“ जबाबदाऱ्यांच्या पर्वतावर चढताना, मनातल्या बालपणाची छोटीशी चांदणी जपून ठेवावी."
आज 14 नोव्हेंबर : चाचा नेहरूचा जन्म दिवस म्हणजे बालदिन..✍️
👩👩👧👦 बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो…🌹
मोठं होणं ही केवळ शारीरिक वाढ नाही; ती तर आपल्या मनातील त्या लहान मुलाला हळूहळू हरवण्याची प्रक्रिया असते.आणि म्हणूनच, मोठा झालेला प्रत्येक जण पदे, जबाबदाऱ्या, अनुभवांची जड साखळी सांभाळत मनातल्या त्या छोट्या शरारतीला, त्या निरागसतेला पुन्हा शोधण्याचा प्रयत्न करत असतो.
सर्व सख्या आणि चुलत बहिणींमध्ये मी एकटाच मुलगा म्हणून वाढलो… लहानपणी बहिणींनी दिलेलं अमाप प्रेम आणि स्नेह मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात भरून राहिलं. त्या निरागस दिवसांची अनोखी ऊब आजही मनाच्या उबदार कप्प्यात हळुवार जपलेली आहे.
शैक्षणिक आणि सामाजिक कार्याच्या प्रवासात स्त्रीबद्दलचा माझ्या मनातील प्रचंड आदर आणि सन्मान हीच माझ्या सर्व बहिणींनी दिलेली अमूल्य शिकवण आजही मला खूप प्रेरणादायी आहे.
कदाचित 1986–87 च्या आसपासच्या आठवणींतील, रमजान ईदच्या निमित्ताने आम्हा सर्व भावंडांना एकत्र आणून घेतलेला, आमच्या कुटुंबाच्या इतिहासातील हा पहिला आणि संस्मरणीय फोटो…
त्या क्षणात किती निरागसता, किती प्रेम, किती अवखळ हसू होतं.!
वेळेनं आज सर्वांना वेगवेगळ्या दिशांना विखुरवलं असलं, तरी त्या क्षणाचं ऊन मनावर अजूनही तसंच आहे…
उबदार आणि जिवंत..!🌹
या बालदिनाच्या निमित्ताने मनात एकच इच्छा..🫣
निरागस हास्य पुन्हा मिळावं…
निरपेक्ष मैत्रीची ऊब पुन्हा जाणवावी…
उत्स्फूर्त प्रेमाचा ओलावा पुन्हा भेटावा…
आनंदाच्या खळखळाटानं मन पुन्हा न्हावं…
आणि कधी काळी पळत्या वाऱ्यासारखी
सळसळणारी ती ऊर्जा, ते स्वच्छंद बालपण…
क्षणभर का होईना, पुन्हा परतावं…!
मोठं होणं अपरिहार्य आहे, पण मनानं मोठं होणं हा पर्याय आहे.
खरे बालक तेच..जे जबाबदाऱ्यांच्या पर्वतावर उभे असतानाही मनातील शरारत, हसू आणि निरागसतेचा झरा जपून ठेवतात.
अशा सर्व “मनाने अजूनही लहान” मित्रांना,
निरागसतेच्या वाटांनी अजूनही चालणाऱ्या मोठ्यांना,
बालदिनाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा मित्रांनो …! 🌹🍬🍫🍰🍧🍭
- शब्दांकन #विद्यार्थीमित्र.. ✍️
#बालदिन #ChildrensDay #चाचानेहरू #JawaharlalNehru #बालपण #निरागसता #आठवणी #विवेकजागरण #प्रबोधन #प्रेरणादायी #भावनिकलेखन #कौटुंबिकआठवणी #RafikhShaikh #शब्दांकन #समाजप्रबोधन #स्त्रीसन्मान #भावंडांचेप्रेम #बालपणाच्याआठवणी #विचारलेखन #संस्कार #जीवनमूल्ये #विचारप्रकाश #MarathiWriter #EducationalThoughts #SocialAwareness #VidyarthiMitra
Post a Comment