौंदर्य आहे..
स्वतःशी प्रामाणिक स्पर्धा करा.
कारण स्वतःला हरवून जिंकलेलं जग
कधीच खरं समाधान देत नाही…
आणि स्वतःला जिंकलेला माणूस
कधीच खरं हरत नाही.
म्हणूनच मित्रांनो, आयुष्याकडे पाहण्याची दृष्टी बदलण्याची हीच योग्य वेळ आहे. इतरांशी तुलना करून स्वतःला थकवण्यापेक्षा, दररोज स्वतःशी थोडंसं जिंकत जाणं हीच खरी साधना आहे.
मोठे यश, मोठी पदं, मोठी ओळख यापेक्षा अधिक मौल्यवान असतं..आपलं मन दररोज थोडं अधिक शांत, विचार थोडे अधिक स्पष्ट आणि कृती थोडी अधिक प्रामाणिक होत जाणं.
हे बदल कदाचित जगाला लगेच दिसणार नाहीत, पण ते तुमचं आयुष्य नक्कीच उजळवतील.
लक्षात ठेवा, स्वतःशी प्रामाणिक राहणारा माणूस कधीच हरत नाही. तो पडतो, थकतो, गोंधळतोही पण तो थांबत नाही. कारण त्याला ठाऊक असतं की, प्रत्येक सकाळ ही नव्याने स्वतःला घडवण्याची संधी घेऊनच येते. आज थोडं कमी जमलं तरी उद्याची आशा सोडू नका; आज अपूर्ण वाटलं तरी चालेल, पण चालणं थांबवू नका. सातत्य हीच खरी ताकद आहे.
आणि म्हणूनच, आयुष्याच्या या प्रवासात एकच मंत्र मनाशी घट्ट धरून ठेवा, मित्रांनो..
कालपेक्षा आज चांगलं, आणि आजपेक्षा उद्या उत्तम.
हीच तुमची स्पर्धा असू दे, हाच तुमचा विजय असू दे.
कारण स्वतःला जिंकणारा माणूस केवळ यशस्वी होत नाही; तर तो अर्थपूर्ण, समाधानकारक आणि उजळ आयुष्य जगतो…
आपणास ह्या सकारात्मक आणि रचनात्मक ऊर्जेनें आजच्या सुंदर दिवसाच्चा हार्दिक शुभेच्छा, मित्रांनो.. 🌹
धन्यवाद मित्रांनो.. 🙏
आपलाच एक वैचारिक स्नेहीं मित्र..
🎓 #विद्यार्थीमित्र प्रा. रफीक शेख
The Radical Humanist..
साहित्यप्रेमी | विवेकवादी | समाजमाध्यमकार
🔰 The Spirit of Zindagi Foundation..
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
Inspire | Educate | Empower | Excel
🔰डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन..
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
#स्वतःशीस्पर्धा #कालपेक्षा_आज #आजपेक्षा_उद्या #स्वतःचीवाढ #जीवनविचार #प्रेरणा #प्रबोधन #विवेक #आत्मपरिक्षण #स्वतःशीसंवाद #मानवीमूल्ये #सकारात्मकदृष्टी #सातत्य #आत्मबळ #संयम #InnerStrength #SelfGrowth #PersonalDevelopment #BetterThanYesterday #GrowthMindset #LifePhilosophy #MotivationMarathi #LifeQuotesMarathi #ThoughtOfTheDay #InspirationDaily #BeBetterEveryday #NeverStopGrowing #PurposefulLife #MeaningfulLife #dailyinspiration #InspireToGrow #changeyourmindsetchangeyourlife #InnerVictory #motivationmarathi #InspirationMarathi #marathithought #marathiquotes #lifequotesmarathi #positivethinkingonly #selfgrowthquotes #betterthanyesterday #growthmindset #thoughtofthedaymotivation #dailymotivationalquotes #lifelessonsmotivation #inspirationalpost #mindsetmatters #nevergiveup #bebettereveryday #InnerStrength #selfreflection #purposeoflife #successmindset #marathiwriters #marathiliterature #marathicontent #socialawareness #YouthInspiration #studentsmotivation #humanvaluesfirst #TheRadicalHumanist
Post a Comment