🎓 सदिच्छा ग्रेट भेट : कॉम्रेड नजीर शेख
(इतिहास संशोधक आणि अभ्यासक, नांदेड)
Najir Shaikh
आजच्या माहितीच्या गोंधळात विचारांचा आवाज हरवत चालला आहे… आणि अशा काळात विचारांच्या शांत झऱ्यासारखं मन प्रसन्न करणारं व्यक्तिमत्त्व भेटणं ही खरी वैचारिक पर्वणीच असते.
आज फेसबुकवर विविध सामाजिक, राजकीय आणि ऐतिहासिक विषयांवर विवेकी आणि प्रबोधनात्मक लिखाण करणारे माझे वैचारिक स्नेहीं..कॉम्रेड नजीर शेख यांनी डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन या शैक्षणिक आणि सामाजिक परिवाराला सदिच्छा भेट दिली.
या भेटीत आमचे स्नेहीं ऍड. शोएब सिद्दीकी आणि अब्दुल मुजीब अन्सारी यांची उपस्थिती लाभली.
सुमारे दोन-तीन तास चाललेल्या या वैचारिक संवादात समाजातील विद्यमान असंतुलन, मुस्लिम समाजासमोरील विविध प्रश्न, विवेकी आचरण, धार्मिक मर्यादा आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक या विषयांवर सखोल चर्चा झाली.
शिक्षण, सामाजिक जागृती आणि राजकीय प्रबोधन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजाला नवसंजीवनी देण्याचा आशय या संवादातून ठळकपणे समोर आला.
कॉम्रेड नजीर शेख यांचा अभ्यास, इतिहासदृष्टी, आणि विचारप्रामाण्य ही भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील.
त्यांचा प्रत्येक विचार हा जणू अंधारात दिवा लावणारा ठरतो.. जो अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक जडत्वाला आव्हान देतो.
अशा वैचारिक सहवासातून केवळ संवाद नव्हे, तर नवे दृष्टिकोन जन्म घेतात.
आजच्या भेटीत केवळ सदिच्छा नव्हे, तर समाजपरिवर्तनाच्या आशेची नवी ठिणगी पेटली आणि ती नक्कीच उज्ज्वल उद्याच्या दिशेने मार्ग दाखवेल.
आजच्या सदिच्छा भेटीत तुमचा वैचारिक सहवास लाभला, हे माझं भाग्य मित्रा...!
-आपलाच वैचारिक स्नेहीं.. ✍️
#विद्यार्थीमित्र प्रा.रफीक शेख..
-एक साहित्यप्रेमी, विवेकवादी आणि समाजमाध्यमकार..
🔰 The Spirit of Zindagi Foundation
"मानवी सामर्थ्याला जागवणारं प्रेरणेचं क्षितिज..!"
🎓 डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम विद्यार्थी फाउंडेशन, परभणी.
"Nurturing Potential Through Education"
शिक्षण | सेवा | प्रेरणा | प्रबोधन | सामाजिकता | संशोधन
Post a Comment